S M L

बाबासाहेबांचे व्यंगचित्र : यादव, पळशीकरांचा राजीनामा

11 मेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं वादग्रस्त व्यंगचित्र एनसीईआरटी (NCERT) च्या पुस्तकातून काढून टाकण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर योगेंद्र यादव आणि सुहास पळशीकर यांनी एनसीईआरटीच्या राज्यशास्त्र विभागाच्या मुख्य सल्लागारपदाचे राजीनामे दिले आहे. सरकारचा निर्णय आपल्या मान्य नसल्यामुळे आपण पदाचा राजीनामा देत असल्याचं पळशीकर यांनी म्हटलं आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे एनसीईआरटी म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद या संस्थेने अकरावीच्या राज्यशास्त्र पुस्तकात एक व्यंगचित्र प्रसिध्द केले आहे. या व्यंगचित्रात भारतीय राज्यघटनेला गोगलगाय संबोधण्यात आले आहे आणि बाबासाहेब या संविधान रुपी गोगलगायीवर बसले असल्याचं दाखवण्यात आले आहे. तर त्यांच्या पाठीमागे भारताचे पहिले पंतप्रधान पंंडित जवाहरलाल नेहरू हातात चाबूक घेऊन उभे असल्याचे वादग्रस्त व्यंगचित्र प्रसिध्द केले आहे. या प्रकारामुळे दलित संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याच मुद्यावर आज लोकसभेत मोठा गदारोळ झाला. हे व्यंगचित्र काढून टाकावं आणि दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी विरोधकांनी केली. दरम्यान, हे व्यंगचित्र काढण्याचे आदेश एप्रिलमध्येच देण्यात आल्याचा दावा मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी केला. तसेच सिब्बल यांनी याबाबत माफीही मागितली. या प्रकरणी आता एनसीईआरटीच्या राज्यशास्त्र विभागाच्या मुख्य सल्लागार योगेंद्र यादव आणि सुहास पळशीकर यांनी राजीनामा दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2012 02:56 PM IST

बाबासाहेबांचे व्यंगचित्र : यादव, पळशीकरांचा राजीनामा

11 मे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं वादग्रस्त व्यंगचित्र एनसीईआरटी (NCERT) च्या पुस्तकातून काढून टाकण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर योगेंद्र यादव आणि सुहास पळशीकर यांनी एनसीईआरटीच्या राज्यशास्त्र विभागाच्या मुख्य सल्लागारपदाचे राजीनामे दिले आहे. सरकारचा निर्णय आपल्या मान्य नसल्यामुळे आपण पदाचा राजीनामा देत असल्याचं पळशीकर यांनी म्हटलं आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे एनसीईआरटी म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद या संस्थेने अकरावीच्या राज्यशास्त्र पुस्तकात एक व्यंगचित्र प्रसिध्द केले आहे. या व्यंगचित्रात भारतीय राज्यघटनेला गोगलगाय संबोधण्यात आले आहे आणि बाबासाहेब या संविधान रुपी गोगलगायीवर बसले असल्याचं दाखवण्यात आले आहे. तर त्यांच्या पाठीमागे भारताचे पहिले पंतप्रधान पंंडित जवाहरलाल नेहरू हातात चाबूक घेऊन उभे असल्याचे वादग्रस्त व्यंगचित्र प्रसिध्द केले आहे. या प्रकारामुळे दलित संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याच मुद्यावर आज लोकसभेत मोठा गदारोळ झाला. हे व्यंगचित्र काढून टाकावं आणि दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी विरोधकांनी केली. दरम्यान, हे व्यंगचित्र काढण्याचे आदेश एप्रिलमध्येच देण्यात आल्याचा दावा मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी केला. तसेच सिब्बल यांनी याबाबत माफीही मागितली. या प्रकरणी आता एनसीईआरटीच्या राज्यशास्त्र विभागाच्या मुख्य सल्लागार योगेंद्र यादव आणि सुहास पळशीकर यांनी राजीनामा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2012 02:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close