S M L

आरक्षित भूखंड दिला केंद्रीय मंत्र्यांच्या संस्थेला !

07 मेपुणे शहराजवळील बावधन भागातील सुमारे 26 एकर जागा जी बीडीपी (BDP) अर्थात जैव विविधता पार्ककरता पुणे महापालिकेने आरक्षित केली होती. या जागेवरचं आरक्षण 8 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रद्द केल्याचं माजी नगरसेवक आणि पुणे जनहित आघाडीचे निमंत्रक उज्जवल केसकर यांनी उघडकीस आणलं आहे. केसकर यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करत हा 26 एकराचा भूखंड हा केंद्रीय मंत्री काँग्रेसचे खासदार प्रतिक पाटील यांच्या शेतकरी शिक्षण मंडळ या संस्थेचा असल्याचं समोर आणलं आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यापुढे झालेल्या सुनावणीवेळी प्रतिक पाटील हे हजर होते. आणि त्याचबरोबर विलासराव देशमुख यांनी या भूखंडावरचं बीडीपीचं आरक्षण रद्द करायची शिफारस केली होती. सर्वसामान्य नागरिक आणि मंत्र्यांकरता वेगळा न्याय का ? असा सवाल केसकर यांनी उपस्थित केला आहे. अनेक नागरिकांच्या मिळकतींवर बीडीपीचं आरक्षण आहे मग ते का रद्द करत नाही असं विचारत केसकर यांनी याविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 7, 2012 05:03 PM IST

आरक्षित भूखंड दिला केंद्रीय मंत्र्यांच्या संस्थेला !

07 मे

पुणे शहराजवळील बावधन भागातील सुमारे 26 एकर जागा जी बीडीपी (BDP) अर्थात जैव विविधता पार्ककरता पुणे महापालिकेने आरक्षित केली होती. या जागेवरचं आरक्षण 8 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रद्द केल्याचं माजी नगरसेवक आणि पुणे जनहित आघाडीचे निमंत्रक उज्जवल केसकर यांनी उघडकीस आणलं आहे.

केसकर यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करत हा 26 एकराचा भूखंड हा केंद्रीय मंत्री काँग्रेसचे खासदार प्रतिक पाटील यांच्या शेतकरी शिक्षण मंडळ या संस्थेचा असल्याचं समोर आणलं आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यापुढे झालेल्या सुनावणीवेळी प्रतिक पाटील हे हजर होते. आणि त्याचबरोबर विलासराव देशमुख यांनी या भूखंडावरचं बीडीपीचं आरक्षण रद्द करायची शिफारस केली होती. सर्वसामान्य नागरिक आणि मंत्र्यांकरता वेगळा न्याय का ? असा सवाल केसकर यांनी उपस्थित केला आहे. अनेक नागरिकांच्या मिळकतींवर बीडीपीचं आरक्षण आहे मग ते का रद्द करत नाही असं विचारत केसकर यांनी याविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 7, 2012 05:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close