S M L

सिंचनाच्या खर्चावर आता केंद्राची नजर ?

08 मेमहाराष्ट्रातल्या सिंचन वादाची पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दखल घेतली आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी देशपातळीवर सिंचन आयोगाच्या स्थापनेचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाला भेटल्यानंतर पंतप्रधानांनी हे संकेत दिलेत. हा सिंचन आयोग राज्यातल्या सिंचनाच्या खर्चावर नजर ठेवणार आहे. त्याचबरोबर दोन राज्यांतल्या सिंचन क्षेत्रातल्या वादांवर तोडगे काढण्याचे कामही या आयोगामार्फत केलं जाणार आहे. महाराष्ट्रात सिंचनाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद सुरु आहे या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्यानं त्याला वेगळं महत्त्व प्राप्त झालंय. सिंचन क्षेत्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज आहेत. महाराष्ट्रात 10 वर्षांत 20 हजार कोटी खर्च झाले पण सिंचन क्षमता फक्त 0.1 टक्के इतकीच वाढली याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: May 8, 2012 12:39 PM IST

सिंचनाच्या खर्चावर आता केंद्राची नजर ?

08 मे

महाराष्ट्रातल्या सिंचन वादाची पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दखल घेतली आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी देशपातळीवर सिंचन आयोगाच्या स्थापनेचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाला भेटल्यानंतर पंतप्रधानांनी हे संकेत दिलेत. हा सिंचन आयोग राज्यातल्या सिंचनाच्या खर्चावर नजर ठेवणार आहे. त्याचबरोबर दोन राज्यांतल्या सिंचन क्षेत्रातल्या वादांवर तोडगे काढण्याचे कामही या आयोगामार्फत केलं जाणार आहे. महाराष्ट्रात सिंचनाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद सुरु आहे या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्यानं त्याला वेगळं महत्त्व प्राप्त झालंय. सिंचन क्षेत्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज आहेत. महाराष्ट्रात 10 वर्षांत 20 हजार कोटी खर्च झाले पण सिंचन क्षमता फक्त 0.1 टक्के इतकीच वाढली याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2012 12:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close