S M L

'सीना-कोळेगाव'चं पाणी सोलापूरला सोडा - मुख्यमंत्री

26 मेसीना कोळेगाव धरणाचं पाणी सोलापूर जिल्ह्याला सोडू नये ही मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची मागणी होती. पण ती मागणी अमान्य करत आता सीना कोळेगाव धरणातून सोलापूर जिल्ह्याला 20 दशलक्ष घनमीटर पाणी देण्यात यावे असे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहे. हे पाणी पिण्यासाठीच वापरलं जावं अन्यथा संबंधितांवर कारवाई करू असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. पण मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचा उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यानंी कडाडून विरोध केलाय. या संतप्त नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकला. मुख्यमंत्र्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील धनदांडग्या शेतकर्‍यांसाठी मराठवाड्यावर अन्याय केला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या या निर्णयाचा निषेध करतो असा पवित्रा उस्मानाबादमधील सर्वपक्षीय नेत्यांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 26, 2012 05:47 PM IST

'सीना-कोळेगाव'चं पाणी सोलापूरला सोडा - मुख्यमंत्री

26 मे

सीना कोळेगाव धरणाचं पाणी सोलापूर जिल्ह्याला सोडू नये ही मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची मागणी होती. पण ती मागणी अमान्य करत आता सीना कोळेगाव धरणातून सोलापूर जिल्ह्याला 20 दशलक्ष घनमीटर पाणी देण्यात यावे असे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहे. हे पाणी पिण्यासाठीच वापरलं जावं अन्यथा संबंधितांवर कारवाई करू असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. पण मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचा उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यानंी कडाडून विरोध केलाय. या संतप्त नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकला. मुख्यमंत्र्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील धनदांडग्या शेतकर्‍यांसाठी मराठवाड्यावर अन्याय केला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या या निर्णयाचा निषेध करतो असा पवित्रा उस्मानाबादमधील सर्वपक्षीय नेत्यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2012 05:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close