S M L

म्हाडाच्या भूखंडावर नेत्यांचा डल्ला ?

27 मेमुंबईत घराची स्वप्न पाहणार्‍यांसाठी आधार असलेल्या म्हाडात भूखंड घोटाळा असल्याचं उघड झालं आहे.सर्वसामान्यांच्या घरांसाठी राखीव असलेले म्हाडाचे प्लॉट्स राजकीय नेत्यांच्या संस्थांना नाममात्र दरात देण्यात आल्याचा आरोप होतोय. विलासराव देशमुख आणि सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या काळात तब्बल 67 प्लॉट्स राजकीय नेत्यांच्या संस्थांना देण्यात आले आहे. सर्वसामान्यांना मिळणार्‍या म्हाडाच्या सवलतींच्या घरांसाठी राखीव असलेले 67 प्लॉटस म्हाडाने राजकीय नेत्यांच्या संस्थांना अत्यंत नाममात्र दरात दिले आहेत. यामुळे हे प्लॉट सरळ राजकीय नेत्यांच्या घशात गेलेत. 1999 ते 2003 दरम्यान वीस हेक्टर जागेवर असलेले 67 प्लॉटस विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांनी हे प्लॉटस अतिशय नाममात्र दरात वाटलेत. या 67 प्लॉटसपैकी 52 प्लॉटसचं वाटप हे विलासराव देशमुखांनी तर 15 प्लॉटसचं वाटप सुशीलकुमार शिंदेंनी केलं होतं. सर्वसामान्यांसाठी राखीव असलेले प्लॉटस अशा पद्धतीनं राजकीय नेत्यांच्या संस्थांना वाटप करण्यावर 2004 मध्ये मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली होती. म्हाडाच्या चौकशी अहवालातच या सर्व बाबींची माहिती देण्यात आली. या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते विनोद तावडे यांनी केली. वाटप करण्यात आलेले बहुसंख्य प्लॉटस हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या संस्थांना देण्यात आले आहे. कोण-कोणत्या नेत्यांच्या संस्थाना हे भूखंड मिळालेत ?- राष्ट्रवादी आमदार नवाब मलिक यांच्या पत्नीच्या नावानं राहेबर फाऊंडेशनला मिळाला भूखंड- काँग्रेस आमदार मधुकर चव्हाण यांच्या रायगड मिलिटरी स्कूलच्या नावे एक भूखंड- ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या कासेगाव एज्युकेशन संस्थेला भूखंड देण्यात आला - ओशिवरा : 10ष000 स्क्वे.मी. प्लॉट हॉस्पिटलसाठी राखीव, पण खासदार प्रिया दत्त यांच्या नगिर्स दत्त फाऊंडेशनला मिळाला भूखंड- वांद्रे : राखीव भूखंडाचे लाभार्थी, काँग्रेस आमदार सुभाष चव्हाण, काँग्रेसचे माजी प्रवक्ते अजित सावंत आणि समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी

आईबीएन लोकमत | Updated On: May 27, 2012 01:16 PM IST

म्हाडाच्या भूखंडावर नेत्यांचा डल्ला ?

27 मे

मुंबईत घराची स्वप्न पाहणार्‍यांसाठी आधार असलेल्या म्हाडात भूखंड घोटाळा असल्याचं उघड झालं आहे.सर्वसामान्यांच्या घरांसाठी राखीव असलेले म्हाडाचे प्लॉट्स राजकीय नेत्यांच्या संस्थांना नाममात्र दरात देण्यात आल्याचा आरोप होतोय. विलासराव देशमुख आणि सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या काळात तब्बल 67 प्लॉट्स राजकीय नेत्यांच्या संस्थांना देण्यात आले आहे. सर्वसामान्यांना मिळणार्‍या म्हाडाच्या सवलतींच्या घरांसाठी राखीव असलेले 67 प्लॉटस म्हाडाने राजकीय नेत्यांच्या संस्थांना अत्यंत नाममात्र दरात दिले आहेत. यामुळे हे प्लॉट सरळ राजकीय नेत्यांच्या घशात गेलेत. 1999 ते 2003 दरम्यान वीस हेक्टर जागेवर असलेले 67 प्लॉटस विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांनी हे प्लॉटस अतिशय नाममात्र दरात वाटलेत. या 67 प्लॉटसपैकी 52 प्लॉटसचं वाटप हे विलासराव देशमुखांनी तर 15 प्लॉटसचं वाटप सुशीलकुमार शिंदेंनी केलं होतं. सर्वसामान्यांसाठी राखीव असलेले प्लॉटस अशा पद्धतीनं राजकीय नेत्यांच्या संस्थांना वाटप करण्यावर 2004 मध्ये मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली होती. म्हाडाच्या चौकशी अहवालातच या सर्व बाबींची माहिती देण्यात आली. या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते विनोद तावडे यांनी केली. वाटप करण्यात आलेले बहुसंख्य प्लॉटस हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या संस्थांना देण्यात आले आहे.

कोण-कोणत्या नेत्यांच्या संस्थाना हे भूखंड मिळालेत ?

- राष्ट्रवादी आमदार नवाब मलिक यांच्या पत्नीच्या नावानं राहेबर फाऊंडेशनला मिळाला भूखंड- काँग्रेस आमदार मधुकर चव्हाण यांच्या रायगड मिलिटरी स्कूलच्या नावे एक भूखंड- ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या कासेगाव एज्युकेशन संस्थेला भूखंड देण्यात आला - ओशिवरा : 10ष000 स्क्वे.मी. प्लॉट हॉस्पिटलसाठी राखीव, पण खासदार प्रिया दत्त यांच्या नगिर्स दत्त फाऊंडेशनला मिळाला भूखंड- वांद्रे : राखीव भूखंडाचे लाभार्थी, काँग्रेस आमदार सुभाष चव्हाण, काँग्रेसचे माजी प्रवक्ते अजित सावंत आणि समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 27, 2012 01:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close