S M L

एअर इंडियाचे पायलटस् सुट्टीवर, प्रवासी वार्‍यावर

08 मेएअर इंडियाच्या प्रवाशांसाठी आजचा दिवसही त्रासदायक ठरणार आहे. सकाळपासून एअर इंडियाची चार विमानं रद्द झाली आहेत . एकूण 50 पायलटस्‌नी आजारी पडल्याचं कारण देत कामावर यायला नकार दिला आहे. इतर विमानकंपन्या आणि एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांनाही समान वेतन मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे. संप पुकारलेल्या पायलट्सनी आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कामावर हजर व्हावं अन्यथा कारवाईला सामोरं जावं असं एअर इंडिया व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तर पायलटसनी हा संप नसल्याचं म्हटलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पायलट्सनी सीक लिव्हवर जाण्याचं प्रमाण यामुळे वाढेल. तर हवाई उड्डयन मंत्री अजित सिंग यांनी पायलट्सची ही कृती बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 8, 2012 09:11 AM IST

एअर इंडियाचे पायलटस् सुट्टीवर, प्रवासी वार्‍यावर

08 मे

एअर इंडियाच्या प्रवाशांसाठी आजचा दिवसही त्रासदायक ठरणार आहे. सकाळपासून एअर इंडियाची चार विमानं रद्द झाली आहेत . एकूण 50 पायलटस्‌नी आजारी पडल्याचं कारण देत कामावर यायला नकार दिला आहे. इतर विमानकंपन्या आणि एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांनाही समान वेतन मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे. संप पुकारलेल्या पायलट्सनी आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कामावर हजर व्हावं अन्यथा कारवाईला सामोरं जावं असं एअर इंडिया व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तर पायलटसनी हा संप नसल्याचं म्हटलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पायलट्सनी सीक लिव्हवर जाण्याचं प्रमाण यामुळे वाढेल. तर हवाई उड्डयन मंत्री अजित सिंग यांनी पायलट्सची ही कृती बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2012 09:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close