S M L

ठाण्यात 'श्रीश'च्या बांधकामाला स्थगिती

17 मेठाण्यातल्या श्रीश सोसायटीतल्या सर्व बांधकामांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थगिती दिली आहे. कायदेशीर तरतुदींचा अवलंब न करता स्थगिती देण्यात आल्याचा आरोप आता केला जातोय. मुख्यमंत्र्यांनी राजीव सावंत या बिल्डरच्या बाजूने हा आदेश दिल्याचा आरोप होतोय. यापूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी या बिल्डरविरोधात सचिवांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी केल्या होत्या. बिल्डरची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे, असा दावा खडसेंनी केला होता. पण नंतर एकनाथ खडसे यांनीच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याच बिल्डरलाच काम द्यावं अशी मागणी केली. नगरविकास विभागाने या प्रकरणात दिलेली स्थगिती उठवणं योग्य ठरेल असा प्रस्ताव आता मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. यामुळे वरदवास्तू कन्स्ट्रक्शनचे बिल्डर राजीव सावंत, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यातलं संगनमत समोर आलंय असं रहिवाश्यांचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2012 03:03 PM IST

ठाण्यात 'श्रीश'च्या बांधकामाला स्थगिती

17 मे

ठाण्यातल्या श्रीश सोसायटीतल्या सर्व बांधकामांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थगिती दिली आहे. कायदेशीर तरतुदींचा अवलंब न करता स्थगिती देण्यात आल्याचा आरोप आता केला जातोय. मुख्यमंत्र्यांनी राजीव सावंत या बिल्डरच्या बाजूने हा आदेश दिल्याचा आरोप होतोय. यापूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी या बिल्डरविरोधात सचिवांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी केल्या होत्या. बिल्डरची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे, असा दावा खडसेंनी केला होता. पण नंतर एकनाथ खडसे यांनीच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याच बिल्डरलाच काम द्यावं अशी मागणी केली. नगरविकास विभागाने या प्रकरणात दिलेली स्थगिती उठवणं योग्य ठरेल असा प्रस्ताव आता मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. यामुळे वरदवास्तू कन्स्ट्रक्शनचे बिल्डर राजीव सावंत, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यातलं संगनमत समोर आलंय असं रहिवाश्यांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2012 03:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close