S M L

देख..तमाशा आयपीएलचा !

18 मे20 ओव्हरची मॅच, प्रत्येक ओव्हरमध्ये चौकार, षटकारांची बरसात आणि याच चौकार, षटकारांवर अर्धनग्न नाचणार्‍या चिअर्स गर्ल...असा भव्य दिव्य इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल)चा आखाडा आता चागलाच 'चिखला'त रुतत चालला आहे. अलीकडेच फिक्सिंगच भूत पुन्हा एकदा मानगुटीवर बसत नाही तोच कोलकाता नाईट रायडर्सचा मालक आणि बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने केलेल्या 'डॉन'गिरीमुळे वानखेडेवर पाचवर्षाची बंदी लावून घेतली आहे. हे वादळ शमत नाही. तोच बंगलोर टीमच्या ल्यूकने एका अमेरिकन महिलेची छेडछाड केल्याचा गुन्हा केला आहे. यामुळे आयपीएलवर सर्वच स्थरातून टीकेची बरसात होतं आहे. काही संसद सदस्यांनी हा तमाशा बंद करा अशी मागणी केली आहे. 'देवदास'ला 'डॉन'गिरी भोवलीक्रिकेट हा मुळात जन्टलमॅन लोकांचा खेळ पण काळानूसार त्याला 'सुपरमॅन'च्या रुपाने आयपीएलच्या मैदानात प्रकट झालाय. पण काल बुधवारी कोलकाताने विजयी स्वारी केल्यानंतर टीमचा मालक शाहरुख खानने वानखेडे स्टेडियमवर सुरक्षा रक्षकांना आणि एमसीएच्या पदाधिकार्‍यांनी शिवीगाळ,मारहाण केली. याप्रकरणामुळे आज एमसीएने शाहरुखला वानखेडेवर 5 वर्षाची बंदी घातली. आज सकाळी एमसीएचे अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली. पण याच मुद्द्यावरून MCA आणि BCCI सुद्धा आमनेसामने आले आहे. अशी बंदी घालण्याचा अधिकार फक्त बीसीसीआयला आहे, एमसीएला नाही, असं आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी म्हटलं आहे. एमसीए केवळ तशी शिफारस करू शकतं, असंही शुक्लांनी ठणकावून सांगितलं. पण आता यावादावर आता बीसीसीआयची इनिंग अजून बाकी आहे त्यामुळे आता बीसीसीआय काय निर्णय घेते ते लवकरच कळेल.पण हा वाद थांबत नाही तोच आणखी एका वादाचा जन्म झाला. महिलेची छेडछाड केल्याचा गुन्हारॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा खेळाडू ल्यूक पॉमर्शबॅकवर महिलेची छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी त्याला उद्यापर्यंतचा अंतरीम जामीनही मिळाला. दिल्लीतल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ल्यूकनं छेड काढल्याचा आरोप एका अमेरिकन महिलेनं केला आहे. या हॉटेलमधल्या पार्टीनंतर पहाटे ल्यूक आपल्या रुममध्ये आला आणि त्यानं आपली छेड काढली. त्याला विरोध करणार्‍या आपल्या भावी पतीलाही ल्यूकनं मारहाण केली, त्यात तो जखमी झाला असा आरोप या महिलेने केला आहे. पण या जोडप्यानंच आपल्याला त्यांच्या रुममध्ये बोलावलं आणि महिलेच्या भावी पतीनं आपल्याशी वाद घातला, असं ल्यूकचं म्हणणं आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होईल. दरम्यान, केस मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव येत असल्याचा दावा अमेरिकन महिलनं केला आहे. दरम्यान, ल्यूकला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या टीममधून वगळण्यात आलंय. या आरोपातून ल्यूक दोषमुक्त होत नाही, तोपर्यंत त्याला टीममध्ये घेणार नाही, असं टीमचे मालक विजय माल्या यांनी सांगितलंय. पण ल्यूक पॉमर्शबॅकचं बंगलोरचा मालक सिद्धार्थ माल्ल्यानं ट्विटरवरुन समर्थन केलं आहे आणि या महिलेच्याच चारित्राविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. 'ल्यूकवर आपल्या भावी पतीला मारहाणीचा आरोप करणारी मुलगी काल रात्री माझ्यासोबतच होती. जर तो तिचा भावी पती आहे, तर मग तिची वर्तवणूक भावी पत्नीसारखी नव्हती. ही मुलगी जे करतेय ते मूर्खपणाचं आहे.' असं सिद्धार्थनं म्हटलंय. सिध्दार्थ माल्याची पत्रकारांशी हुज्जत दरम्यान, या मुद्द्यावर सिद्धार्थ माल्याची प्रतिक्रिया घ्यायला गेलेल्या पत्रकारांना त्याच्या रोषाला सामोरं जावं लागलं. चिडलेल्या सिद्धार्थनं पत्रकारांशी वादावादी केली. आरसीबीचा खेळाडू ल्यूक पामर्शबॅक सिद्धार्थ माल्यानं मात्र त्याचं ट्विटरवरुन जोरदार समर्थन केलंय. तक्रारदार मुलीनं तिच्या भावी पतीला ल्यूकनं मारहाण केल्याचा आरोप करत त्याची वर्तणूक चांगली नसल्याचा दावा त्या मुलीनं केला. तर ती मुलगी कालच्या रात्री माझ्यासोबत होती, मग तिच्या वर्तणुकीविषयी काय, असा सवालही सिद्धार्थ माल्याने उपस्थित केला आहे. पार्टीच्या रात्री तिथं काय घडलं याची जबाबदारी आयपीएलची नाही, असं स्पष्टीकरण आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिलंय.'हा तमाशा थांबवा' वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या आयपीएलवर आता बंधनं घातली पाहिजे, असा सूर उमटू लागला आहे. अतिशय भव्यदिव्य अशीच प्रतिमा असलेल्या IPLचं हे पाचवं वर्ष आहे. खेळाडूंचा लिलाव, यातला अमाप पैसा, प्रसिद्धी, पाटर्‌या यावर गेल्या पाच वर्षात अनेकवेळा टीकाही झाली. पण या झगमगाटाला गेल्या आठवड्यातल्या काही घटनांमुळे गालबोट लागलंय. त्यामुळे काही खासदारांनी आयपीएलवरच टीकेची छोड उठवली आहे. भाजपचे खासदार यशवंत सिन्हा यांनी हा क्रिकेटचा नंगा नाच थांबवण्यात यावा अशी मागणी केली आहेत तर खासदार कीर्ती आझाद यांनी आयपीएल नुसता तमाशा बनला आहे. अर्धनग्न नाचणार्‍या मुली,पैसा उडवणारे लोक यामुळे समाजावर विपरित परिणाम होत आहे हे वेळी थांबवलं पाहिजे अशी मागणी केली आहे.मात्र, झटपट प्रसिध्द झालेल्या आयपीएलवादाच्या दलदलीत अडकत चालला आहे. पण हा वाद एका वादाला शह देण्यासाठी होतं आहे का ? गंभीर वादातून पळवाट काढण्यासाठी रंगलेला हा सामना आहे का ? किंवा हा पैशाचा उपद्रव्याप आहे का ? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य प्रेक्षक करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2012 05:15 PM IST

