S M L

येडियुरप्पांच्या तिसर्‍या अंकावर पडदा ?

14 मेकर्नाटकच्या राजकारणात येडियुरप्पांनी पुकारलेल्या बंडामुळे मोठ वादळ निर्माण झालं पण खुद्द येडियुरप्पांनी या तिसर्‍या अंकावर पडदा टाकला आहे. मी भाजप सोडण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. पण हा निर्णय अंतिम नाही असंही बी. एस.येडियुरप्पा यांनी ठणकावून सांगितले आहे. सध्यातरी येडियुरप्पांच्या माघारीमुळे भाजपच्या नेत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. आज येडियुरप्पांचे दूत शोभा करगदलाजे यांनी अरुण जेटली आणि धमेंद्र प्रधान यांची भेट घेतली या भेटीनंतर येडियुरप्पांनी आपली भूमिका मवाळ केली. येडियुरप्पांनी आज बंगळुरूमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्या समर्थक 40 आमदारांनी आपले राजीनामेही त्यांना सोपवल्याचं त्यांनी सांगितलं. कर्नाटकमधल्या सध्याच्या स्थितीसाठी मुख्यमंत्री सदानंदा गौडा आणि सध्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. काल रविवारी येडियुरप्पांनी सोनिया गांधी यांचं जाहीर कौतुक केलं. काँग्रेसमध्ये कोणतीही अडचण निर्माण झाली तर सगळेजण एकमेकांच्या पाठिशी उभे राहतात पण आपल्याकडे असं काही होतच नाही उलट खुर्ची मिळवण्यासाठी सारखी धडपड करत असतात असा घरचा आहेर येडियुरप्पा यांनी देऊन टाकला होता. त्यामुळे येडियुरुप्पा पक्ष सोडून जातील अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, आज येडियुरप्पांनी तलवार म्यान करत तिसर्‍या अंकावर पडदा टाकला आहे. पण उद्या जर येडींचा मार्ग मोकळा झाला नाही कर पुन्हा एकदा चौथा प्रयोग करुन दाखवू अशा इशाराही त्यांनी दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2012 12:46 PM IST

येडियुरप्पांच्या तिसर्‍या अंकावर पडदा ?

14 मे

कर्नाटकच्या राजकारणात येडियुरप्पांनी पुकारलेल्या बंडामुळे मोठ वादळ निर्माण झालं पण खुद्द येडियुरप्पांनी या तिसर्‍या अंकावर पडदा टाकला आहे. मी भाजप सोडण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. पण हा निर्णय अंतिम नाही असंही बी. एस.येडियुरप्पा यांनी ठणकावून सांगितले आहे. सध्यातरी येडियुरप्पांच्या माघारीमुळे भाजपच्या नेत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. आज येडियुरप्पांचे दूत शोभा करगदलाजे यांनी अरुण जेटली आणि धमेंद्र प्रधान यांची भेट घेतली या भेटीनंतर येडियुरप्पांनी आपली भूमिका मवाळ केली. येडियुरप्पांनी आज बंगळुरूमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्या समर्थक 40 आमदारांनी आपले राजीनामेही त्यांना सोपवल्याचं त्यांनी सांगितलं. कर्नाटकमधल्या सध्याच्या स्थितीसाठी मुख्यमंत्री सदानंदा गौडा आणि सध्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. काल रविवारी येडियुरप्पांनी सोनिया गांधी यांचं जाहीर कौतुक केलं. काँग्रेसमध्ये कोणतीही अडचण निर्माण झाली तर सगळेजण एकमेकांच्या पाठिशी उभे राहतात पण आपल्याकडे असं काही होतच नाही उलट खुर्ची मिळवण्यासाठी सारखी धडपड करत असतात असा घरचा आहेर येडियुरप्पा यांनी देऊन टाकला होता. त्यामुळे येडियुरुप्पा पक्ष सोडून जातील अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, आज येडियुरप्पांनी तलवार म्यान करत तिसर्‍या अंकावर पडदा टाकला आहे. पण उद्या जर येडींचा मार्ग मोकळा झाला नाही कर पुन्हा एकदा चौथा प्रयोग करुन दाखवू अशा इशाराही त्यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 14, 2012 12:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close