S M L

डॉक्टराला शिक्षा करणे पाकला पडले महागात

25 मेओसामा बिन लादेनला पकडण्यात मदत करणार्‍या सरकारी डॉक्टरला पाकिस्तान सरकारनं तुरुंगात डांबलंय. यामुळे नाराज झालेल्या अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणार्‍या आर्थिक मदतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टर शकील आफ्रिदी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली 33 वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला आहे. त्यामुळे पाकिस्तानला देण्यात येणार्‍या आर्थिक मदतीत दरवर्षी 10 लाख डॉलर्स याप्रमाणे 33 वर्षात 3 कोटी 30 लाख डॉलर्सची कपात करणार असल्याचं अमेरिकेनं ठरवलं आहे. डॉक्टर शकील यांची लवकरात लवकर सुटका करावी, अशी अमेरिकेची मागणी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 25, 2012 04:46 PM IST

डॉक्टराला शिक्षा करणे पाकला पडले महागात

25 मे

ओसामा बिन लादेनला पकडण्यात मदत करणार्‍या सरकारी डॉक्टरला पाकिस्तान सरकारनं तुरुंगात डांबलंय. यामुळे नाराज झालेल्या अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणार्‍या आर्थिक मदतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टर शकील आफ्रिदी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली 33 वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला आहे. त्यामुळे पाकिस्तानला देण्यात येणार्‍या आर्थिक मदतीत दरवर्षी 10 लाख डॉलर्स याप्रमाणे 33 वर्षात 3 कोटी 30 लाख डॉलर्सची कपात करणार असल्याचं अमेरिकेनं ठरवलं आहे. डॉक्टर शकील यांची लवकरात लवकर सुटका करावी, अशी अमेरिकेची मागणी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2012 04:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close