S M L

अखेर बहिष्काराचा 'पेपर' सुटला

17 मेतब्बल दीड महिने प्राध्यापकांनी पेपरतपासणीवरचा बहिष्कार अखेर मागे घेतला आहे. प्राध्यापकांच्या मागण्या मान्य तर झाल्याचं असून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी प्राध्यापक संघटना एम फुक्टोला आश्वासनांचं सुधारित पत्र सुध्दा सूपूर्द केलं आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे प्राध्यापकांनी संप मागे घेतला आहे. तसेच ताबडतोब पेपर तपासणीचं आवाहन राजेश टोपे यांनी प्राध्यापकांना केलं आहे. मात्र,दीड महिने संप करणार्‍या प्राध्यापकांचा पगार कपात आणि कारवाईबद्दल टोपे यांनी मुख्यमंत्र्यांकडे चेंडू टोलावला आहे. नेट सेट धारक, सहावा वेतन आदी मागण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून 10 विद्यापीठातील सुमारे 40 हजार प्राध्यापकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. या संपामुळे कोणत्याचं परीक्षांचे पेपर तपासले गेले नसल्यामुळे निकाल कधी लागणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. निकाल उशीरा लागल्यामुळे पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मोठ्या अडचणीला विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागण्याची चित्र निर्माण झाले. 40 दिवसानंतर सरकारने प्राध्यापक संघटनेशी बैठक घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्यात पण लेखी आश्वासन देण्यास नकार दिल्यामुळे प्राध्यापकांनी बहिष्कार कायम ठेवतं आंदोलन तीव्र केलं. मागिल आठवड्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी प्राध्यापकांवर थेट कारवाई करा असे आदेश देऊ केले होते. मात्र प्राध्यापकांनी आदेशाला कचर्‍याची टोपली दाखवली. अखेर आज राजेश टोपे यांनी प्राध्यापक संघटनेला आश्वासनांचं सुधारित पत्र नुकतंच सूपूर्द केलं आहे. नेट सेट धारक प्राध्यापकांच्या प्रश्नावर जून अखेरपर्यंत निर्णय घेऊन जीआर काढण्याचे आश्वासन यामध्ये देण्यात आलं आहे. तसेच सहाव्या वेतन आयोगाचे प्राध्यापकांच्या 10 महिन्यांच्या थकबाकीचे रोख हप्ते दोन टप्प्यात देणार आहेत. एक हप्ता जून महिन्यात देणार तर दुसरा हप्ता पुढील वर्षी एप्रिल महिन्यात देणार असंही सांगण्यात आलं होतं. या नव्या लेखी आश्वासनांनंतर प्राध्यापक संघटनेची आज मुंबईमध्ये बैठक पार पडली यामध्ये पेपरतपासणीवरचा बहिष्कार मागे घेण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2012 12:16 PM IST

अखेर बहिष्काराचा 'पेपर' सुटला

17 मेतब्बल दीड महिने प्राध्यापकांनी पेपरतपासणीवरचा बहिष्कार अखेर मागे घेतला आहे. प्राध्यापकांच्या मागण्या मान्य तर झाल्याचं असून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी प्राध्यापक संघटना एम फुक्टोला आश्वासनांचं सुधारित पत्र सुध्दा सूपूर्द केलं आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे प्राध्यापकांनी संप मागे घेतला आहे. तसेच ताबडतोब पेपर तपासणीचं आवाहन राजेश टोपे यांनी प्राध्यापकांना केलं आहे. मात्र,दीड महिने संप करणार्‍या प्राध्यापकांचा पगार कपात आणि कारवाईबद्दल टोपे यांनी मुख्यमंत्र्यांकडे चेंडू टोलावला आहे. नेट सेट धारक, सहावा वेतन आदी मागण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून 10 विद्यापीठातील सुमारे 40 हजार प्राध्यापकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. या संपामुळे कोणत्याचं परीक्षांचे पेपर तपासले गेले नसल्यामुळे निकाल कधी लागणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. निकाल उशीरा लागल्यामुळे पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मोठ्या अडचणीला विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागण्याची चित्र निर्माण झाले.

40 दिवसानंतर सरकारने प्राध्यापक संघटनेशी बैठक घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्यात पण लेखी आश्वासन देण्यास नकार दिल्यामुळे प्राध्यापकांनी बहिष्कार कायम ठेवतं आंदोलन तीव्र केलं. मागिल आठवड्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी प्राध्यापकांवर थेट कारवाई करा असे आदेश देऊ केले होते. मात्र प्राध्यापकांनी आदेशाला कचर्‍याची टोपली दाखवली. अखेर आज राजेश टोपे यांनी प्राध्यापक संघटनेला आश्वासनांचं सुधारित पत्र नुकतंच सूपूर्द केलं आहे. नेट सेट धारक प्राध्यापकांच्या प्रश्नावर जून अखेरपर्यंत निर्णय घेऊन जीआर काढण्याचे आश्वासन यामध्ये देण्यात आलं आहे.

तसेच सहाव्या वेतन आयोगाचे प्राध्यापकांच्या 10 महिन्यांच्या थकबाकीचे रोख हप्ते दोन टप्प्यात देणार आहेत. एक हप्ता जून महिन्यात देणार तर दुसरा हप्ता पुढील वर्षी एप्रिल महिन्यात देणार असंही सांगण्यात आलं होतं. या नव्या लेखी आश्वासनांनंतर प्राध्यापक संघटनेची आज मुंबईमध्ये बैठक पार पडली यामध्ये पेपरतपासणीवरचा बहिष्कार मागे घेण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2012 12:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close