S M L

राष्ट्रवादीची बाजी, काँग्रेसची पिछेहाट

28 मेविधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची पीछेहाट होताना दिसली. आज जाहीर झालेल्या निकालात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारली आहे. काँग्रेसला केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलंय. तर नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांना समान मतं पडली. त्यामुळे तिथला निकाल चिठ्ठी टाकून काढण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादीचे जयंत पाटील विजयी झाले आहे. एकंदरीतच या निवडणुकीत राष्ट्रवादीने सरशी केली आहे. महापालिका निवडणुकीत अमरावतीत पैसे वाटल्याचा आरोप काँग्रेसवर झाला होता. तसाच आरोप याही निवडणुकीत शिवसेनेनं अमरावतीच्या जागेसाठी काँग्रेसवर केला. परभणीत विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने तर काँग्रेसलाच इशारा दिला.तर समान मतं पडल्यानं नाशिकची जागा अडकली असली तरी, शिवसेनेला वाटतंय त्यांची ताकद वाढलीय, असा दावा शिवसेना करतंय. नाशिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवाराल समसमान मतं पडल्यानं इथं फेरमतमोजणीचा पेच उद्भवला. पण यावर तोडगा काढत निकाल चिठ्ठी टाकून काढण्यात आला आणि राष्ट्रवादीने बाजी मारली. राष्ट्रवादीच्या या विजयाने या निवडणुकीत सुध्दा बाजी मारली. सर्वाधिक तीन जागा घेऊन मोठा पक्ष ठरला. एकूणच काय या निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट झालीय हे स्पष्ट आहे. पण आगामी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसची गरज भासणार असल्यानं आता या निवडणुकीतल्या चुकांचं उणंदुणं न काढणंच काँग्रेसनं पसंत केल्याचं दिसतंय. विधान परिषदेचा निकालपरभणी-हिंगोलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजानी दुर्रानी विजयी झाले. त्यांना 228 मतं मिळाली त्यांनी अपक्ष ब्रिजलाल खुराना यांना हरवलं. त्यांना 176 मतं मिळाली. पण काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे एकूण 278 मते असताना दुर्रानी यांना फक्त 228 मते मिळाली. त्यामुळे दुर्रानी फक्त 52 मतांनी विजयी झालेत. काँग्रेसच्या नेत्यांनी आघाडी धर्म पाळला नाही आणि अपक्ष उमेदावर ब्रिजलाल खुराना यांना मदत के ल्याचा आरोप बाबाजानी यांनी केला आहे. वेळप्रसंगी काँग्रेसला धडा शिकवू असा इशारा त्यांनी दिला. तर चंद्रपूर-वर्धा-गडचिरोलीतून भाजपचे मितेश भांगडिया विजयी झाले आहे. त्यांना 403 मतं मिळाली, त्यांनी काँग्रेसच्या राहुल पुगलिया यांचा पराभव केला आहे त्यांना 200 मतं मिळाली. त्याचबरोबर विदर्भात अमरावती मतदारसंघातून भाजपचे प्रवीण पोटे 194 मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे बबलू देशमुख यांना पराभूत केलं. त्यांना 156 मतं मिळाली. तर लातूर - उस्मानाबाद मतदारसंघातून काँग्रेसचे दिलीपराव देशमुख विजयी झाले. त्यांना 666 मतं मिळाली. त्यांनी अपक्ष उमेदवार सुधीर कुलकर्णी यांचा पराभव केला. त्यांना 63 मतं मिळाली. शेवटी कोकण मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अनिल तटकरे विजयी झाले आहेत. त्यांना 439 मतं मिळाली त्यांनी भाजपच्या उमेश शेट्येंचा पराभव केला आहे त्यांना 174 मतं मिळाली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 28, 2012 01:38 PM IST

राष्ट्रवादीची बाजी, काँग्रेसची पिछेहाट

28 मे

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची पीछेहाट होताना दिसली. आज जाहीर झालेल्या निकालात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारली आहे. काँग्रेसला केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलंय. तर नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांना समान मतं पडली. त्यामुळे तिथला निकाल चिठ्ठी टाकून काढण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादीचे जयंत पाटील विजयी झाले आहे. एकंदरीतच या निवडणुकीत राष्ट्रवादीने सरशी केली आहे.

महापालिका निवडणुकीत अमरावतीत पैसे वाटल्याचा आरोप काँग्रेसवर झाला होता. तसाच आरोप याही निवडणुकीत शिवसेनेनं अमरावतीच्या जागेसाठी काँग्रेसवर केला. परभणीत विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने तर काँग्रेसलाच इशारा दिला.

तर समान मतं पडल्यानं नाशिकची जागा अडकली असली तरी, शिवसेनेला वाटतंय त्यांची ताकद वाढलीय, असा दावा शिवसेना करतंय. नाशिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवाराल समसमान मतं पडल्यानं इथं फेरमतमोजणीचा पेच उद्भवला. पण यावर तोडगा काढत निकाल चिठ्ठी टाकून काढण्यात आला आणि राष्ट्रवादीने बाजी मारली. राष्ट्रवादीच्या या विजयाने या निवडणुकीत सुध्दा बाजी मारली. सर्वाधिक तीन जागा घेऊन मोठा पक्ष ठरला.

एकूणच काय या निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट झालीय हे स्पष्ट आहे. पण आगामी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसची गरज भासणार असल्यानं आता या निवडणुकीतल्या चुकांचं उणंदुणं न काढणंच काँग्रेसनं पसंत केल्याचं दिसतंय.

विधान परिषदेचा निकाल

परभणी-हिंगोलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजानी दुर्रानी विजयी झाले. त्यांना 228 मतं मिळाली त्यांनी अपक्ष ब्रिजलाल खुराना यांना हरवलं. त्यांना 176 मतं मिळाली. पण काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे एकूण 278 मते असताना दुर्रानी यांना फक्त 228 मते मिळाली. त्यामुळे दुर्रानी फक्त 52 मतांनी विजयी झालेत. काँग्रेसच्या नेत्यांनी आघाडी धर्म पाळला नाही आणि अपक्ष उमेदावर ब्रिजलाल खुराना यांना मदत के ल्याचा आरोप बाबाजानी यांनी केला आहे. वेळप्रसंगी काँग्रेसला धडा शिकवू असा इशारा त्यांनी दिला. तर चंद्रपूर-वर्धा-गडचिरोलीतून भाजपचे मितेश भांगडिया विजयी झाले आहे. त्यांना 403 मतं मिळाली, त्यांनी काँग्रेसच्या राहुल पुगलिया यांचा पराभव केला आहे त्यांना 200 मतं मिळाली.

त्याचबरोबर विदर्भात अमरावती मतदारसंघातून भाजपचे प्रवीण पोटे 194 मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे बबलू देशमुख यांना पराभूत केलं. त्यांना 156 मतं मिळाली. तर लातूर - उस्मानाबाद मतदारसंघातून काँग्रेसचे दिलीपराव देशमुख विजयी झाले. त्यांना 666 मतं मिळाली. त्यांनी अपक्ष उमेदवार सुधीर कुलकर्णी यांचा पराभव केला. त्यांना 63 मतं मिळाली. शेवटी कोकण मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अनिल तटकरे विजयी झाले आहेत. त्यांना 439 मतं मिळाली त्यांनी भाजपच्या उमेश शेट्येंचा पराभव केला आहे त्यांना 174 मतं मिळाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2012 01:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close