S M L

IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणी 5 खेळाडू निलंबित

15 मेअखेर आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी 5 खेळाडूंवर कारवाई केली आहे. आज बीसीसीआयने कारवाई करत टी. सुधींद्र, शलभ श्रीवास्तव, अमित यादव, मोहनीश मिश्रा आणि अभिनव बाली या खेळाडूंना निलंबित केलं आहे. एका स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीचे प्रतिनिधी असल्याचं सांगत इंडिया टीव्हीनं स्टिंग ऑपरेशन केलं होतं. या खेळाडूंवर क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळायला बंदी घालण्यात आली आहे. बोर्डाने या प्रकरणी आता चौकशीचे आदेशही दिले आहेत. बीसीसीआयच्या अँटी करप्शन विभागाचे प्रमुख रवी सवानी हे या प्रकरणी चौकशी करणार आहेत. त्यांच्या अहवालानंतर या खेळाडूंवर काय कारवाई करायची हे निश्चित केलं जाणार आहे. चौकशी समिती 15 दिवसात आपला अहवाल बीसीसीआयला सोपवणार आहे. आयपीएल आणि वाद काही नवीन नाहीत. गेली पाच वर्ष आयपीएलने क्रिकेटप्रेमींना जितकी भुरळ घातलीय. तितकेच वादही ओढवून घेतलेत आणि आता तर आयपीएलच्या पाचव्या हंगामात थेट फिक्सिंगचाच वाद निर्माण झाला आहे. एका स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीचे प्रतिनिधी असल्याचं सांगत एका चॅनेलने स्टिंग ऑपरेशन केलं. यात दोन खेळाडूंशी झालेल्या संवादानंतर आयपीएलमध्ये फिक्सिंग सुरु असल्याचा दावा करण्यात आला आहे. डेक्कन चार्जर्सचा टी सुधींद्र आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा शलभ श्रीवास्तव या खेळाडूंनी अधिक रक्कम मिळाल्यास दुसर्‍या टीममध्ये जाण्याची तयारी दर्शवली आहे. करारानुसार मान्य झालेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम ब्लॅकमनी मिळाल्याची कबुलीसुध्द यामध्ये खेळाडूंनी दिली आहे. रणजी क्रिकेट स्पर्धेत गेल्या हंगामात सर्वाधिक विकेट घेणारा टी सुधींद्रचं संभाषण या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आलं आहे. मॅचमध्ये एक नो बॉल टाकण्याचा रेट 50 हजार असल्याचं या संभाषणात दाखवण्यात आलं आहे. सुधींद्र या हंगामात डेक्कन चार्जर्सकडून खेळत असून इंदूर इथं झालेल्या एका मॅचमध्ये त्यानं स्पॉट फिक्सिंग केलं होतं. स्पॉट फिक्सिंग प्रकरण 5 खेळाडू निलंबितटी. सुधींद्र - डेक्कन चार्जर्समोहनीश मिश्रा - पुणे वॉरियर्सशलभ श्रीवास्तव - किंग्ज इलेव्हन पंजाबअमित यादव - किंग्ज इलेव्हन पंजाब

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2012 05:59 PM IST

IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणी 5 खेळाडू निलंबित

15 मे

अखेर आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी 5 खेळाडूंवर कारवाई केली आहे. आज बीसीसीआयने कारवाई करत टी. सुधींद्र, शलभ श्रीवास्तव, अमित यादव, मोहनीश मिश्रा आणि अभिनव बाली या खेळाडूंना निलंबित केलं आहे. एका स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीचे प्रतिनिधी असल्याचं सांगत इंडिया टीव्हीनं स्टिंग ऑपरेशन केलं होतं. या खेळाडूंवर क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळायला बंदी घालण्यात आली आहे. बोर्डाने या प्रकरणी आता चौकशीचे आदेशही दिले आहेत. बीसीसीआयच्या अँटी करप्शन विभागाचे प्रमुख रवी सवानी हे या प्रकरणी चौकशी करणार आहेत. त्यांच्या अहवालानंतर या खेळाडूंवर काय कारवाई करायची हे निश्चित केलं जाणार आहे. चौकशी समिती 15 दिवसात आपला अहवाल बीसीसीआयला सोपवणार आहे.

आयपीएल आणि वाद काही नवीन नाहीत. गेली पाच वर्ष आयपीएलने क्रिकेटप्रेमींना जितकी भुरळ घातलीय. तितकेच वादही ओढवून घेतलेत आणि आता तर आयपीएलच्या पाचव्या हंगामात थेट फिक्सिंगचाच वाद निर्माण झाला आहे. एका स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीचे प्रतिनिधी असल्याचं सांगत एका चॅनेलने स्टिंग ऑपरेशन केलं. यात दोन खेळाडूंशी झालेल्या संवादानंतर आयपीएलमध्ये फिक्सिंग सुरु असल्याचा दावा करण्यात आला आहे. डेक्कन चार्जर्सचा टी सुधींद्र आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा शलभ श्रीवास्तव या खेळाडूंनी अधिक रक्कम मिळाल्यास दुसर्‍या टीममध्ये जाण्याची तयारी दर्शवली आहे. करारानुसार मान्य झालेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम ब्लॅकमनी मिळाल्याची कबुलीसुध्द यामध्ये खेळाडूंनी दिली आहे.

रणजी क्रिकेट स्पर्धेत गेल्या हंगामात सर्वाधिक विकेट घेणारा टी सुधींद्रचं संभाषण या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आलं आहे. मॅचमध्ये एक नो बॉल टाकण्याचा रेट 50 हजार असल्याचं या संभाषणात दाखवण्यात आलं आहे. सुधींद्र या हंगामात डेक्कन चार्जर्सकडून खेळत असून इंदूर इथं झालेल्या एका मॅचमध्ये त्यानं स्पॉट फिक्सिंग केलं होतं.

स्पॉट फिक्सिंग प्रकरण 5 खेळाडू निलंबित

टी. सुधींद्र - डेक्कन चार्जर्समोहनीश मिश्रा - पुणे वॉरियर्सशलभ श्रीवास्तव - किंग्ज इलेव्हन पंजाबअमित यादव - किंग्ज इलेव्हन पंजाब

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 15, 2012 05:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close