S M L

सिंधुदुर्गात 7 हजार कोटींचं अवैध खाणकाम

14 मेसिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कळणेमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर खाणकाम सुरू आहे. याबद्दलचा सरकारी अहवाल आयबीएन लोकमतच्या हाती लागला आहे. या अहवालात कळणेमध्ये तब्बल 7 हजार कोटींचं अवैध खाणकाम झाल्याचा अहवाल कोल्हापूरच्या खनिकर्म विभागाने दिला आहे. पण अजूनही हे बेकायदा खाणकाम सुरूच आहे. इतकंच नाही तर दहा दिवसांपूर्वी नागपूरच्या खनिकर्म विभागाने नव्याने अहवाल तयार करण्याचा घाट घातला आहे. नव्या अहवालाबाबत कमालीची गुप्तता पाळली जातेय. हरित कोकणाला आता बेकायदेशीर खाणकामाने पोखरुन काढले आहे. याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेचा तीव्र विरोध असूनही तीन वर्षांपूर्वी चालू झालेल्या कळणे मायनिंग मधून तब्बल दहा लाख घनमीटर एवढं अवैध उत्खनन झाल्याचा निष्कर्ष सरकारच्याच खनिकर्म विभागाने काढला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या उत्खननातून सुमारे 7 हजार कोटींचं निर्यातक्षम खनिज निघालं असावं असा खनिज तज्ञांचा अंदाज आहे. बेकायदा खनिज उत्खनन होऊनही मायनिंग अजून सुरूच आहे. कोल्हापूरच्या खनिकर्म संचालनालयाने 7 जानेवारीला नागपूरच्या वरिष्ठ कार्यालयाला दिलेला हा अहवाल आयबीएन लोकमतच्याही हाती आला असून या अहवालात कळणे मायनिंगच्या अवैध खाणकामाबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय. या अहवालावर विधानसभेतही प्रश्न उपस्थित झाला. मात्र त्यानंतर पुन्हा नागपूरच्या खनिकर्म संचालनालयाने दहा दिवसांपूर्वी कळ्णे मायनिंगची पुन्हा तपासणी करून नवीन अहवाल तयार करण्याचा घाट घातला आहे.कळणेतल्या या बेकायदेशीर मायनिंगचा अहवाल- 2009 पासून अतिक्रमण झाल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी- 27-29 डिसें. 2011 : कोल्हापूरच्या खनिकर्म संचालनालयाकडून कळणे मायनिंगची तपासणी- खनिकर्म विभागाच्या तपासणीत सर्व्हे नंबर 57(5) मध्ये अतिक्रमण झाल्याचं उघड- अतिक्रमण करून 9 लाख 99 हजार 472 घन मीटर अवैध उत्खनन झाल्याचं उघड- सुमारे 6 ते 7 हजार कोटींचं अवैध खनिज काढल्याचा अंदाज- 7 जाने. 2012 : कोल्हापूर खनिकर्म विभागाने नागपूरच्या खनिकर्म विभागाला पाठवला अहवाल- आ. परशुराम उपरकर यांनी विधान परिषदेत उपस्थित केला प्रश्न- खाण राज्यमंत्री सचिन अहिर यांचं अहवाल मिळाला नसल्याचं स्पष्टीकरण- 4 मे 2012 : नागपूर खनिकर्म विभागाकडून कळणे मायनिंगची फेरतपासणी- पाहणी अहवालाबाबत गुप्तता- अहवालानंतरही अवैध खाणकाम अजून सुरूच कळणे मायनिंगबाबत आलेल्या तक्रारीवरून कोल्हापूरच्या खनिकर्म संचालनालयानं डिसेंबर 2011 मध्ये तपासणी केली . आणि 7 जानेवारीला मोठ्या प्रमाणात अवैध खाणकाम झालं असल्याचा अहवाल नागपूर च्या वरीष्ठ कार्यालयाला सादर केला . हा अहवाल सिंधुदुर्गच्या जिल्हाधिका-यांनाही सादर करण्यात आलेला होता. मात्र याबाबत लक्षात आणून देऊन सुध्दा सिंधुदुर्गच्या जिल्हाधिका-यांनीही कोणतीही कारवाई केलेली नाही, असं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. गोपाळ दुखंडे यांनी व्यक्त केलंय.गावकर्‍यांचा तीन वर्षापासून लढाकळणे गावात होणार्‍या या अवैध मायनिंगविरोधात गावकर्‍यांनीही 3 वर्षांपूर्वी लढा सुरू केलंय. पण त्यांचं ऐकणारं कुणीच नाही अशीच परिस्थिती आहे. या मायनिंगचे गंभीर दुष्परिणाम आता दिसू लागले आहे. 3 वर्षांपूर्वी हिरवागार असलेला कळणेचा हा डोंगर आता मायनिंगमुळे उजाड झाला आहे. मिनेरल्स अँड मेटल्स या कंपनीने तर थेट वन जमिनीच्या जवळच उत्खनन केलंय. या सगळ्यामुळे इथली काजू बागायत धोक्यात आलीय. काजूच्या झाडाझाडावर असे मातीचे थर आहेत. कळणेचं हे मायनिंग विरोधातलं आंदोलन सुरू असताना सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला आणि त्यात 16 आंदोलकांवर 302 चे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे मायनिंगविरोधातला लढा कमकुवत झाला. कळणे गावाचा आजही या मायनिंगला तीव्र विरोध आहे. 19 मार्चला दरवर्षी कळण्यामध्ये काळा दिवस पाळला जातो. मात्र या मायनिंगच्या दुष्परिणामांचे गांभीर्य कोणत्याही राजकीय नेत्याला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2012 04:57 PM IST

सिंधुदुर्गात 7 हजार कोटींचं अवैध खाणकाम

14 मे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कळणेमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर खाणकाम सुरू आहे. याबद्दलचा सरकारी अहवाल आयबीएन लोकमतच्या हाती लागला आहे. या अहवालात कळणेमध्ये तब्बल 7 हजार कोटींचं अवैध खाणकाम झाल्याचा अहवाल कोल्हापूरच्या खनिकर्म विभागाने दिला आहे. पण अजूनही हे बेकायदा खाणकाम सुरूच आहे. इतकंच नाही तर दहा दिवसांपूर्वी नागपूरच्या खनिकर्म विभागाने नव्याने अहवाल तयार करण्याचा घाट घातला आहे. नव्या अहवालाबाबत कमालीची गुप्तता पाळली जातेय.

