S M L

एनडीएची 31 मे रोजी 'भारत बंद'ची हाक

24 मेपेट्रोलच्या दरात साडे सात रुपयाने झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरड मोडलं आहे. आजपर्यंत कधी नव्हे ते इतकी मोठी दरवाढ झाल्यामुळे महागाईच्या वणव्यात पेट्रोलचा भडका उडाला आहे. आज देशभरात विविध ठिकाणी दरवाढीचा निषेध केला जात आहे. राज्यात भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असताना आता एनडीएने पेट्रोल दरवाढीविरोधात देशव्यापी संपाची हाक दिली आहे. येत्या 31 मे रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये शिवसेनाही सहभागी होणार आहे. सुषमा स्वराज यांनी आज फोनवरुन यासंदर्भात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या बंदमध्ये एनडीएच्या सर्व घटकपक्षांनी सहभागी व्हावं यासाठी आता भाजपनं प्रयत्न सुरू केले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2012 12:14 PM IST

एनडीएची 31 मे रोजी 'भारत बंद'ची हाक

24 मे

पेट्रोलच्या दरात साडे सात रुपयाने झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरड मोडलं आहे. आजपर्यंत कधी नव्हे ते इतकी मोठी दरवाढ झाल्यामुळे महागाईच्या वणव्यात पेट्रोलचा भडका उडाला आहे. आज देशभरात विविध ठिकाणी दरवाढीचा निषेध केला जात आहे. राज्यात भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असताना आता एनडीएने पेट्रोल दरवाढीविरोधात देशव्यापी संपाची हाक दिली आहे. येत्या 31 मे रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये शिवसेनाही सहभागी होणार आहे. सुषमा स्वराज यांनी आज फोनवरुन यासंदर्भात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या बंदमध्ये एनडीएच्या सर्व घटकपक्षांनी सहभागी व्हावं यासाठी आता भाजपनं प्रयत्न सुरू केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2012 12:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close