S M L

'किंग' कोण बनणार ?

27 मे75 मॅच आणि 7 आठवड्यांनंतर आयपीएलच्या पाचव्या हंगामाचा क्लायमॅक्स जवळ आला आहे. आयपीएलची 2 वेळा चॅम्पियन टीम चेन्नई सुपर किंग्ज आणि पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचलेली किंग खान शाहरुख खानची टीम कोलकाता नाईट रायडर्स आमने सामने आहेत. आणि या दोन टीममध्ये चेन्नईच्या चेपॉक मैदानावर आज रंगणार आहे आयपीएलची मेगाफायनल. शाहरुख खानसाठी गेल्या 4 हंगामातलं अपयश आता संपलंय. या हंगामात त्यानं जवळपास प्रत्येक मॅचमध्ये आपल्या नाईट रायडर्स टीमला चिअर अप करत उत्साह वाढवला. आणि त्याच्या टीमनंंही त्याला निराश होऊ दिलेलं नाही. कोलकात्याची टीम या हंगामात सांघिक कामगिरी करतेय. कॅप्टन गौतम गंभीरनं टीमला एक वेगळा आत्मविश्वास दिला आहे. त्यांची बॅटिंग दमदार होतेय. जॅक कॅलिस आणि ब्रँडन मॅकलमसारख्या परदेशी खेळाडूंनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडली आहे. तर संपूर्ण सीझनमध्ये फ्लॉप ठरलेल्या युसुफ पठाणला मोक्याच्या क्षणी फॉर्म गवसला आहे. पण कोलकात्यासाठी सुपरस्टार ठरलाय तो हा खेळाडू सुनील नरीन. आपल्या जादुई स्पिन बॉलिंगच्या जोरावर त्यानं समोरच्या टीमच्या बॅटिंगचा धुव्वा उडवला. आणि म्हणूनचं फायनलमध्ये नाईट रायडर्स एका वेगळ्या आत्मविश्वासाने उतरणार आहेत. याउलट चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी थक्क करणार ठरली आहे. लीगमधील खराब कामगिरीनंतरही नशीबाच्या जोरावर 'मेन इन येलो प्ले ऑफ' मध्ये पोहोचले. आणि पहिल्यांदा मुंबई आणि त्यानंतर दिल्लीचा अक्षरशः धुव्वा उडवत सलग तिसर्‍यांदा फायनलमध्ये धडक दिली आहे.आता या दोन्ही दादा टीम जेतेपदासाठी आमने सामने येणार आहेत आणि आपणही सज्ज होऊया या मेगाफायनलसाठी...

आईबीएन लोकमत | Updated On: May 27, 2012 10:36 AM IST

'किंग' कोण बनणार ?

27 मे

75 मॅच आणि 7 आठवड्यांनंतर आयपीएलच्या पाचव्या हंगामाचा क्लायमॅक्स जवळ आला आहे. आयपीएलची 2 वेळा चॅम्पियन टीम चेन्नई सुपर किंग्ज आणि पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचलेली किंग खान शाहरुख खानची टीम कोलकाता नाईट रायडर्स आमने सामने आहेत. आणि या दोन टीममध्ये चेन्नईच्या चेपॉक मैदानावर आज रंगणार आहे आयपीएलची मेगाफायनल. शाहरुख खानसाठी गेल्या 4 हंगामातलं अपयश आता संपलंय. या हंगामात त्यानं जवळपास प्रत्येक मॅचमध्ये आपल्या नाईट रायडर्स टीमला चिअर अप करत उत्साह वाढवला. आणि त्याच्या टीमनंंही त्याला निराश होऊ दिलेलं नाही.

कोलकात्याची टीम या हंगामात सांघिक कामगिरी करतेय. कॅप्टन गौतम गंभीरनं टीमला एक वेगळा आत्मविश्वास दिला आहे. त्यांची बॅटिंग दमदार होतेय. जॅक कॅलिस आणि ब्रँडन मॅकलमसारख्या परदेशी खेळाडूंनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडली आहे. तर संपूर्ण सीझनमध्ये फ्लॉप ठरलेल्या युसुफ पठाणला मोक्याच्या क्षणी फॉर्म गवसला आहे.

पण कोलकात्यासाठी सुपरस्टार ठरलाय तो हा खेळाडू सुनील नरीन. आपल्या जादुई स्पिन बॉलिंगच्या जोरावर त्यानं समोरच्या टीमच्या बॅटिंगचा धुव्वा उडवला. आणि म्हणूनचं फायनलमध्ये नाईट रायडर्स एका वेगळ्या आत्मविश्वासाने उतरणार आहेत.

याउलट चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी थक्क करणार ठरली आहे. लीगमधील खराब कामगिरीनंतरही नशीबाच्या जोरावर 'मेन इन येलो प्ले ऑफ' मध्ये पोहोचले. आणि पहिल्यांदा मुंबई आणि त्यानंतर दिल्लीचा अक्षरशः धुव्वा उडवत सलग तिसर्‍यांदा फायनलमध्ये धडक दिली आहे.आता या दोन्ही दादा टीम जेतेपदासाठी आमने सामने येणार आहेत आणि आपणही सज्ज होऊया या मेगाफायनलसाठी...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 27, 2012 10:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close