S M L

काळू धरणात कॉन्ट्रक्टरची हेराफेरी ?

21 मेठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यात दोन वर्षांपूर्वी काळू धरणाचं बांधकाम सुरु करण्यात आलं. धरणाच्या टेंडरची रक्कम कशी बेकायदेशीर वाढवण्यात आली. काळू धरणाच्या बांधकामाला मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली. पण या धरणाच्या निमित्ताने कोट्यवधींची टेंडर कशी लाटली जातात हेच उघड होतंय.टेंडर भरतानाच घोळसुरुवात झाली एफ.ए. एंटरप्रायझेसने भरलेल्या टेंडरपासून.निसार आणि फतेह मोहम्मद खत्री या कॉन्ट्रॅक्टरनी धरणाच्या बांधकामासाठी दोन टेंडर भरलीपण टेंडर भरणार्‍या दोन कंपन्यांचे मालक मात्र प्रत्यक्षात समान आहे. एफ.ए. एंटरप्रायझेस आणि एफ.ए. कन्स्ट्रक्शन कंपनी नावांनी हे कॉन्ट्रक्टर टेंडर भरतात.वाढीव बिडिंगधरणाच्या मूळ किमतीपेक्षा तब्बल 47% वाढीव रकमेनं बिडिंग केलं. आणि रिटेंडरिंग न करताच धरणाच्या बांधकामाची किंमत 380 कोटींवरून 420 कोटी करण्यात आलीकायदे धाब्यावर- धरणाच्या बांधकामाला मुख्य वन संरक्षकांची मंजुरी नाही- धरणाला केंद्रीय पर्यावरण खात्याची परवानगी नाही- ही परवानगी न मिळाल्यास निधी मंजूर न करण्याचे राज्याच्या मुख्य सचिवांचे होते आदेश- राज्याच्या मुख्य सचिवांनी दिलेल्या आदेशांचे एमएमआरडीएनेचं केलंय उल्लंघन- भूसंपादन कायद्यासह तब्बल 9 कायदे धाब्यावरएफ.ए. एंटरप्रायझेसला फक्त या एकाच धरणाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये झुकतं माप मिळालंय असं नाही. एफ.ए. एंटरप्रायझेसवर कृपाया एकाच कॉन्ट्रॅक्टरला ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील तब्बल 5 धरणांची कॉन्ट्रॅक्ट मिळाली आहे. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियमांनुसार एकाच कॉन्ट्रॅक्टरला तीनपेक्षा जास्त धरणांची कॉन्ट्रॅक्ट देता येत नाहीत. या तीन धरणांचं बांधकाम एकाचवेळी सुरू असता कामा नये अशीही अट आहे. तसेच समान पार्टनर असणारी कंपनी दोनदा बीड करू शकत नाही पण या सगळ्या अटीनियमांना हरताळ फासला आहे.धरणाच्या बांधकामावरची स्थगिती मिळवण्यासाठी केंद्राकडून परवानगी मिळवण्याची धावपळ आता सरकारने सुरु केली आहे. या अनियमिततांची दखल घेऊन मुंबई हायकोर्टाने जून महिन्यापर्यंत धरणाच्या बांधकामालाच आता स्थगिती दिली आहे. पण या टेंडर प्रक्रियेचीच चौकशी व्हावी, अशी मागणी आता केली जातेय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 21, 2012 08:34 AM IST

काळू धरणात कॉन्ट्रक्टरची हेराफेरी ?

21 मे

ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यात दोन वर्षांपूर्वी काळू धरणाचं बांधकाम सुरु करण्यात आलं. धरणाच्या टेंडरची रक्कम कशी बेकायदेशीर वाढवण्यात आली. काळू धरणाच्या बांधकामाला मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली. पण या धरणाच्या निमित्ताने कोट्यवधींची टेंडर कशी लाटली जातात हेच उघड होतंय.

टेंडर भरतानाच घोळसुरुवात झाली एफ.ए. एंटरप्रायझेसने भरलेल्या टेंडरपासून.निसार आणि फतेह मोहम्मद खत्री या कॉन्ट्रॅक्टरनी धरणाच्या बांधकामासाठी दोन टेंडर भरलीपण टेंडर भरणार्‍या दोन कंपन्यांचे मालक मात्र प्रत्यक्षात समान आहे. एफ.ए. एंटरप्रायझेस आणि एफ.ए. कन्स्ट्रक्शन कंपनी नावांनी हे कॉन्ट्रक्टर टेंडर भरतात.

वाढीव बिडिंगधरणाच्या मूळ किमतीपेक्षा तब्बल 47% वाढीव रकमेनं बिडिंग केलं. आणि रिटेंडरिंग न करताच धरणाच्या बांधकामाची किंमत 380 कोटींवरून 420 कोटी करण्यात आली

कायदे धाब्यावर- धरणाच्या बांधकामाला मुख्य वन संरक्षकांची मंजुरी नाही- धरणाला केंद्रीय पर्यावरण खात्याची परवानगी नाही- ही परवानगी न मिळाल्यास निधी मंजूर न करण्याचे राज्याच्या मुख्य सचिवांचे होते आदेश- राज्याच्या मुख्य सचिवांनी दिलेल्या आदेशांचे एमएमआरडीएनेचं केलंय उल्लंघन- भूसंपादन कायद्यासह तब्बल 9 कायदे धाब्यावर

एफ.ए. एंटरप्रायझेसला फक्त या एकाच धरणाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये झुकतं माप मिळालंय असं नाही.

एफ.ए. एंटरप्रायझेसवर कृपाया एकाच कॉन्ट्रॅक्टरला ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील तब्बल 5 धरणांची कॉन्ट्रॅक्ट मिळाली आहे. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियमांनुसार एकाच कॉन्ट्रॅक्टरला तीनपेक्षा जास्त धरणांची कॉन्ट्रॅक्ट देता येत नाहीत. या तीन धरणांचं बांधकाम एकाचवेळी सुरू असता कामा नये अशीही अट आहे. तसेच समान पार्टनर असणारी कंपनी दोनदा बीड करू शकत नाही पण या सगळ्या अटीनियमांना हरताळ फासला आहे.

धरणाच्या बांधकामावरची स्थगिती मिळवण्यासाठी केंद्राकडून परवानगी मिळवण्याची धावपळ आता सरकारने सुरु केली आहे. या अनियमिततांची दखल घेऊन मुंबई हायकोर्टाने जून महिन्यापर्यंत धरणाच्या बांधकामालाच आता स्थगिती दिली आहे. पण या टेंडर प्रक्रियेचीच चौकशी व्हावी, अशी मागणी आता केली जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2012 08:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close