S M L

गोदावरी बचावासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा उपोषणाचा इशारा

05 मेनाशिकमध्ये पानवेलींमुळे गोदावरी नदीचा श्वास कोंडला आहे. याविषीयी आयबीएन-लोकमतनं सातत्यानं पाठपुरावा केला. याप्रकरणी छगन भुजबळ यांनी गोदावरीची पानवेलींच्या जाचातून सुटका करा असे आदेश दिले होते. अखेर महापालिकेनं पुन्हा गोदावरीच्या पात्रातल्या पानवेलींना काढण्याचं काम सुरू केलं आहे. मात्र हे काम तात्पुरत्या स्वरूपाचं आहे. आर्थिक गणितं असल्यानंच कायमस्वरूपी उपायोजना करण्यात येत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आणि जर पालिकेनं लवकरात लवकर पावलं उचलली नाहीत तर 1 जुलैपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान, गोदावरीला प्रदुषणमुक्त करण्यासाठी आता शालेय विद्यार्थ्यांनीही पुढाकार घेतला आहे. रेहान इंटरनॅशनल स्कूलच्या 200 विद्यार्थ्यांनी आज गोदावरीच्या तीरावर जावून आंदोलन केलं.महापालिकेनं ताताडीन पावलं उचलावी अशी मागणी या मुलांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 5, 2012 11:59 AM IST

गोदावरी बचावासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा उपोषणाचा इशारा

05 मे

नाशिकमध्ये पानवेलींमुळे गोदावरी नदीचा श्वास कोंडला आहे. याविषीयी आयबीएन-लोकमतनं सातत्यानं पाठपुरावा केला. याप्रकरणी छगन भुजबळ यांनी गोदावरीची पानवेलींच्या जाचातून सुटका करा असे आदेश दिले होते. अखेर महापालिकेनं पुन्हा गोदावरीच्या पात्रातल्या पानवेलींना काढण्याचं काम सुरू केलं आहे. मात्र हे काम तात्पुरत्या स्वरूपाचं आहे. आर्थिक गणितं असल्यानंच कायमस्वरूपी उपायोजना करण्यात येत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आणि जर पालिकेनं लवकरात लवकर पावलं उचलली नाहीत तर 1 जुलैपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान, गोदावरीला प्रदुषणमुक्त करण्यासाठी आता शालेय विद्यार्थ्यांनीही पुढाकार घेतला आहे. रेहान इंटरनॅशनल स्कूलच्या 200 विद्यार्थ्यांनी आज गोदावरीच्या तीरावर जावून आंदोलन केलं.महापालिकेनं ताताडीन पावलं उचलावी अशी मागणी या मुलांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2012 11:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close