S M L

हिमायत बेगचे नांदेड कनेक्शन उघड

15 मेपुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी हिमायत बेग याचं नांदेड कनेक्शन उघड झालंय.पण हिमायतने जिल्हा परिषदेकडून अपंगत्वाचं सर्टिफेकट घेतलं होतं. आता हिमायतला हे सर्टिफिकेट देणार्‍या अधिकार्‍यांची एटीएस चौकशी करणार आहे. हिमायत बेग काही दिवस नांदेडमध्ये राहिला होता. एटीएसनं या अधिकार्‍यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. 16 जुलै 2011 रोजी जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी हिमायत बेग याच्यावर आरोप निश्चित करण्यात आले. देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, बॉम्ब स्फोटामध्ये सक्रिय सहभाग तसेच देशद्राहाचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. बेग याने लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील ग्लोबल इंटरनेट कॅफेमध्येच बॉम्बस्फोटाचा कट रचल्याची माहितीतपासातून पुढे आली. या स्फोटात वापरण्यात आलेले बॉम्ब उदगीर याच ठिकाणी तयार करण्यात आले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2012 11:03 AM IST

हिमायत बेगचे नांदेड कनेक्शन उघड

15 मे

पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी हिमायत बेग याचं नांदेड कनेक्शन उघड झालंय.पण हिमायतने जिल्हा परिषदेकडून अपंगत्वाचं सर्टिफेकट घेतलं होतं. आता हिमायतला हे सर्टिफिकेट देणार्‍या अधिकार्‍यांची एटीएस चौकशी करणार आहे. हिमायत बेग काही दिवस नांदेडमध्ये राहिला होता. एटीएसनं या अधिकार्‍यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. 16 जुलै 2011 रोजी जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी हिमायत बेग याच्यावर आरोप निश्चित करण्यात आले. देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, बॉम्ब स्फोटामध्ये सक्रिय सहभाग तसेच देशद्राहाचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. बेग याने लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील ग्लोबल इंटरनेट कॅफेमध्येच बॉम्बस्फोटाचा कट रचल्याची माहितीतपासातून पुढे आली. या स्फोटात वापरण्यात आलेले बॉम्ब उदगीर याच ठिकाणी तयार करण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 15, 2012 11:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close