S M L

गुलाबराव देवकरांना जामीन मंजूर

21 मेबहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेल्या राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. देवकर यांच्यासह अगोदर अटकेत असलेल्या 20 संशयित आरोपींनाही जामीन मंजूर झाला आहे. आज सकाळी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना घरकुल घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. देवकर आणि 20 आजी-माजी नगरसेवकांनी जामीन अर्ज कोर्टात दाखल केला होता. जिल्हा कोर्टाने आपला निर्णय देत सर्वांना जामीन मंजूर केला. घरकुल घोटाळ्यातील संशयित आरोपींचं अटकसत्र पोलिसांनी सुरु केलंय. या प्रकरणात 48 आजी-माजी नगरसेवकांना पोलिसांनी नोटीसही जारी केल्या होत्या. यातील 25 संशयित शनिवारी पोलिसांना शरण आले होते. 4 महिला नगरसेवकांसह 15 जणांना जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन दिलाय तर 10 बाहुबली नगरसेवकांची मात्र 30 मे पर्यंत कारागृहात रवानगी केली.'गुलाबराव देवकर यांनी पक्षाकडे राजीनामा सोपवला'जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी अटक झालेल्या परीवहन राज्यंमत्री गुलाबराव देवकर यांनी पक्षाकडे आपला राजीनामा सोपवला आहे. देवकरांनी याआधीच आपला राजीनामा पक्षाकडे सोपवला होता. पण त्यावर कोर्टाच्या निर्णयानंतर निर्णय घेऊ अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 21, 2012 12:48 PM IST

गुलाबराव देवकरांना जामीन मंजूर

21 मे

बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेल्या राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. देवकर यांच्यासह अगोदर अटकेत असलेल्या 20 संशयित आरोपींनाही जामीन मंजूर झाला आहे. आज सकाळी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना घरकुल घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. देवकर आणि 20 आजी-माजी नगरसेवकांनी जामीन अर्ज कोर्टात दाखल केला होता. जिल्हा कोर्टाने आपला निर्णय देत सर्वांना जामीन मंजूर केला. घरकुल घोटाळ्यातील संशयित आरोपींचं अटकसत्र पोलिसांनी सुरु केलंय. या प्रकरणात 48 आजी-माजी नगरसेवकांना पोलिसांनी नोटीसही जारी केल्या होत्या. यातील 25 संशयित शनिवारी पोलिसांना शरण आले होते. 4 महिला नगरसेवकांसह 15 जणांना जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन दिलाय तर 10 बाहुबली नगरसेवकांची मात्र 30 मे पर्यंत कारागृहात रवानगी केली.

'गुलाबराव देवकर यांनी पक्षाकडे राजीनामा सोपवला'

जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी अटक झालेल्या परीवहन राज्यंमत्री गुलाबराव देवकर यांनी पक्षाकडे आपला राजीनामा सोपवला आहे. देवकरांनी याआधीच आपला राजीनामा पक्षाकडे सोपवला होता. पण त्यावर कोर्टाच्या निर्णयानंतर निर्णय घेऊ अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2012 12:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close