S M L

सीना कोळेगाव धरणाचं पाणी पेटलं

18 मेसीना कोळेगाव धरणाच्या पाण्याचा वाद आता पुन्हा एकदा पेटला आहे. सीना कोळेगावला पाणी द्यायला उस्मानाबादकरांनी पुन्हा एकदा जोरदार विरोध केला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आदेश दिल्यानंतरही या आदेशाला न जुमानता उस्मानाबादकरांनी प्रखर विरोध केला आहे. आज सर्वपक्षीय नेत्यांसह शेतकर्‍यांनी धरणावर जाऊन आंदोलन सुरु केलं आहे. सीना काळेगाव धरणाच्या मुद्द्यावरून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आमने सामने उभे ठाकले आहे. 10 मे रोजी सीना-कोळगाव धरणाचं पाणी सोलापुरला देण्याचा निर्णय सरकारने स्थगित दिली होती. या निर्णयाच्या विरोधात उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्रीत येऊन तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता.कोणत्याही परिस्थितीत या धरणातील पाणी सोलापूरला देणार नाही या आपल्या भूमिकेवर ठाम असलेल्या स्थानिक आमदार राहुल मोटे यांनी ठणकावून सांगितलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2012 10:48 AM IST

सीना कोळेगाव धरणाचं पाणी पेटलं

18 मे

सीना कोळेगाव धरणाच्या पाण्याचा वाद आता पुन्हा एकदा पेटला आहे. सीना कोळेगावला पाणी द्यायला उस्मानाबादकरांनी पुन्हा एकदा जोरदार विरोध केला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आदेश दिल्यानंतरही या आदेशाला न जुमानता उस्मानाबादकरांनी प्रखर विरोध केला आहे. आज सर्वपक्षीय नेत्यांसह शेतकर्‍यांनी धरणावर जाऊन आंदोलन सुरु केलं आहे. सीना काळेगाव धरणाच्या मुद्द्यावरून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आमने सामने उभे ठाकले आहे. 10 मे रोजी सीना-कोळगाव धरणाचं पाणी सोलापुरला देण्याचा निर्णय सरकारने स्थगित दिली होती. या निर्णयाच्या विरोधात उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्रीत येऊन तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता.कोणत्याही परिस्थितीत या धरणातील पाणी सोलापूरला देणार नाही या आपल्या भूमिकेवर ठाम असलेल्या स्थानिक आमदार राहुल मोटे यांनी ठणकावून सांगितलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2012 10:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close