S M L

25 वाघांच्या शिकारीची घेतली ऑर्डर

16 मेज्याच्या नावानं सुध्दा मनात धडकी भरते..अशा 25 वाघांची सुपारी घेतली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत वाघांच्या शिकारीचं प्रमाण वाढलंय. त्यातच वाघांची शिकार करणार्‍या बहेलिया जमातीला 25 वाघांची शिकार करण्याची ऑर्डर मिळाली आहे आणि त्यासाठी 40 लाख रुपयांची रक्कम आगाऊ देण्यात आली आहे असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी महाराष्ट्र सरकारला दिला आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याची खबरदारी घेत जंगलातल्या सगळ्या पाणवठ्यांवरची गस्त वाढवण्यात आली आहे. वाघांसाठीचे सापळे लावण्यात आल्याची माहिती देणार्‍याला 5 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करावं, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कोणताही फॉरेस्ट गार्ड किंवा वन कर्मचार्‍याने 15 जूनपर्यंत रजा घेऊ नये, असे आदेश देण्यात आले. वन्यजीव विभागाच्या अतिरिक्त प्रधान वन सचिवांकडे प्रत्येक पाणवठ्यांची माहिती पुरवणारी डिजिटल इमेज पोहोचवण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 16, 2012 06:01 PM IST

25 वाघांच्या शिकारीची घेतली ऑर्डर

16 मे

ज्याच्या नावानं सुध्दा मनात धडकी भरते..अशा 25 वाघांची सुपारी घेतली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत वाघांच्या शिकारीचं प्रमाण वाढलंय. त्यातच वाघांची शिकार करणार्‍या बहेलिया जमातीला 25 वाघांची शिकार करण्याची ऑर्डर मिळाली आहे आणि त्यासाठी 40 लाख रुपयांची रक्कम आगाऊ देण्यात आली आहे असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी महाराष्ट्र सरकारला दिला आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याची खबरदारी घेत जंगलातल्या सगळ्या पाणवठ्यांवरची गस्त वाढवण्यात आली आहे. वाघांसाठीचे सापळे लावण्यात आल्याची माहिती देणार्‍याला 5 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करावं, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कोणताही फॉरेस्ट गार्ड किंवा वन कर्मचार्‍याने 15 जूनपर्यंत रजा घेऊ नये, असे आदेश देण्यात आले. वन्यजीव विभागाच्या अतिरिक्त प्रधान वन सचिवांकडे प्रत्येक पाणवठ्यांची माहिती पुरवणारी डिजिटल इमेज पोहोचवण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2012 06:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close