S M L

वाळूमाफियांचा पोलीस,गावकर्‍यांना पेटवण्याचा प्रयत्न

08 मेमहसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वाळू माफियांविरोधात कारवाईचे आश्वासन देऊन चोवीस तास उलटत नाहीत तोच. त्यांच्याच जिल्ह्यात वाळूमाफियांनी गावकर्‍यांना आणि पोलिसांनाही पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यात गोदावरी नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात खानापूरमधील गावकर्‍यांनी आवाज उठवला होता. शेवटी काल रात्री गावकर्‍यांनी वाळूचे 2 टेम्पो पकडले. यावेळी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. काहीवेळातच 50 ते 60 गुंडांनी गावकर्‍यांना आणि पोलिसांना घेराव घातला. त्यांच्यावर रॉकेल फेकलं आणि पेटवून देण्याची धमकी दिली. गुंडांच्या हल्ल्यानं पोलिसांनाही माघार घ्यावा लागला. गावकर्‍यांनी पकडलेले 2 टेम्पो गुंडांनी तावडीत घेऊन पोबारा झाले. याप्रकरणी 35 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 8, 2012 08:57 AM IST

वाळूमाफियांचा पोलीस,गावकर्‍यांना पेटवण्याचा प्रयत्न

08 मे

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वाळू माफियांविरोधात कारवाईचे आश्वासन देऊन चोवीस तास उलटत नाहीत तोच. त्यांच्याच जिल्ह्यात वाळूमाफियांनी गावकर्‍यांना आणि पोलिसांनाही पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यात गोदावरी नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात खानापूरमधील गावकर्‍यांनी आवाज उठवला होता. शेवटी काल रात्री गावकर्‍यांनी वाळूचे 2 टेम्पो पकडले. यावेळी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. काहीवेळातच 50 ते 60 गुंडांनी गावकर्‍यांना आणि पोलिसांना घेराव घातला. त्यांच्यावर रॉकेल फेकलं आणि पेटवून देण्याची धमकी दिली. गुंडांच्या हल्ल्यानं पोलिसांनाही माघार घ्यावा लागला. गावकर्‍यांनी पकडलेले 2 टेम्पो गुंडांनी तावडीत घेऊन पोबारा झाले. याप्रकरणी 35 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2012 08:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close