देख..तमाशा आयपीएलचा !

18 मे

20 ओव्हरची मॅच, प्रत्येक ओव्हरमध्ये चौकार, षटकारांची बरसात आणि याच चौकार, षटकारांवर अर्धनग्न नाचणार्‍या चिअर्स गर्ल...असा भव्य दिव्य इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल)चा आखाडा आता चागलाच 'चिखला'त रुतत चालला आहे. अलीकडेच फिक्सिंगच भूत पुन्हा एकदा मानगुटीवर बसत नाही तोच कोलकाता नाईट रायडर्सचा मालक आणि बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने केलेल्या 'डॉन'गिरीमुळे वानखेडेवर पाचवर्षाची बंदी लावून घेतली आहे. हे वादळ शमत नाही. तोच बंगलोर टीमच्या ल्यूकने एका अमेरिकन महिलेची छेडछाड केल्याचा गुन्हा केला आहे. यामुळे आयपीएलवर सर्वच स्थरातून टीकेची बरसात होतं आहे. काही संसद सदस्यांनी हा तमाशा बंद करा अशी मागणी केली आहे.

'देवदास'ला 'डॉन'गिरी भोवली

क्रिकेट हा मुळात जन्टलमॅन लोकांचा खेळ पण काळानूसार त्याला 'सुपरमॅन'च्या रुपाने आयपीएलच्या मैदानात प्रकट झालाय. पण काल बुधवारी कोलकाताने विजयी स्वारी केल्यानंतर टीमचा मालक शाहरुख खानने वानखेडे स्टेडियमवर सुरक्षा रक्षकांना आणि एमसीएच्या पदाधिकार्‍यांनी शिवीगाळ,मारहाण केली. याप्रकरणामुळे आज एमसीएने शाहरुखला वानखेडेवर 5 वर्षाची बंदी घातली. आज सकाळी एमसीएचे अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली. पण याच मुद्द्यावरून MCA आणि BCCI सुद्धा आमनेसामने आले आहे. अशी बंदी घालण्याचा अधिकार फक्त बीसीसीआयला आहे, एमसीएला नाही, असं आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी म्हटलं आहे. एमसीए केवळ तशी शिफारस करू शकतं, असंही शुक्लांनी ठणकावून सांगितलं. पण आता यावादावर आता बीसीसीआयची इनिंग अजून बाकी आहे त्यामुळे आता बीसीसीआय काय निर्णय घेते ते लवकरच कळेल.पण हा वाद थांबत नाही तोच आणखी एका वादाचा जन्म झाला.

