S M L

पंतप्रधान VS टीम अण्णा !

01 मेदेशात सध्या गाजत असलेल्या कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी सीबीआय प्राथमिक चौकशी करणार आहे. त्याचा अहवाल तीन महिन्यात सादर करण्यात येईल. पण सीबीआयच्या तपासात कुठल्याच मंत्र्याची चौकशी केली जाणार नाही. इतकंच नाही तर तपास करताना सीबीआय खाण वाटपाच्या धोरणात्मक बाबींचाही विचार करणार नाही. सीबीआयच्या या चौकशीला टीम अण्णानं विरोध केला आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांना क्लीन चिट देण्यासाठीच चौकशीचं नाटक केलं जात असल्याचा आरोप टीम अण्णांनी केला. सीबीआय तपासाऐवजी स्वतंत्र संस्थेद्वारे चौकशी करावी, अशी मागणी टीम अण्णांनी केली आहे पण सरकारने ही मागणी पुन्हा एकदा फेटाळली आहे. देशात खळबळ माजवणार्‍या कोल गेट घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीला टीम अण्णानं कडाडून विरोध केलाय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या घोटाळ्यात थेट पंतप्रधान कार्यालयावरच आरोप करण्यात आलेत. काही विशिष्ट कंपन्यांच्या फायद्यासाठी कोळसा खाणींच्या लिलावात कोळसा मंत्रालयानं दोन वर्षांचा उशीर केल्याचा आरोप होतोय. त्यासंबंधीचा तपास सीबीआय करणार आहे. कोळसा खाण वाटप घोटाळा - सीबीआय करणार तपास* खाणींचा लिलाव 2 वर्ष उशिरानं करण्यात आला.* ज्या 156 कंपन्यांना खाणींचं वाटप करण्यात आलं त्यांनी अधिक रक्कम घेऊन या खाणी इतर कंपन्यांना दिल्या. * तब्बल 51 लाख कोटींचा कोळसा काही विशिष्ट खाजगी कंपन्यांना मोफत देण्यात आला.पण कोळसा खाण वाटपाचा हा व्यवहार पारदर्शी असल्याचं पंतप्रधान कार्यालय आणि सरकारनंही स्पष्ट केलंय. इतकंच नाही तर खाणींचा लिलाव का केला नाही, हे विचारणार्‍या भाजपचीच सत्ता असलेल्या काही राज्यांनी लिलावालाच विरोध केल्याचंही सरकारचं म्हणणं आहे. कोळसा खाण वाटप घोटाळ्याचे आरोप सिद्ध झाले तर सार्वजनिक जीवनातून निवृत्त होईल, असं वक्तव्य करून पंतप्रधानांनी चूक केल्याचं काँग्रेस सूत्रांचं म्हणणं आहे. या वक्तव्यामुळे या वादाला टीम अण्णा विरूद्ध पंतप्रधान असा रंग आल्याचं काही काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. हा वाद एवढ्यात तरी मिटणार नाही, हे मात्र नक्की..

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 1, 2012 03:47 PM IST

पंतप्रधान VS टीम अण्णा !

01 मे

देशात सध्या गाजत असलेल्या कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी सीबीआय प्राथमिक चौकशी करणार आहे. त्याचा अहवाल तीन महिन्यात सादर करण्यात येईल. पण सीबीआयच्या तपासात कुठल्याच मंत्र्याची चौकशी केली जाणार नाही. इतकंच नाही तर तपास करताना सीबीआय खाण वाटपाच्या धोरणात्मक बाबींचाही विचार करणार नाही. सीबीआयच्या या चौकशीला टीम अण्णानं विरोध केला आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांना क्लीन चिट देण्यासाठीच चौकशीचं नाटक केलं जात असल्याचा आरोप टीम अण्णांनी केला. सीबीआय तपासाऐवजी स्वतंत्र संस्थेद्वारे चौकशी करावी, अशी मागणी टीम अण्णांनी केली आहे पण सरकारने ही मागणी पुन्हा एकदा फेटाळली आहे.

देशात खळबळ माजवणार्‍या कोल गेट घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीला टीम अण्णानं कडाडून विरोध केलाय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या घोटाळ्यात थेट पंतप्रधान कार्यालयावरच आरोप करण्यात आलेत.

काही विशिष्ट कंपन्यांच्या फायद्यासाठी कोळसा खाणींच्या लिलावात कोळसा मंत्रालयानं दोन वर्षांचा उशीर केल्याचा आरोप होतोय. त्यासंबंधीचा तपास सीबीआय करणार आहे. कोळसा खाण वाटप घोटाळा - सीबीआय करणार तपास* खाणींचा लिलाव 2 वर्ष उशिरानं करण्यात आला.* ज्या 156 कंपन्यांना खाणींचं वाटप करण्यात आलं त्यांनी अधिक रक्कम घेऊन या खाणी इतर कंपन्यांना दिल्या. * तब्बल 51 लाख कोटींचा कोळसा काही विशिष्ट खाजगी कंपन्यांना मोफत देण्यात आला.

पण कोळसा खाण वाटपाचा हा व्यवहार पारदर्शी असल्याचं पंतप्रधान कार्यालय आणि सरकारनंही स्पष्ट केलंय. इतकंच नाही तर खाणींचा लिलाव का केला नाही, हे विचारणार्‍या भाजपचीच सत्ता असलेल्या काही राज्यांनी लिलावालाच विरोध केल्याचंही सरकारचं म्हणणं आहे.

कोळसा खाण वाटप घोटाळ्याचे आरोप सिद्ध झाले तर सार्वजनिक जीवनातून निवृत्त होईल, असं वक्तव्य करून पंतप्रधानांनी चूक केल्याचं काँग्रेस सूत्रांचं म्हणणं आहे. या वक्तव्यामुळे या वादाला टीम अण्णा विरूद्ध पंतप्रधान असा रंग आल्याचं काही काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. हा वाद एवढ्यात तरी मिटणार नाही, हे मात्र नक्की..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 1, 2012 03:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close