S M L

पेट्रोल दरवाढीच्या विरोधात युतीचा हल्लाबोल

24 मेपेट्रोलच्या दरवाढीचे तीव्र पडसाद आता उमटू लागले आहेत. आज राज्यभरात शिवसेना आणि भाजपनं ठिकठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये बंद पुकारण्यात आला. औरंगाबादमध्येही पेट्रोल दरवाढीविरोधात शिवसेनेनं आंदोलन केलं. यावेळी शिवसैनिकांनी गाड्या ढकलत आंदोलन केलं. आता पेट्रोल परवडत नसल्यानं गाड्या ढकलण्याची वेळ आली आहे असं सांगत शिवसेनेनं दरवाढीचा निषेध केला. सांगली बंदची हाकतर दरवाढीविरोधात शिवसेनेनं सांगलीमध्ये बंदची हाक दिली आहे. सेनेनं पुकारलेल्या या बंदला व्यापारी संघटनानंी पाठिंबा दिल्यान शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. मात्र या बंदमधून अत्यावश्यक सेवा मात्र वगळण्यात आल्या आहेत. ही दरवाढ अन्यायकारक असून तातडीनं ती मागं घ्यावी ही आग्रही मागणी शिवसेनेनं केली आहे. जवळपास लाखोंची उलाढाल आज ठप्प होणार आहे. आंदोलनात दुचाकीचा स्फोट,आमदारांसह 2 कार्यकर्ते जखमीपेट्रोल दरवाढविरोधातील भाजपच्या आंदोलनात झालेल्या स्फोटात आमदार विजयकुमार देशमुख यासह 2 कार्यकर्ते जखमी झालेआहे. या आंदोलनात भाजप कार्यकर्ते हे प्रतिकात्मक म्हणून मोटरसायकलीचं दहन करीत असताना पेटलेल्या मोटरसायकलीतील पेट्रोलचा भडका उडाल्याने टाकीचा स्फोट झाला. या स्फोटाने लागलेल्या आगीत आमदार देशमुख यांचा हात भाजला आहे. त्याच्यासोबत असलेल्या ज्ञानेश्वर अंजीखाने यांचा चेहराही आगीत भाजल्यानं दोघांनाही तातडीनं सिव्हिल हॉस्पिटलमधे हलविण्यात आलं आहे. या घटनेनंतर इतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या आगीतील जखमी अंजीखाने यांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2012 11:29 AM IST

पेट्रोल दरवाढीच्या विरोधात युतीचा हल्लाबोल

24 मे

पेट्रोलच्या दरवाढीचे तीव्र पडसाद आता उमटू लागले आहेत. आज राज्यभरात शिवसेना आणि भाजपनं ठिकठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये बंद पुकारण्यात आला. औरंगाबादमध्येही पेट्रोल दरवाढीविरोधात शिवसेनेनं आंदोलन केलं. यावेळी शिवसैनिकांनी गाड्या ढकलत आंदोलन केलं. आता पेट्रोल परवडत नसल्यानं गाड्या ढकलण्याची वेळ आली आहे असं सांगत शिवसेनेनं दरवाढीचा निषेध केला.

सांगली बंदची हाक

तर दरवाढीविरोधात शिवसेनेनं सांगलीमध्ये बंदची हाक दिली आहे. सेनेनं पुकारलेल्या या बंदला व्यापारी संघटनानंी पाठिंबा दिल्यान शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. मात्र या बंदमधून अत्यावश्यक सेवा मात्र वगळण्यात आल्या आहेत. ही दरवाढ अन्यायकारक असून तातडीनं ती मागं घ्यावी ही आग्रही मागणी शिवसेनेनं केली आहे. जवळपास लाखोंची उलाढाल आज ठप्प होणार आहे.

आंदोलनात दुचाकीचा स्फोट,आमदारांसह 2 कार्यकर्ते जखमी

पेट्रोल दरवाढविरोधातील भाजपच्या आंदोलनात झालेल्या स्फोटात आमदार विजयकुमार देशमुख यासह 2 कार्यकर्ते जखमी झालेआहे. या आंदोलनात भाजप कार्यकर्ते हे प्रतिकात्मक म्हणून मोटरसायकलीचं दहन करीत असताना पेटलेल्या मोटरसायकलीतील पेट्रोलचा भडका उडाल्याने टाकीचा स्फोट झाला. या स्फोटाने लागलेल्या आगीत आमदार देशमुख यांचा हात भाजला आहे. त्याच्यासोबत असलेल्या ज्ञानेश्वर अंजीखाने यांचा चेहराही आगीत भाजल्यानं दोघांनाही तातडीनं सिव्हिल हॉस्पिटलमधे हलविण्यात आलं आहे. या घटनेनंतर इतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या आगीतील जखमी अंजीखाने यांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2012 11:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close