S M L

गडकरींची अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती

24 मेभाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा एकदा नितीन गडकरी यांची निवड झाली आहे. याबाबत मुंबईत सुरु असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अध्यक्षपदाचा ठराव मंजूर करण्यात आला. गडकरी यांच्या अध्यक्षपदासाठी राजनाथ सिंग यांनी गडकरींच्या नावाचा प्रस्ताव मांडला. व्यंकय्या नायडूंनी त्याला अनुमोदन दिलं. कोणत्याही एका व्यक्तीला दुसर्‍या टर्म देत येत नाही मात्र गडकरींना दुसर्‍यांदा संधी देण्यासाठी भाजपनं पक्षाच्या घटनेत दुरुस्ती केली. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ पुन्हा गडकरींच्या गळ्यात पडली. गडकरी यांच्या नावावर या अगोदर संघाने शिक्कामोर्तब केला होता. त्यातच येणार्‍या 2014 च्या निवडणुका लक्षात घेता भाजपने हे पाऊल उचलं असल्याचं स्पष्ट होतंय.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी संघचालकांच्या खास मर्जीतले नेते.. त्यामुळेच संघ'नायक' होण्याचा बहुमान दुसर्‍यांदा पटकावून विरोधकांना गडकरींनी गप्प केलं. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर भाजपच्या टीमची दोर गडकरींच्या हातात देण्यात आली. गडकरींनी आपली सर्व शक्तीपणाला लावून सर्वांना एकत्र घेऊन लढायला सुरुवात केली. गडकरींच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच झालेल्या निवडणुकीत काही ठिकाणी अपवाद सोडता चांगले यश संपादन केलं. बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने चांगले यश मिळवलं. तर गोव्यात काँग्रेसला चांगलाच हात दाखवत भाजपने सत्ता स्थापन केली. तिकडे कर्नाटकमध्ये लोकायुक्तांच्या अहवालात दोषी सापडलेल्या येडियुरप्पांवर थेट राजीनाम्याची कारवाईही रितसर पार पडली. मात्र हे सगळे व्यवस्थित पार पडत असले तरी उत्तराखंड, झारखंड, महाराष्ट्रात झालेल्या महापालिका, नगरपरिषदेच्या निवडणुकीत झालेला पराभव गडकरींच्या वाट्यात सहभागी होतोय. त्याअगोदरचा गडकरी आणि मुंडेंचा वाद हा भरातभर आहेच. मागिल वर्षी गोपीनाथ मुंडेंनी प्रकट केलेली नाराजी भाजपच्या अंतर्गत वादाला चव्हाट्यावर घेऊन आली. संघाच्या मर्जीतील मंडळी नेहमी पुढेच राहणार आणि कार्यकर्ते हे मागेच राहणार असं चित्र पुन्हा एकदा समोर आलं. मात्र पक्षातील वरीष्ठांना मुंडेंची समजूत घालून वादावर पडदा टाकला. 11 मेला नागपूर येथे संघाच्या झालेल्या बैठकीत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नितीन गडकरींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. संघाचा हा शिक्कामोर्तब आदेश मानत आज भाजपच्या कार्यकारणी बैठकीत नितीन गडकरींना अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं. तसे पाहता भाजपमध्ये कोणताही व्यक्ती हा सलग दोन वर्ष अध्यक्षपदावर विराजमान होऊ शकत नाही. पण भाजपने भविष्य काळाचा वेध घेत घटनादुरस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि ताबडतोब मंजूर करण्यात आला. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ पुन्हा गडकरींच्या गळ्यात पडली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 24, 2012 05:55 PM IST

गडकरींची अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती

24 मे

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा एकदा नितीन गडकरी यांची निवड झाली आहे. याबाबत मुंबईत सुरु असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अध्यक्षपदाचा ठराव मंजूर करण्यात आला. गडकरी यांच्या अध्यक्षपदासाठी राजनाथ सिंग यांनी गडकरींच्या नावाचा प्रस्ताव मांडला. व्यंकय्या नायडूंनी त्याला अनुमोदन दिलं. कोणत्याही एका व्यक्तीला दुसर्‍या टर्म देत येत नाही मात्र गडकरींना दुसर्‍यांदा संधी देण्यासाठी भाजपनं पक्षाच्या घटनेत दुरुस्ती केली. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ पुन्हा गडकरींच्या गळ्यात पडली. गडकरी यांच्या नावावर या अगोदर संघाने शिक्कामोर्तब केला होता. त्यातच येणार्‍या 2014 च्या निवडणुका लक्षात घेता भाजपने हे पाऊल उचलं असल्याचं स्पष्ट होतंय.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी संघचालकांच्या खास मर्जीतले नेते.. त्यामुळेच संघ'नायक' होण्याचा बहुमान दुसर्‍यांदा पटकावून विरोधकांना गडकरींनी गप्प केलं. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर भाजपच्या टीमची दोर गडकरींच्या हातात देण्यात आली. गडकरींनी आपली सर्व शक्तीपणाला लावून सर्वांना एकत्र घेऊन लढायला सुरुवात केली. गडकरींच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच झालेल्या निवडणुकीत काही ठिकाणी अपवाद सोडता चांगले यश संपादन केलं. बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने चांगले यश मिळवलं.

तर गोव्यात काँग्रेसला चांगलाच हात दाखवत भाजपने सत्ता स्थापन केली. तिकडे कर्नाटकमध्ये लोकायुक्तांच्या अहवालात दोषी सापडलेल्या येडियुरप्पांवर थेट राजीनाम्याची कारवाईही रितसर पार पडली. मात्र हे सगळे व्यवस्थित पार पडत असले तरी उत्तराखंड, झारखंड, महाराष्ट्रात झालेल्या महापालिका, नगरपरिषदेच्या निवडणुकीत झालेला पराभव गडकरींच्या वाट्यात सहभागी होतोय. त्याअगोदरचा गडकरी आणि मुंडेंचा वाद हा भरातभर आहेच. मागिल वर्षी गोपीनाथ मुंडेंनी प्रकट केलेली नाराजी भाजपच्या अंतर्गत वादाला चव्हाट्यावर घेऊन आली. संघाच्या मर्जीतील मंडळी नेहमी पुढेच राहणार आणि कार्यकर्ते हे मागेच राहणार असं चित्र पुन्हा एकदा समोर आलं. मात्र पक्षातील वरीष्ठांना मुंडेंची समजूत घालून वादावर पडदा टाकला.

11 मेला नागपूर येथे संघाच्या झालेल्या बैठकीत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नितीन गडकरींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. संघाचा हा शिक्कामोर्तब आदेश मानत आज भाजपच्या कार्यकारणी बैठकीत नितीन गडकरींना अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं. तसे पाहता भाजपमध्ये कोणताही व्यक्ती हा सलग दोन वर्ष अध्यक्षपदावर विराजमान होऊ शकत नाही. पण भाजपने भविष्य काळाचा वेध घेत घटनादुरस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि ताबडतोब मंजूर करण्यात आला. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ पुन्हा गडकरींच्या गळ्यात पडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2012 05:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close