S M L

आदर्श प्रकरणी माजी मुख्यमंत्र्यांची चौकशी

05 जूनआदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचीही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सीबीआयनं मुंबई हायकोर्टात दिली आहे. याप्रकरणी सीबीआयनं आज मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलं. या घोटाळ्यासंबंधी दाखल याचिकेमध्ये विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, सुनिल तटकरे यांच्यासह इतरही काही जणांवर आरोप करण्यात आले आहे. या सर्व आरोपांचा तपास सुरू असल्याचं सीबीआयनं म्हटलंय. साक्षीदार म्हणून 2 माजी मुख्यमंत्री, प्रधान सचिव आणि राज्यमंत्र्यांचा जबाब नोंदवण्यात आल्याची माहितीही सीबीआयनं दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 5, 2012 01:28 PM IST

आदर्श प्रकरणी माजी मुख्यमंत्र्यांची चौकशी

05 जून

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचीही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सीबीआयनं मुंबई हायकोर्टात दिली आहे. याप्रकरणी सीबीआयनं आज मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलं. या घोटाळ्यासंबंधी दाखल याचिकेमध्ये विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, सुनिल तटकरे यांच्यासह इतरही काही जणांवर आरोप करण्यात आले आहे. या सर्व आरोपांचा तपास सुरू असल्याचं सीबीआयनं म्हटलंय. साक्षीदार म्हणून 2 माजी मुख्यमंत्री, प्रधान सचिव आणि राज्यमंत्र्यांचा जबाब नोंदवण्यात आल्याची माहितीही सीबीआयनं दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2012 01:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close