S M L

डोंबिवलीत शिवसेना - मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा

08 मेडोंबिवलीत पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध मनसे असा संघर्ष पेटला आहे. आचार्य अत्रे वाचनालयाच्या इमारतीच्या भूमिपूजनासाठी आज शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे डोंबिवलीत येणार होते. पण हे वाचनालय मनसेच्या प्रयत्नांमुळे होत असल्याचा दावा करत मनसे कार्यकर्त्यांनी या इमारतीचं भूमिपूजन सकाळीच आटोपलं. त्यामुळे शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. मनसे कार्यकर्त्यांनी लावले उद्घाटन फलक पोलिसांनी जप्त केला. दरम्यान, मनसे नगरसेवक राहुल चितळेसह 20 कार्यकर्त्यांवर पोलिसांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. डोंबिवली नंतर मनसे कार्यकर्त्यांचा कल्याणमध्येही उद्घाटनाचा घाट घातला. मनसेचे कार्यकर्ते हरकिशन दास हॉस्पिटलचं भूमिपूजन करणार आहेत. या हॉस्पिटलचं भूमिपूजन आज उध्दव ठाकरे यांच्या हस्ते संध्याकाळी होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 8, 2012 06:05 PM IST

डोंबिवलीत शिवसेना - मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा

08 मे

डोंबिवलीत पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध मनसे असा संघर्ष पेटला आहे. आचार्य अत्रे वाचनालयाच्या इमारतीच्या भूमिपूजनासाठी आज शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे डोंबिवलीत येणार होते. पण हे वाचनालय मनसेच्या प्रयत्नांमुळे होत असल्याचा दावा करत मनसे कार्यकर्त्यांनी या इमारतीचं भूमिपूजन सकाळीच आटोपलं. त्यामुळे शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. मनसे कार्यकर्त्यांनी लावले उद्घाटन फलक पोलिसांनी जप्त केला. दरम्यान, मनसे नगरसेवक राहुल चितळेसह 20 कार्यकर्त्यांवर पोलिसांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. डोंबिवली नंतर मनसे कार्यकर्त्यांचा कल्याणमध्येही उद्घाटनाचा घाट घातला. मनसेचे कार्यकर्ते हरकिशन दास हॉस्पिटलचं भूमिपूजन करणार आहेत. या हॉस्पिटलचं भूमिपूजन आज उध्दव ठाकरे यांच्या हस्ते संध्याकाळी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2012 06:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close