हरित कोकणाला आता बेकायदेशीर खाणकामाने पोखरुन काढले आहे. याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेचा तीव्र विरोध असूनही तीन वर्षांपूर्वी चालू झालेल्या कळणे मायनिंग मधून तब्बल दहा लाख घनमीटर एवढं अवैध उत्खनन झाल्याचा निष्कर्ष सरकारच्याच खनिकर्म विभागाने काढला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या उत्खननातून सुमारे 7 हजार कोटींचं निर्यातक्षम खनिज निघालं असावं असा खनिज तज्ञांचा अंदाज आहे. बेकायदा खनिज उत्खनन होऊनही मायनिंग अजून सुरूच आहे. कोल्हापूरच्या खनिकर्म संचालनालयाने 7 जानेवारीला नागपूरच्या वरिष्ठ कार्यालयाला दिलेला हा अहवाल आयबीएन लोकमतच्याही हाती आला असून या अहवालात कळणे मायनिंगच्या अवैध खाणकामाबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय. या अहवालावर विधानसभेतही प्रश्न उपस्थित झाला. मात्र त्यानंतर पुन्हा नागपूरच्या खनिकर्म संचालनालयाने दहा दिवसांपूर्वी कळ्णे मायनिंगची पुन्हा तपासणी करून नवीन अहवाल तयार करण्याचा घाट घातला आहे.

कळणेतल्या या बेकायदेशीर मायनिंगचा अहवाल

- 2009 पासून अतिक्रमण झाल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी- 27-29 डिसें. 2011 : कोल्हापूरच्या खनिकर्म संचालनालयाकडून कळणे मायनिंगची तपासणी- खनिकर्म विभागाच्या तपासणीत सर्व्हे नंबर 57(5) मध्ये अतिक्रमण झाल्याचं उघड- अतिक्रमण करून 9 लाख 99 हजार 472 घन मीटर अवैध उत्खनन झाल्याचं उघड- सुमारे 6 ते 7 हजार कोटींचं अवैध खनिज काढल्याचा अंदाज- 7 जाने. 2012 : कोल्हापूर खनिकर्म विभागाने नागपूरच्या खनिकर्म विभागाला पाठवला अहवाल- आ. परशुराम उपरकर यांनी विधान परिषदेत उपस्थित केला प्रश्न- खाण राज्यमंत्री सचिन अहिर यांचं अहवाल मिळाला नसल्याचं स्पष्टीकरण- 4 मे 2012 : नागपूर खनिकर्म विभागाकडून कळणे मायनिंगची फेरतपासणी- पाहणी अहवालाबाबत गुप्तता- अहवालानंतरही अवैध खाणकाम अजून सुरूच

कळणे मायनिंगबाबत आलेल्या तक्रारीवरून कोल्हापूरच्या खनिकर्म संचालनालयानं डिसेंबर 2011 मध्ये तपासणी केली . आणि 7 जानेवारीला मोठ्या प्रमाणात अवैध खाणकाम झालं असल्याचा अहवाल नागपूर च्या वरीष्ठ कार्यालयाला सादर केला . हा अहवाल सिंधुदुर्गच्या जिल्हाधिका-यांनाही सादर करण्यात आलेला होता. मात्र याबाबत लक्षात आणून देऊन सुध्दा सिंधुदुर्गच्या जिल्हाधिका-यांनीही कोणतीही कारवाई केलेली नाही, असं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. गोपाळ दुखंडे यांनी व्यक्त केलंय.

गावकर्‍यांचा तीन वर्षापासून लढा

कळणे गावात होणार्‍या या अवैध मायनिंगविरोधात गावकर्‍यांनीही 3 वर्षांपूर्वी लढा सुरू केलंय. पण त्यांचं ऐकणारं कुणीच नाही अशीच परिस्थिती आहे. या मायनिंगचे गंभीर दुष्परिणाम आता दिसू लागले आहे.

3 वर्षांपूर्वी हिरवागार असलेला कळणेचा हा डोंगर आता मायनिंगमुळे उजाड झाला आहे. मिनेरल्स अँड मेटल्स या कंपनीने तर थेट वन जमिनीच्या जवळच उत्खनन केलंय. या सगळ्यामुळे इथली काजू बागायत धोक्यात आलीय. काजूच्या झाडाझाडावर असे मातीचे थर आहेत. कळणेचं हे मायनिंग विरोधातलं आंदोलन सुरू असताना सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला आणि त्यात 16 आंदोलकांवर 302 चे गुन्हे दाखल करण्यात आले.

त्यामुळे मायनिंगविरोधातला लढा कमकुवत झाला. कळणे गावाचा आजही या मायनिंगला तीव्र विरोध आहे. 19 मार्चला दरवर्षी कळण्यामध्ये काळा दिवस पाळला जातो. मात्र या मायनिंगच्या दुष्परिणामांचे गांभीर्य कोणत्याही राजकीय नेत्याला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 14, 2012 04:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close