S M L

सुदाम मुंडेंना राजकीय पाठबळ !

01 जूनबीड येथील परळीमध्ये गर्भलिंग निदान प्रकरणी डॉ. सुदाम मुंडेंसंबंधी महत्त्वाची माहिती आयबीएन लोकमतच्या हाती लागली आहेत. बीडच्या पोलीस अधीक्षकांनी राज्याच्या डीजीपींना लिहिलेला गोपनीय अहवाल आमच्या हाती लागला आहे. या अहवालात म्हटलंय की, डॉ. सुदाम मुंडे याला स्थानिक राजकीय पाठबळ आहे. हा खटला बाहेरच्या जिल्ह्यात चालवावा, अशी शिफारसही करण्यात आली आहे. आता डॉ.मुंडेच्या पाठिशी कोणता राजकीय नेता आहे यावरुन आरोप प्रत्यारोप होऊ लागलेत. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी तर अप्रत्यक्षपणे गोपीनाथ मुंडे यांचाच वरदहस्त असल्याचं म्हटलंय. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी अहवालात पोलिसांनी कोणाचं नाव का घेतलं नाही असा सवाल उपस्थित केला आहे. दरम्यान, आयबीएन लोकमतशी बोलताना धनंजय मुंडे यांनी आमचा डॉ.सुदाम मुंडे आणि त्यांच्या हॉस्पिटलशी काहीही एक संबंध नाही असं स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 1, 2012 11:23 AM IST

सुदाम मुंडेंना राजकीय पाठबळ !

01 जून

बीड येथील परळीमध्ये गर्भलिंग निदान प्रकरणी डॉ. सुदाम मुंडेंसंबंधी महत्त्वाची माहिती आयबीएन लोकमतच्या हाती लागली आहेत. बीडच्या पोलीस अधीक्षकांनी राज्याच्या डीजीपींना लिहिलेला गोपनीय अहवाल आमच्या हाती लागला आहे. या अहवालात म्हटलंय की, डॉ. सुदाम मुंडे याला स्थानिक राजकीय पाठबळ आहे. हा खटला बाहेरच्या जिल्ह्यात चालवावा, अशी शिफारसही करण्यात आली आहे. आता डॉ.मुंडेच्या पाठिशी कोणता राजकीय नेता आहे यावरुन आरोप प्रत्यारोप होऊ लागलेत. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी तर अप्रत्यक्षपणे गोपीनाथ मुंडे यांचाच वरदहस्त असल्याचं म्हटलंय. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी अहवालात पोलिसांनी कोणाचं नाव का घेतलं नाही असा सवाल उपस्थित केला आहे. दरम्यान, आयबीएन लोकमतशी बोलताना धनंजय मुंडे यांनी आमचा डॉ.सुदाम मुंडे आणि त्यांच्या हॉस्पिटलशी काहीही एक संबंध नाही असं स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2012 11:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close