महिलेची छेडछाड केल्याचा गुन्हा

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा खेळाडू ल्यूक पॉमर्शबॅकवर महिलेची छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी त्याला उद्यापर्यंतचा अंतरीम जामीनही मिळाला. दिल्लीतल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ल्यूकनं छेड काढल्याचा आरोप एका अमेरिकन महिलेनं केला आहे. या हॉटेलमधल्या पार्टीनंतर पहाटे ल्यूक आपल्या रुममध्ये आला आणि त्यानं आपली छेड काढली. त्याला विरोध करणार्‍या आपल्या भावी पतीलाही ल्यूकनं मारहाण केली, त्यात तो जखमी झाला असा आरोप या महिलेने केला आहे. पण या जोडप्यानंच आपल्याला त्यांच्या रुममध्ये बोलावलं आणि महिलेच्या भावी पतीनं आपल्याशी वाद घातला, असं ल्यूकचं म्हणणं आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होईल. दरम्यान, केस मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव येत असल्याचा दावा अमेरिकन महिलनं केला आहे. दरम्यान, ल्यूकला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या टीममधून वगळण्यात आलंय. या आरोपातून ल्यूक दोषमुक्त होत नाही, तोपर्यंत त्याला टीममध्ये घेणार नाही, असं टीमचे मालक विजय माल्या यांनी सांगितलंय.

पण ल्यूक पॉमर्शबॅकचं बंगलोरचा मालक सिद्धार्थ माल्ल्यानं ट्विटरवरुन समर्थन केलं आहे आणि या महिलेच्याच चारित्राविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. 'ल्यूकवर आपल्या भावी पतीला मारहाणीचा आरोप करणारी मुलगी काल रात्री माझ्यासोबतच होती. जर तो तिचा भावी पती आहे, तर मग तिची वर्तवणूक भावी पत्नीसारखी नव्हती. ही मुलगी जे करतेय ते मूर्खपणाचं आहे.' असं सिद्धार्थनं म्हटलंय. सिध्दार्थ माल्याची पत्रकारांशी हुज्जत दरम्यान, या मुद्द्यावर सिद्धार्थ माल्याची प्रतिक्रिया घ्यायला गेलेल्या पत्रकारांना त्याच्या रोषाला सामोरं जावं लागलं. चिडलेल्या सिद्धार्थनं पत्रकारांशी वादावादी केली. आरसीबीचा खेळाडू ल्यूक पामर्शबॅक सिद्धार्थ माल्यानं मात्र त्याचं ट्विटरवरुन जोरदार समर्थन केलंय. तक्रारदार मुलीनं तिच्या भावी पतीला ल्यूकनं मारहाण केल्याचा आरोप करत त्याची वर्तणूक चांगली नसल्याचा दावा त्या मुलीनं केला. तर ती मुलगी कालच्या रात्री माझ्यासोबत होती, मग तिच्या वर्तणुकीविषयी काय, असा सवालही सिद्धार्थ माल्याने उपस्थित केला आहे. पार्टीच्या रात्री तिथं काय घडलं याची जबाबदारी आयपीएलची नाही, असं स्पष्टीकरण आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिलंय.'हा तमाशा थांबवा'

वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या आयपीएलवर आता बंधनं घातली पाहिजे, असा सूर उमटू लागला आहे. अतिशय भव्यदिव्य अशीच प्रतिमा असलेल्या IPLचं हे पाचवं वर्ष आहे. खेळाडूंचा लिलाव, यातला अमाप पैसा, प्रसिद्धी, पाटर्‌या यावर गेल्या पाच वर्षात अनेकवेळा टीकाही झाली. पण या झगमगाटाला गेल्या आठवड्यातल्या काही घटनांमुळे गालबोट लागलंय. त्यामुळे काही खासदारांनी आयपीएलवरच टीकेची छोड उठवली आहे. भाजपचे खासदार यशवंत सिन्हा यांनी हा क्रिकेटचा नंगा नाच थांबवण्यात यावा अशी मागणी केली आहेत तर खासदार कीर्ती आझाद यांनी आयपीएल नुसता तमाशा बनला आहे. अर्धनग्न नाचणार्‍या मुली,पैसा उडवणारे लोक यामुळे समाजावर विपरित परिणाम होत आहे हे वेळी थांबवलं पाहिजे अशी मागणी केली आहे.

मात्र, झटपट प्रसिध्द झालेल्या आयपीएलवादाच्या दलदलीत अडकत चालला आहे. पण हा वाद एका वादाला शह देण्यासाठी होतं आहे का ? गंभीर वादातून पळवाट काढण्यासाठी रंगलेला हा सामना आहे का ? किंवा हा पैशाचा उपद्रव्याप आहे का ? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य प्रेक्षक करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2012 05:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close