S M L

'अर्थ'गणित जुळवण्यासाठी प्रणवदांचा काटकसरीचा सल्ला

18 मेजगभरातल्या अर्थव्यवस्थांसाठी सध्या कठीण काळ आहे. भारतालाही याची धग बसली आहे भारतावरचं वाढतं कर्ज आणि घसरणारा रुपया यातून अर्थव्यवस्था सावरण्यासाठी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी काटकसरीचं धोरण राबवायला सुरुवात केली आहे. यासाठी अर्थमंत्र्यांनी काही निर्णय घेतले आहे.संरक्षण विभाग वगळता इतर सर्वच सरकारी विभागांमध्ये नवीन गाड्या खरेदीवर बंदी घालण्यात आली आहे. गेल्यावर्षीही हा निर्णय घेण्यात आला होता. याशिवाय अधिकार्‍यांच्या परदेश वार्‍यांनाही कात्री लावण्यात आलीय. फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये होणार्‍या सरकारी परिसंवादांच्या खर्चातही 10 टक्क्यांची कपात करण्यात आलीय. तसेच भारतावर सध्या 39 लाख कोटींचं कर्ज आहे. काटकसरीच्या या उपायांमुळे सरकारी खर्चात फक्त 3 टक्क्यांची बचत होणार आहे. त्यामुळे या काटकसरीचा फारसा उपयोग नाही, असं विरोधकांना वाटतंय. गेल्यावर्षीही अशाप्रकारे काटकसर करण्यात आली होती. पण आनंद शर्मा आणि शरद पवारांसारख्या काही नेत्यांनी त्यावर नाराजीही व्यक्त केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2012 05:45 PM IST

'अर्थ'गणित जुळवण्यासाठी प्रणवदांचा काटकसरीचा सल्ला

18 मे

जगभरातल्या अर्थव्यवस्थांसाठी सध्या कठीण काळ आहे. भारतालाही याची धग बसली आहे भारतावरचं वाढतं कर्ज आणि घसरणारा रुपया यातून अर्थव्यवस्था सावरण्यासाठी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी काटकसरीचं धोरण राबवायला सुरुवात केली आहे. यासाठी अर्थमंत्र्यांनी काही निर्णय घेतले आहे.संरक्षण विभाग वगळता इतर सर्वच सरकारी विभागांमध्ये नवीन गाड्या खरेदीवर बंदी घालण्यात आली आहे. गेल्यावर्षीही हा निर्णय घेण्यात आला होता. याशिवाय अधिकार्‍यांच्या परदेश वार्‍यांनाही कात्री लावण्यात आलीय. फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये होणार्‍या सरकारी परिसंवादांच्या खर्चातही 10 टक्क्यांची कपात करण्यात आलीय. तसेच भारतावर सध्या 39 लाख कोटींचं कर्ज आहे. काटकसरीच्या या उपायांमुळे सरकारी खर्चात फक्त 3 टक्क्यांची बचत होणार आहे. त्यामुळे या काटकसरीचा फारसा उपयोग नाही, असं विरोधकांना वाटतंय. गेल्यावर्षीही अशाप्रकारे काटकसर करण्यात आली होती. पण आनंद शर्मा आणि शरद पवारांसारख्या काही नेत्यांनी त्यावर नाराजीही व्यक्त केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2012 05:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close