S M L

जगनमोहन रेड्डींना 11 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

28 मेबेहिशेबी मालमत्ता प्रकरणी जगनमोहन रेड्डी यांची कोर्टाने 11 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी रेड्डी यांची सीबीआय चौकशी करत होती. अखेर कारवाईचा फास आवळत सीबीआयने रविवारी संध्याकाळी अटक केली. रेड्डी यांना अटक होताच ताबडतोब हैदराबादमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला. रेड्डी यांच्या अटकेमुळे आंध्रमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. शेकडो कोटींची माया जमवल्याचा आरोपाखाली.. जगन मोहन रेड्डी यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. जगन मोहन यांनी चौकशीत सहकार्य केलं नाही, ते हवाल रॅकेट चालवतात, असे आरोप ठेवत.. सीबीआयनं त्यांच्या सीबीआय कोठडीची मागणी केली होती. पण कोर्टाने त्यांना 11 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली.जगन यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांनी आंध्र प्रदेश बंदची हाक दिली. जगन मोहन यांच्या आई विजयम्मा यांनी सहकुटुंब धरणं आंदोलन केलं. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांनीही हैदराबादसह, कडप्पा, प्रकाशम अशा संवेदनशील जिल्ह्यांमध्ये कडक बंदोबस्त ठेवला. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 800 आंदोलकांना अटक करण्यात आली. रेल्वे गाड्या आणि बसेसवर बारीक लक्ष ठेवण्यात येतंय. आंध्र प्रदेशात 12 जूनला विधानसभेच्या 18 जागांसाठी पोटनिवडणूक होतेय. पण जगन मोहन यांना आता प्रचार करता येणार नाही. निवडणुकीपासून रेड्डींना दूर करण्यासाठीच काँग्रेसने त्यांना अटक केली असा आरोप वायएसआर काँग्रेसनं केला आहे. पण काँग्रेसनं याचं खंडन केलंय. वडील वाय. एस. आर. यांच्यामुळे जगन मोहन यांना जनाधार मिळाला. दीड वर्षापूर्वी त्यांच्या ओडार्पू यात्रेला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. पण त्यांना अटक झाल्यानंतर.. संपूर्ण राज्यात कुठेही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: May 28, 2012 12:10 PM IST

जगनमोहन रेड्डींना 11 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

28 मे

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी जगनमोहन रेड्डी यांची कोर्टाने 11 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी रेड्डी यांची सीबीआय चौकशी करत होती. अखेर कारवाईचा फास आवळत सीबीआयने रविवारी संध्याकाळी अटक केली. रेड्डी यांना अटक होताच ताबडतोब हैदराबादमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला. रेड्डी यांच्या अटकेमुळे आंध्रमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. शेकडो कोटींची माया जमवल्याचा आरोपाखाली.. जगन मोहन रेड्डी यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. जगन मोहन यांनी चौकशीत सहकार्य केलं नाही, ते हवाल रॅकेट चालवतात, असे आरोप ठेवत.. सीबीआयनं त्यांच्या सीबीआय कोठडीची मागणी केली होती. पण कोर्टाने त्यांना 11 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली.

जगन यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांनी आंध्र प्रदेश बंदची हाक दिली. जगन मोहन यांच्या आई विजयम्मा यांनी सहकुटुंब धरणं आंदोलन केलं. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांनीही हैदराबादसह, कडप्पा, प्रकाशम अशा संवेदनशील जिल्ह्यांमध्ये कडक बंदोबस्त ठेवला. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 800 आंदोलकांना अटक करण्यात आली. रेल्वे गाड्या आणि बसेसवर बारीक लक्ष ठेवण्यात येतंय.

आंध्र प्रदेशात 12 जूनला विधानसभेच्या 18 जागांसाठी पोटनिवडणूक होतेय. पण जगन मोहन यांना आता प्रचार करता येणार नाही. निवडणुकीपासून रेड्डींना दूर करण्यासाठीच काँग्रेसने त्यांना अटक केली असा आरोप वायएसआर काँग्रेसनं केला आहे. पण काँग्रेसनं याचं खंडन केलंय.

वडील वाय. एस. आर. यांच्यामुळे जगन मोहन यांना जनाधार मिळाला. दीड वर्षापूर्वी त्यांच्या ओडार्पू यात्रेला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. पण त्यांना अटक झाल्यानंतर.. संपूर्ण राज्यात कुठेही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2012 12:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close