S M L

फरार सुरेश बोरोले अटकेत

29 मेजळगाव येथील तापी सहकारी पतसंस्थेचे फरार चेअरमन आणि एकनाथ खडसे यांचे व्याही सुरेश बोरोले यांना अखेर अटक करण्यात आली आहे.जळगावच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी सुरेश बोरोलेंना मुरबाडमध्ये अटक केली. गेल्या दीड वर्षापासून बोरोले फरार होते. जळगावच्या जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामीन मिळण्यासाठी सुरेश बोरोले यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र सुप्रीम कोर्टाकडूनही त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अखेर सुरेश बोरोले यांच्या अटकेचे आदेश निघाले. गेले दीड वर्ष सुरेश बोरोले फरार होते. स्वाहाकारासाठी सहकाराचा वापर करणार्‍या पतसंस्थांमधील घोटाळ्यांनी राज्य हादरुन गेलं. आणि यातीलच एक प्रमुख घोटाळेबाज पतसंस्था म्हणजे जळगावची तापी सहकारी पतसंस्था. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे व्याही आणि जावयाची ही पतसंस्था आहे. डॉ.सुरेश बोरोले हे खडसेंचे व्याही आहेत. 52 कोटी 98 लाखाचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका सुरेश बोरोलेंवर ठेवण्यात आला आहे. जळगावच्या पेठ पोलीस ठाण्यात डॉ. सुरेश बोरोले आणि त्यांचा मुलगा पंकज बोरोले यांच्यासह 16 जणांविरुध्द 4 जानेवारीला गुन्हा दाखल झाला आणि बोरोले पितापुत्रानी स्थानिक कोर्टपासून ते थेट सुप्रीम कोर्टापर्यंत अटकपूर्व जामीनासाठी धावपळ केली. पण सुप्रीम कोर्टानंही त्यांना जामीन नाकारला होता. फरार असलेले बोरोले पिता-पुत्र पोलिसांना कुठेही सापडत नव्हते. याच सहकार खात्याचा आशिर्वाद बोरोलेंच्या तापी पतसंस्थेला नेहमीच मिळाला. ठेवी परत मिळत नसल्याने अनेक पीडित ठेवीदारांनी या कार्यालयात वारंवार चकरा मारल्या. पण त्यांना आश्वासनाशिवाय काहीही मिळालं नाही. बोरोले हे विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांचे व्याही असल्यानं त्यांच्याविरुध्द सहकार आणि पोलीस काहीही करायला तयार नाहीत असा ठेवीदारांचा थेट आरोप होता. याच डॉ.सुरेश बोरोलेंनी नाममात्र जामीनावर आपल्या नातेवाईकांच्या नावानं करोडो रुपयांची कर्ज 2007 साली तापी पतसंस्थेतून घेतली. कर्जदारांमध्ये भाऊ,पत्नी,भाचा यांचाच समावेश आहे. पण याच बोरोलेंना आम्ही 25 जून 2008 ला विचारलं तर त्यांनी त्याहीवेळेस सफाईनं इन्कार केला होता.डॉ.बोरोलेंना अटक करा या मागण्यांसाठी ठेवीदारांनी आंदोलन सुरु केलं होतं. सुप्रीम कोर्टानं जामीन नाकारल्याने बोरोलेंना अटक होणं हे अटळच होतं. पण आपले ठेवींचे पैसे कधीतरी मिळतील या वेड्या आशेवर जगणार्‍या माणसांना न्याय मिळेल का हाच खरा प्रश्न आहे

आईबीएन लोकमत | Updated On: May 29, 2012 11:34 AM IST

फरार सुरेश बोरोले अटकेत

29 मे

जळगाव येथील तापी सहकारी पतसंस्थेचे फरार चेअरमन आणि एकनाथ खडसे यांचे व्याही सुरेश बोरोले यांना अखेर अटक करण्यात आली आहे.जळगावच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी सुरेश बोरोलेंना मुरबाडमध्ये अटक केली. गेल्या दीड वर्षापासून बोरोले फरार होते. जळगावच्या जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामीन मिळण्यासाठी सुरेश बोरोले यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र सुप्रीम कोर्टाकडूनही त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अखेर सुरेश बोरोले यांच्या अटकेचे आदेश निघाले. गेले दीड वर्ष सुरेश बोरोले फरार होते.

स्वाहाकारासाठी सहकाराचा वापर करणार्‍या पतसंस्थांमधील घोटाळ्यांनी राज्य हादरुन गेलं. आणि यातीलच एक प्रमुख घोटाळेबाज पतसंस्था म्हणजे जळगावची तापी सहकारी पतसंस्था. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे व्याही आणि जावयाची ही पतसंस्था आहे. डॉ.सुरेश बोरोले हे खडसेंचे व्याही आहेत. 52 कोटी 98 लाखाचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका सुरेश बोरोलेंवर ठेवण्यात आला आहे. जळगावच्या पेठ पोलीस ठाण्यात डॉ. सुरेश बोरोले आणि त्यांचा मुलगा पंकज बोरोले यांच्यासह 16 जणांविरुध्द 4 जानेवारीला गुन्हा दाखल झाला आणि बोरोले पितापुत्रानी स्थानिक कोर्टपासून ते थेट सुप्रीम कोर्टापर्यंत अटकपूर्व जामीनासाठी धावपळ केली. पण सुप्रीम कोर्टानंही त्यांना जामीन नाकारला होता. फरार असलेले बोरोले पिता-पुत्र पोलिसांना कुठेही सापडत नव्हते.

याच सहकार खात्याचा आशिर्वाद बोरोलेंच्या तापी पतसंस्थेला नेहमीच मिळाला. ठेवी परत मिळत नसल्याने अनेक पीडित ठेवीदारांनी या कार्यालयात वारंवार चकरा मारल्या. पण त्यांना आश्वासनाशिवाय काहीही मिळालं नाही. बोरोले हे विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांचे व्याही असल्यानं त्यांच्याविरुध्द सहकार आणि पोलीस काहीही करायला तयार नाहीत असा ठेवीदारांचा थेट आरोप होता.

याच डॉ.सुरेश बोरोलेंनी नाममात्र जामीनावर आपल्या नातेवाईकांच्या नावानं करोडो रुपयांची कर्ज 2007 साली तापी पतसंस्थेतून घेतली. कर्जदारांमध्ये भाऊ,पत्नी,भाचा यांचाच समावेश आहे. पण याच बोरोलेंना आम्ही 25 जून 2008 ला विचारलं तर त्यांनी त्याहीवेळेस सफाईनं इन्कार केला होता.

डॉ.बोरोलेंना अटक करा या मागण्यांसाठी ठेवीदारांनी आंदोलन सुरु केलं होतं. सुप्रीम कोर्टानं जामीन नाकारल्याने बोरोलेंना अटक होणं हे अटळच होतं. पण आपले ठेवींचे पैसे कधीतरी मिळतील या वेड्या आशेवर जगणार्‍या माणसांना न्याय मिळेल का हाच खरा प्रश्न आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2012 11:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close