S M L

'ती' बातमी चुकीची असल्याचा केजरीवाल,बेदींचा दावा

26 मेटीम अण्णांचे मुख्य सदस्य अरविंद केजरीवाल हे स्वत:च्या एनजीओ (NGO) ला आलेल्या देणग्यांचा योग्य वापर करत नाही अशी तक्रार करणारा ई-मेल किरण बेदी यांनी अण्णा हजारे यांना पाठवला होता अशी बातमी आज एका इंग्रजी वर्तमानपत्रात छापण्यात आली आहे. तसेच अण्णांनीही केजरीवाल यांना पत्र लिहले असं या बातमीत छापण्यात आलं आहे. पण किरण बेदी आणि अरविंद केजरीवाल यांनी या बातमीचं खंडन केलं आहे. अशा प्रकारच्या बातम्या या भ्रष्टाचाराच्या विरोधातील आंदोलनाला कमजोर करण्यासाठी मुद्दाम दिल्या जात असल्याचा आरोपही किरण बेदी यांनी केला. केजरीवाल यांनी आपल्या टिवट करुनही बातमी फेक असल्याचं सांगितलं आहे. तसेच त्या न्यूजपेपरला कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.दरम्यान, अरविंद केजरीवाल हे इंडिया अगेन्स्ट करप्शन या संस्थेला स्वत:ची मालमत्ता समजतात असा आरोप आयएसीच्या सोशल मीडिया साभाळणारे शिवेंद्र सिंग यांनी केला आहे. प्रशांत भूषण यांच्या घरी मागच्या आठवड्यात झालेल्या बैठकीनंतर शिवेंद्र यांनी अशा आशयाचे पत्र पाठवले आहे. अरविंद केजरीवाल मनमानी करतात आणि भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या वेळेस स्वताच्या मर्जीने अनेक गोष्टी त्यांनी केल्याचा आरोपही शिवेंद्र सिंग यांनी केला आहे. या पत्रामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 26, 2012 11:25 AM IST

'ती' बातमी चुकीची असल्याचा केजरीवाल,बेदींचा दावा

26 मे

टीम अण्णांचे मुख्य सदस्य अरविंद केजरीवाल हे स्वत:च्या एनजीओ (NGO) ला आलेल्या देणग्यांचा योग्य वापर करत नाही अशी तक्रार करणारा ई-मेल किरण बेदी यांनी अण्णा हजारे यांना पाठवला होता अशी बातमी आज एका इंग्रजी वर्तमानपत्रात छापण्यात आली आहे. तसेच अण्णांनीही केजरीवाल यांना पत्र लिहले असं या बातमीत छापण्यात आलं आहे. पण किरण बेदी आणि अरविंद केजरीवाल यांनी या बातमीचं खंडन केलं आहे. अशा प्रकारच्या बातम्या या भ्रष्टाचाराच्या विरोधातील आंदोलनाला कमजोर करण्यासाठी मुद्दाम दिल्या जात असल्याचा आरोपही किरण बेदी यांनी केला. केजरीवाल यांनी आपल्या टिवट करुनही बातमी फेक असल्याचं सांगितलं आहे. तसेच त्या न्यूजपेपरला कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, अरविंद केजरीवाल हे इंडिया अगेन्स्ट करप्शन या संस्थेला स्वत:ची मालमत्ता समजतात असा आरोप आयएसीच्या सोशल मीडिया साभाळणारे शिवेंद्र सिंग यांनी केला आहे. प्रशांत भूषण यांच्या घरी मागच्या आठवड्यात झालेल्या बैठकीनंतर शिवेंद्र यांनी अशा आशयाचे पत्र पाठवले आहे. अरविंद केजरीवाल मनमानी करतात आणि भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या वेळेस स्वताच्या मर्जीने अनेक गोष्टी त्यांनी केल्याचा आरोपही शिवेंद्र सिंग यांनी केला आहे. या पत्रामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2012 11:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close