S M L

'पंतप्रधानांवर आरोप 'कॅग'ने केले, टीम अण्णांनी नव्हे'

30 मेटीम अण्णांनी केलेल्या आरोपावर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काल तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर आज टीम अण्णांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधानांवर केलेले आरोप टीम अण्णांनी नव्हे तर कॅगने केले आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली. कोल ब्लॉक घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश पंतप्रधानांनी 2 महिन्यांच्या आत द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. पण, पंतप्रधानांवर तोफ डागण्यावरून टीम अण्णांमध्ये मतभेद असल्याची कबुली त्यांनी दिली. टीम अण्णांनी पंतप्रधांनांना 4 महत्त्वाचे प्रश्न विचारलेत1) केंद्रीय मंत्रीच घोटाळ्यात अडकलेले असतांना निष्पक्ष चौकशी देशातील कुठल्या तपास यंत्रणेद्वारे चौकशी करणार ?2) जर पंतप्रधान किंवा कुठलेही मंत्री भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी असतील तर त्यांच्या विरोधात चौकशी करावी की नाही ? 3) कोळसा मंत्रालयाच्या सचिवांनी जर कोल ब्लॉकचा लिलाव करण्याची शिफारस केली होती तर पंतप्रधान कार्यालयाने लिलाव का केला नाही ? 4) कॅगच्या अहवालात सांगण्यात आल्याप्रमाणे कोळशाच्या ब्लॉकमधील लिलावात सरकारच्या तिजोरीचे किती नुकसान झाले आहे ?

आईबीएन लोकमत | Updated On: May 30, 2012 11:04 AM IST

'पंतप्रधानांवर आरोप 'कॅग'ने केले, टीम अण्णांनी नव्हे'

30 मे

टीम अण्णांनी केलेल्या आरोपावर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काल तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर आज टीम अण्णांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधानांवर केलेले आरोप टीम अण्णांनी नव्हे तर कॅगने केले आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली. कोल ब्लॉक घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश पंतप्रधानांनी 2 महिन्यांच्या आत द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. पण, पंतप्रधानांवर तोफ डागण्यावरून टीम अण्णांमध्ये मतभेद असल्याची कबुली त्यांनी दिली. टीम अण्णांनी पंतप्रधांनांना 4 महत्त्वाचे प्रश्न विचारलेत1) केंद्रीय मंत्रीच घोटाळ्यात अडकलेले असतांना निष्पक्ष चौकशी देशातील कुठल्या तपास यंत्रणेद्वारे चौकशी करणार ?2) जर पंतप्रधान किंवा कुठलेही मंत्री भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी असतील तर त्यांच्या विरोधात चौकशी करावी की नाही ? 3) कोळसा मंत्रालयाच्या सचिवांनी जर कोल ब्लॉकचा लिलाव करण्याची शिफारस केली होती तर पंतप्रधान कार्यालयाने लिलाव का केला नाही ? 4) कॅगच्या अहवालात सांगण्यात आल्याप्रमाणे कोळशाच्या ब्लॉकमधील लिलावात सरकारच्या तिजोरीचे किती नुकसान झाले आहे ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2012 11:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close