S M L

रेव्ह पार्टीमागे मोठं रॅकेट ?

21 मेमुंबईत जुहू इथं पोलिसांनी रेव्ह पार्टीवर टाकलेल्या छाप्यानंतर मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे या पार्टीत काही सेलिब्रिटींसह आणि पुणे वॉरियर्सचे दोन खेळाडू सापडल्याने आणखीनच खळबळ उडाली. या पार्टीत काही परदेशी महिला होत्या, तसेच यात काही चिअरगर्ल्सही असण्याची शक्यता पोलिसांना वाटत आहे. त्यामुळे या पार्टीमागे वेगळंच रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी दोन पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पार्टीचे निमंत्रण फेसबुकच्या माध्यमातून पाठवण्यात आले होते. तब्बल 2533 जणांना याचे निमंत्रण पाठवण्यात आले होते. या पार्टीचा वेळ संध्याकाळी 4 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत होता. पोलिसांनी संध्याकाळी 7:30 वाजता धाड टाकून 36 मुली, 58 मुलांना ताब्यात घेतले होते. मात्र, 4 ते 7:30 च्या दरम्यान कोण कोण येऊन गेले याचा तपास पोलीस करत आहे. यासाठी पोलिसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फूटेज तपासले जात असून लवकरच काही चेहरे समोर येण्याची शक्यता आहे. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या मुला,मुलींच्या मेडिकल रिपोर्टची वाट पोलीस बघत आहे. रिपोर्टमध्ये काय खुलासा येतो त्यानंतर पोलीस कारवाईला वेग येण्याची शक्यताआहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 21, 2012 03:41 PM IST

रेव्ह पार्टीमागे मोठं रॅकेट ?

21 मे

मुंबईत जुहू इथं पोलिसांनी रेव्ह पार्टीवर टाकलेल्या छाप्यानंतर मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे या पार्टीत काही सेलिब्रिटींसह आणि पुणे वॉरियर्सचे दोन खेळाडू सापडल्याने आणखीनच खळबळ उडाली. या पार्टीत काही परदेशी महिला होत्या, तसेच यात काही चिअरगर्ल्सही असण्याची शक्यता पोलिसांना वाटत आहे. त्यामुळे या पार्टीमागे वेगळंच रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी दोन पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पार्टीचे निमंत्रण फेसबुकच्या माध्यमातून पाठवण्यात आले होते. तब्बल 2533 जणांना याचे निमंत्रण पाठवण्यात आले होते. या पार्टीचा वेळ संध्याकाळी 4 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत होता. पोलिसांनी संध्याकाळी 7:30 वाजता धाड टाकून 36 मुली, 58 मुलांना ताब्यात घेतले होते. मात्र, 4 ते 7:30 च्या दरम्यान कोण कोण येऊन गेले याचा तपास पोलीस करत आहे. यासाठी पोलिसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फूटेज तपासले जात असून लवकरच काही चेहरे समोर येण्याची शक्यता आहे. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या मुला,मुलींच्या मेडिकल रिपोर्टची वाट पोलीस बघत आहे. रिपोर्टमध्ये काय खुलासा येतो त्यानंतर पोलीस कारवाईला वेग येण्याची शक्यताआहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2012 03:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close