S M L

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा मधुकरराव पिचड ?

01 जूनराष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक उद्या शनिवारी होत आहे. पण निवडणूक न होता एकमताने विद्यमान प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांचीच पुन्हा या पदावर नियुक्ती होण्याची शक्यता आहे. कारण नुकत्याच झालेल्या महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी चांगली झाली. आणि त्यामुळेच पिचड यांना पुन्हा प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवावी असा मतप्रवाह पक्षात आहे. तर बबनराव पाचपुते, सुनिल तटकरे आणि आर आर पाटील या तीन मंत्र्यापैकी एकाची नियुक्ती प्रदेशाध्यक्षपदी होईल अशीही जोरदार चर्चा सध्या पक्षात आहे. त्याचबरोबर मुंबईच्या अध्यक्षपदाची घोषणाही याच बैठकीत होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे सध्याचे अध्यक्ष नरेंद्र वर्मा यांची गच्छंती होऊन त्या जागी नव्या चेहर्‍याला संधी देण्यात येईल अशी दाट शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 1, 2012 01:21 PM IST

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा मधुकरराव पिचड ?

01 जून

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक उद्या शनिवारी होत आहे. पण निवडणूक न होता एकमताने विद्यमान प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांचीच पुन्हा या पदावर नियुक्ती होण्याची शक्यता आहे. कारण नुकत्याच झालेल्या महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी चांगली झाली. आणि त्यामुळेच पिचड यांना पुन्हा प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवावी असा मतप्रवाह पक्षात आहे. तर बबनराव पाचपुते, सुनिल तटकरे आणि आर आर पाटील या तीन मंत्र्यापैकी एकाची नियुक्ती प्रदेशाध्यक्षपदी होईल अशीही जोरदार चर्चा सध्या पक्षात आहे. त्याचबरोबर मुंबईच्या अध्यक्षपदाची घोषणाही याच बैठकीत होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे सध्याचे अध्यक्ष नरेंद्र वर्मा यांची गच्छंती होऊन त्या जागी नव्या चेहर्‍याला संधी देण्यात येईल अशी दाट शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2012 01:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close