S M L

पेट्रोल 2.50 रुपयांनी स्वस्त होणार ?

24 मेडॉलरच्या तुलनेत रुपयाच्या अवमूल्यनामुळे हतबल झालेल्या केंद्र सरकारला अखेर पेट्रोलची दरवाढ करावी लागली. पण या दरवाढीचा विरोधकांबरोबरच यूपीएच्याच काही मित्र पक्षांनीही जोरदार निषेध केला. अखेर पेट्रोलची 7 रुपये 50 पैसे इतकी घसघशीत दरवाढ आता अंशतः मागे घेतली जाण्याची शक्यता आहे. सरकारनं 2 ते अडीच रुपयांनी दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी काँग्रेसनंच सरकारकडे केली.बिहारपासून केरळपर्यंत देशभर पेट्रोल दरवाढीचा विरोध करण्यात आला. वेगवेगळे पक्ष आणि संघटनांनी ठिकठिकाणी मोर्चे, धरणं आणि आंदोलनं केली. दरवाढीचा हा निर्णय सरकारचा नाही तर तेल कंपन्यांनी घेतलेला प्रशासकीय निर्णय होता, अशी सारवासारव काँग्रेसने केली. पण देशभर झालेल्या आंदोलनाची झळ काँग्रेसलाही बसलीय. त्यामुळे पेट्रोलच्या किमती दोन ते अडीच रुपयांनी कमी होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. पण सध्या तरी सरकारने अशी कुठलीही सूचना केली नसल्याचं इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या प्रमुखांनी सांगितलं आहे. दरम्यान, पेट्रोलच्या किमती कमी करण्यासाठी राज्य सरकारांनी इंधनावरचे कर कमी करावे, असं आवाहन केंद्र सरकारनं केलंय. महाराष्ट्रातही वॅट कमी व्हायला पाहिजे, असं जाणकारांना वाटतं. पेट्रोलनंतर आता डिझेल, एलपीजी आणि केरोसीनच्या किंमती वाढणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. यासंबंधी मंत्रिगटाची होणारी बैठक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलीय. यापूर्वी पाच वेळा ही बैठक पुढे ढकलण्यात आलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2012 09:20 AM IST

पेट्रोल 2.50 रुपयांनी स्वस्त होणार ?

24 मे

डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या अवमूल्यनामुळे हतबल झालेल्या केंद्र सरकारला अखेर पेट्रोलची दरवाढ करावी लागली. पण या दरवाढीचा विरोधकांबरोबरच यूपीएच्याच काही मित्र पक्षांनीही जोरदार निषेध केला. अखेर पेट्रोलची 7 रुपये 50 पैसे इतकी घसघशीत दरवाढ आता अंशतः मागे घेतली जाण्याची शक्यता आहे. सरकारनं 2 ते अडीच रुपयांनी दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी काँग्रेसनंच सरकारकडे केली.

बिहारपासून केरळपर्यंत देशभर पेट्रोल दरवाढीचा विरोध करण्यात आला. वेगवेगळे पक्ष आणि संघटनांनी ठिकठिकाणी मोर्चे, धरणं आणि आंदोलनं केली. दरवाढीचा हा निर्णय सरकारचा नाही तर तेल कंपन्यांनी घेतलेला प्रशासकीय निर्णय होता, अशी सारवासारव काँग्रेसने केली. पण देशभर झालेल्या आंदोलनाची झळ काँग्रेसलाही बसलीय. त्यामुळे पेट्रोलच्या किमती दोन ते अडीच रुपयांनी कमी होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. पण सध्या तरी सरकारने अशी कुठलीही सूचना केली नसल्याचं इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या प्रमुखांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पेट्रोलच्या किमती कमी करण्यासाठी राज्य सरकारांनी इंधनावरचे कर कमी करावे, असं आवाहन केंद्र सरकारनं केलंय. महाराष्ट्रातही वॅट कमी व्हायला पाहिजे, असं जाणकारांना वाटतं. पेट्रोलनंतर आता डिझेल, एलपीजी आणि केरोसीनच्या किंमती वाढणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. यासंबंधी मंत्रिगटाची होणारी बैठक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलीय. यापूर्वी पाच वेळा ही बैठक पुढे ढकलण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2012 09:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close