S M L

'बांभळी'च्या काटेरी वाटेमुळे सहा तालुके तहाणलेलेच !

14 मेमराठवाड्यातील नांदेड जिल्हयातला बाभळी प्रकल्प गेल्या 30 वर्षांपासून रखडला गेला आहे. या बाभळीच्या वाटेत कधी सरकारी अनास्थेचे तर कधी आंध्र प्रदेशातील नेत्यांच्या राजकारणाचे काटे आंथरले गेले. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील 6 तालुके आजही तहानलेलेच आहेत.नांदेड जिल्ह्यातून वाहणारी गोदावरी नदी. तब्बल 90 किलोमीटरचा प्रवास करून ही नदी आंध्रप्रदेशात प्रवेश करते. पण प्रकल्पाअभावी जिल्ह्यातील 6 तालुक्यातील जनता कायम तहानलेलीच होती. म्हणूनच शंकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून 1983 साली या प्रकल्पाची पायाभऱणी झाली.मान्यता मिळायला 12 वर्षे लागली तर प्रत्यक्ष काम सुरु व्हायला 21 वर्षे लागली. कासवाच्या गतीने चाललेल्या या प्रकल्पाच खर्च मात्र अनेक पटींनी वाढत गेला. बांधळी बंधार्‍यांचं काम पूर्ण होत आलं असतानाच या बांभळीच्या वाटेत आंध्रप्रदेशच्या नेत्यांनी काटे आंथरायला सुरुवात केली. आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यानी बाभळी बंधार्‍याला विरोध केला. त्यामुळे हा वाद सुप्रीम कोर्टात गेला आहे. 30 वर्षानंतरही बाभळीचा काटेरी प्रवास आजही सुरुच आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2012 11:41 AM IST

'बांभळी'च्या काटेरी वाटेमुळे सहा तालुके तहाणलेलेच !

14 मे

मराठवाड्यातील नांदेड जिल्हयातला बाभळी प्रकल्प गेल्या 30 वर्षांपासून रखडला गेला आहे. या बाभळीच्या वाटेत कधी सरकारी अनास्थेचे तर कधी आंध्र प्रदेशातील नेत्यांच्या राजकारणाचे काटे आंथरले गेले. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील 6 तालुके आजही तहानलेलेच आहेत.

नांदेड जिल्ह्यातून वाहणारी गोदावरी नदी. तब्बल 90 किलोमीटरचा प्रवास करून ही नदी आंध्रप्रदेशात प्रवेश करते. पण प्रकल्पाअभावी जिल्ह्यातील 6 तालुक्यातील जनता कायम तहानलेलीच होती. म्हणूनच शंकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून 1983 साली या प्रकल्पाची पायाभऱणी झाली.

मान्यता मिळायला 12 वर्षे लागली तर प्रत्यक्ष काम सुरु व्हायला 21 वर्षे लागली. कासवाच्या गतीने चाललेल्या या प्रकल्पाच खर्च मात्र अनेक पटींनी वाढत गेला. बांधळी बंधार्‍यांचं काम पूर्ण होत आलं असतानाच या बांभळीच्या वाटेत आंध्रप्रदेशच्या नेत्यांनी काटे आंथरायला सुरुवात केली. आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यानी बाभळी बंधार्‍याला विरोध केला. त्यामुळे हा वाद सुप्रीम कोर्टात गेला आहे. 30 वर्षानंतरही बाभळीचा काटेरी प्रवास आजही सुरुच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 14, 2012 11:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close