S M L

आता 'रोमिंग फ्री' बोला

31 मेएका शहरातून दुसर्‍या शहरात प्रवेश केला ही 'वेलकम टू अमूक अमूक कंपनी' असा मॅसेज हमखास आपल्या मोबाईलवर धडकतो. मात्र हे वेलकम नसून तुम्हाला रोमिंग लागणार हे सांगणारे एसएमएस असतात. मात्र हे एसएमएस आता कायमचे बंद होणार आहे. कारण, नव्या दूरसंचार धोरणाच्या नव्या मसुद्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे देशाअंतर्गत रोमिंग चार्जेस पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे अशी घोषणा कपिल सिबल यांनी आज दिल्लीत केली. ग्राहकांच्या हिताकडे अधिक लक्ष देणारी यंत्रणा तयार करण्यात येणार तसेच स्पेक्ट्रम प्रायसिंगपासून लायन्सिंग वेगळं केलं जाणार आहे. नव्या धोरणात ग्रामीण भागाच्या स्पेशल कव्हरेजवर जास्त भर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता रोमिंग तर इतिहास जमा होणार आहेच पण नंबर पोर्टेबिलिटी सेवेचा अधिक फायदा घेता येणार आहे. नंबर पोर्टेबिलिटीमुळे तुम्ही एका शहरात वापर असलेला क्रमांक दुसर्‍या शहरातही वापरता येणार आहे. पण याचा वापर कसा होणार याबद्दल लनकरच खुलासा होणार आहे. तसेच देशभरात मोबाईल कनेक्शनसाठी 22 क्षेत्र होती ती आता 3 वर आणण्यात आली आहे. सरकारने हा निर्णय टेलिकॉम कंपन्यांच्या सुचनांना लक्षात घेऊन घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 31, 2012 05:57 PM IST

आता 'रोमिंग फ्री' बोला

31 मे

एका शहरातून दुसर्‍या शहरात प्रवेश केला ही 'वेलकम टू अमूक अमूक कंपनी' असा मॅसेज हमखास आपल्या मोबाईलवर धडकतो. मात्र हे वेलकम नसून तुम्हाला रोमिंग लागणार हे सांगणारे एसएमएस असतात. मात्र हे एसएमएस आता कायमचे बंद होणार आहे. कारण, नव्या दूरसंचार धोरणाच्या नव्या मसुद्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे देशाअंतर्गत रोमिंग चार्जेस पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे अशी घोषणा कपिल सिबल यांनी आज दिल्लीत केली. ग्राहकांच्या हिताकडे अधिक लक्ष देणारी यंत्रणा तयार करण्यात येणार तसेच स्पेक्ट्रम प्रायसिंगपासून लायन्सिंग वेगळं केलं जाणार आहे. नव्या धोरणात ग्रामीण भागाच्या स्पेशल कव्हरेजवर जास्त भर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता रोमिंग तर इतिहास जमा होणार आहेच पण नंबर पोर्टेबिलिटी सेवेचा अधिक फायदा घेता येणार आहे. नंबर पोर्टेबिलिटीमुळे तुम्ही एका शहरात वापर असलेला क्रमांक दुसर्‍या शहरातही वापरता येणार आहे. पण याचा वापर कसा होणार याबद्दल लनकरच खुलासा होणार आहे. तसेच देशभरात मोबाईल कनेक्शनसाठी 22 क्षेत्र होती ती आता 3 वर आणण्यात आली आहे. सरकारने हा निर्णय टेलिकॉम कंपन्यांच्या सुचनांना लक्षात घेऊन घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 31, 2012 05:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close