S M L

शिकार्‍यांची 'खबर' घेण्यासाठी राज ठाकरे ताडोबाच्या भेटीला

29 मेपानवठ्यावर पाणी पिण्यासाठी येण्यार्‍या वाघासारख्या सुंदर प्राण्याची शिकार केली जाते हा प्रकार अत्यंत निदंनिय आहे.या मुक्या प्राण्याला ठार मारणार्‍या शिकार्‍यांना भर रस्त्यावर फोडून काढा असा माझा आदेश आहे असं ठणकावून सांगणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आता शिकार्‍यांची खबर घेण्यासाठी विदर्भ दौर्‍यावर रवाना झाले आहे. राज यांचा हा सहा दिवसांचा दौरा असणार आहे. या दौर्‍यात ताडोबा अभायरण्याला भेट देणार आहे.मागिल महिन्यापासून ताडोबाच्या परिसरात तीन वाघांची हत्या झाली. तसेच राज्यातील वाघांच्या शिकारीची सुपारीच बहेलिया जमातीला देण्यात आली आहे. याप्रकरणानंतर ताडोबा अभयारण्याच्या परिसरात दुसर्‍याच्या दिवशी गोंडमोहाडी येथे वाघांची सापळा रचून हत्या करण्यात आली होती. हा प्रकार इथेच थांबत नाही तोच महावितरणच्या गलथान कारभारमुळे एक मादी बिबट्या आणि तीचे तीन पिलं, रानडुक्कर, मुंगुस यांना वीजेचा धक्का लागून आपला जीव गमवावा लागला होता. ठाकरे परिवाराचं वाघ्रप्रेम सर्वश्रृत आहे. मागिल वर्षी उध्दव ठाकरेंही चिंरजीव आदित्य ठाकरेंसोबत ताडोबाच्या सफरीवर जाऊन आले होते. त्यांच्यापाठोपाठ राज ठाकरे आता ताडोबांच्या भेटीला आज संध्याकाळी मुंबईहुन विदर्भ एक्सप्रेसने रवाना झाले आहे. पण राज ठाकरे या दौर्‍यात वाघोबांना ठार मारण्यांची खबर घेण्यासाठी रवाना झाले आहे. मागिल महिन्यात 27 एप्रिल रोजी दोन पट्टेदार वाघांची शिकार केल्याची उघड झालं होतं. राज यांनी याबद्दल हळहळ व्यक्त करत शिकार्‍यांचा थेट धमकी दिली होती. पाणी पिण्यासाठी येणार्‍या या मुक्या प्राण्याला फास टाकून मारलं जातं. इतका सुंदर प्राणी ज्याची संख्या आता कमी राहिली आहे अशा प्राण्यांना ठार मारले जाते ते पण त्याच्या कातडीच्या तस्करीसाठी हे अत्यंत निदंनिय आहे अशा शिकार्‍यांना पकडून भर रस्त्यावर फोडून काढा असा माझा आदेश आहे असं राज यांनी आपल्या पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात ठणकावून सांगितलं होतं. तसेच वनप्रेमी, प्राणी संघटनांच्या भेटी घ्या त्यासाठी उपाययोजना करा असंही राज यांनी कार्यकर्त्यांना सुचना केली होती. त्याचबरोबर ताडोबामध्ये सहा हजार हेक्टर एवढं जंगल जाळून टाकण्यात आलं होतं. जंगल जाळून या लोकांना त्याखालील खाणी खोदून काढायच्या यासाठी हा सगळा खटाटोप चालला आहे असा आरोप राज यांनी केला. या सर्व प्रकरणाबद्दल राज ठाकरे स्वत: जाऊन घटनास्थळांना भेटी देणार आहे. त्यानंतर पुर्व विदर्भ मनसे पदाधिकार्‍यांची बैठक घेणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 29, 2012 03:06 PM IST

शिकार्‍यांची 'खबर' घेण्यासाठी राज ठाकरे ताडोबाच्या भेटीला

29 मे

पानवठ्यावर पाणी पिण्यासाठी येण्यार्‍या वाघासारख्या सुंदर प्राण्याची शिकार केली जाते हा प्रकार अत्यंत निदंनिय आहे.या मुक्या प्राण्याला ठार मारणार्‍या शिकार्‍यांना भर रस्त्यावर फोडून काढा असा माझा आदेश आहे असं ठणकावून सांगणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आता शिकार्‍यांची खबर घेण्यासाठी विदर्भ दौर्‍यावर रवाना झाले आहे. राज यांचा हा सहा दिवसांचा दौरा असणार आहे. या दौर्‍यात ताडोबा अभायरण्याला भेट देणार आहे.

मागिल महिन्यापासून ताडोबाच्या परिसरात तीन वाघांची हत्या झाली. तसेच राज्यातील वाघांच्या शिकारीची सुपारीच बहेलिया जमातीला देण्यात आली आहे. याप्रकरणानंतर ताडोबा अभयारण्याच्या परिसरात दुसर्‍याच्या दिवशी गोंडमोहाडी येथे वाघांची सापळा रचून हत्या करण्यात आली होती. हा प्रकार इथेच थांबत नाही तोच महावितरणच्या गलथान कारभारमुळे एक मादी बिबट्या आणि तीचे तीन पिलं, रानडुक्कर, मुंगुस यांना वीजेचा धक्का लागून आपला जीव गमवावा लागला होता. ठाकरे परिवाराचं वाघ्रप्रेम सर्वश्रृत आहे. मागिल वर्षी उध्दव ठाकरेंही चिंरजीव आदित्य ठाकरेंसोबत ताडोबाच्या सफरीवर जाऊन आले होते. त्यांच्यापाठोपाठ राज ठाकरे आता ताडोबांच्या भेटीला आज संध्याकाळी मुंबईहुन विदर्भ एक्सप्रेसने रवाना झाले आहे.

पण राज ठाकरे या दौर्‍यात वाघोबांना ठार मारण्यांची खबर घेण्यासाठी रवाना झाले आहे. मागिल महिन्यात 27 एप्रिल रोजी दोन पट्टेदार वाघांची शिकार केल्याची उघड झालं होतं. राज यांनी याबद्दल हळहळ व्यक्त करत शिकार्‍यांचा थेट धमकी दिली होती. पाणी पिण्यासाठी येणार्‍या या मुक्या प्राण्याला फास टाकून मारलं जातं. इतका सुंदर प्राणी ज्याची संख्या आता कमी राहिली आहे अशा प्राण्यांना ठार मारले जाते ते पण त्याच्या कातडीच्या तस्करीसाठी हे अत्यंत निदंनिय आहे अशा शिकार्‍यांना पकडून भर रस्त्यावर फोडून काढा असा माझा आदेश आहे असं राज यांनी आपल्या पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात ठणकावून सांगितलं होतं.

तसेच वनप्रेमी, प्राणी संघटनांच्या भेटी घ्या त्यासाठी उपाययोजना करा असंही राज यांनी कार्यकर्त्यांना सुचना केली होती. त्याचबरोबर ताडोबामध्ये सहा हजार हेक्टर एवढं जंगल जाळून टाकण्यात आलं होतं. जंगल जाळून या लोकांना त्याखालील खाणी खोदून काढायच्या यासाठी हा सगळा खटाटोप चालला आहे असा आरोप राज यांनी केला. या सर्व प्रकरणाबद्दल राज ठाकरे स्वत: जाऊन घटनास्थळांना भेटी देणार आहे. त्यानंतर पुर्व विदर्भ मनसे पदाधिकार्‍यांची बैठक घेणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 29, 2012 03:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close