S M L

म्हाडाची कोट्यावधीची जमीन मंत्र्यांनी लाटली

सुधाकर काश्यप, मुंबई06 जूनमहाराष्ट्रच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांनी गेल्या दहा वर्षाच्या म्हाडाची सुमारे एक लाख चौरस मीटर एवढी जागा केवळ काही सोसायट्यांना दिली आहे. या जागेची किंमत बाजार भावाने सुमारे तीन ते चार हजार कोटी रुपये होते. म्हाडाने या जागेवर सर्वसामान्यांसाठी घरं बांधली असती तर सुमारे दहा ते चौदा हजार घरं बांधली गेली असती ,असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.सर्वसामान्यांना परवडणारी घरं असं म्हाडाचं घोषवाक्य...गेल्या दहा वर्षातल्या मुख्यमंत्र्यांनी म्हाडाची सुमारे एक लाख चौरस फूट इतकी जमीन तब्बल 47 गृहनिर्माण सोसाट्यांना दिल्याचं उघडकीस आलंय. या सोसायट्या मंत्री, त्यांचे खासगी सचिव आणि आमदारांच्या गोतावळ्याची आहे. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांनी ह्या जागा वाटल्या आहेत.मुख्यमंत्र्यांनी वाटलेल्या जागांचं गणित समजून घ्यायचं झाल्यास - एकूण सोसायट्या - 47- म्हाडा जागेवर 2.5 एफएसआय असतो- म्हणजेच 2, 50,000 हजार चौरस मीटर जागा- 2,50,000 X 10.76 = 38,00,000 चौरस फूट कारपेट जागा उपलब्ध- 38 लाखावर 30 टक्के बिल्टअप जागा म्हणजे 53 लाख चौरस फूट जागा उपलब्ध- म्हाडा सर्वसामान्यांसाठी 350 ते 475 चौरस फुटाचं घर बांधते- मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या जागेचा भागाकार केल्यास म्हाडा यामध्ये दहा ते बारा हजार घरं बांधू शकली असतीतत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या सर्व जागा ओशिवरा, वांद्रे, वर्सोवा, चेंबूर आणि गोरेगाव या भागात दिल्या आहेत. इकडे प्रत्येक स्क्वेअर फूटाचा दर दहा ते पंधरा हजार रुपये आहे. दहा हजार रुपयांप्रमाणे 53 लाख चौरस फूटाच्या जागेची किंमत होते, पाच हजार कोटी रुपये.आदर्श सोसायटीच्या इमारतीची किंमत आजमितीस आठशे रुपये आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांची नावंही या प्रकरणात येत आहेत. त्याच मुख्यमंत्र्यांच्या काळात ह्या पाच हजार कोटी रुपयांच्या जमिनीचं वाटप करण्यात आलंय. यावरुन काही सामाजिक कार्यकर्ते जनहित याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 6, 2012 04:47 PM IST

म्हाडाची कोट्यावधीची जमीन मंत्र्यांनी लाटली

सुधाकर काश्यप, मुंबई

06 जून

महाराष्ट्रच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांनी गेल्या दहा वर्षाच्या म्हाडाची सुमारे एक लाख चौरस मीटर एवढी जागा केवळ काही सोसायट्यांना दिली आहे. या जागेची किंमत बाजार भावाने सुमारे तीन ते चार हजार कोटी रुपये होते. म्हाडाने या जागेवर सर्वसामान्यांसाठी घरं बांधली असती तर सुमारे दहा ते चौदा हजार घरं बांधली गेली असती ,असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

सर्वसामान्यांना परवडणारी घरं असं म्हाडाचं घोषवाक्य...गेल्या दहा वर्षातल्या मुख्यमंत्र्यांनी म्हाडाची सुमारे एक लाख चौरस फूट इतकी जमीन तब्बल 47 गृहनिर्माण सोसाट्यांना दिल्याचं उघडकीस आलंय. या सोसायट्या मंत्री, त्यांचे खासगी सचिव आणि आमदारांच्या गोतावळ्याची आहे. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांनी ह्या जागा वाटल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी वाटलेल्या जागांचं गणित समजून घ्यायचं झाल्यास

- एकूण सोसायट्या - 47- म्हाडा जागेवर 2.5 एफएसआय असतो- म्हणजेच 2, 50,000 हजार चौरस मीटर जागा- 2,50,000 X 10.76 = 38,00,000 चौरस फूट कारपेट जागा उपलब्ध- 38 लाखावर 30 टक्के बिल्टअप जागा म्हणजे 53 लाख चौरस फूट जागा उपलब्ध- म्हाडा सर्वसामान्यांसाठी 350 ते 475 चौरस फुटाचं घर बांधते- मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या जागेचा भागाकार केल्यास म्हाडा यामध्ये दहा ते बारा हजार घरं बांधू शकली असती

तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या सर्व जागा ओशिवरा, वांद्रे, वर्सोवा, चेंबूर आणि गोरेगाव या भागात दिल्या आहेत. इकडे प्रत्येक स्क्वेअर फूटाचा दर दहा ते पंधरा हजार रुपये आहे. दहा हजार रुपयांप्रमाणे 53 लाख चौरस फूटाच्या जागेची किंमत होते, पाच हजार कोटी रुपये.आदर्श सोसायटीच्या इमारतीची किंमत आजमितीस आठशे रुपये आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांची नावंही या प्रकरणात येत आहेत. त्याच मुख्यमंत्र्यांच्या काळात ह्या पाच हजार कोटी रुपयांच्या जमिनीचं वाटप करण्यात आलंय. यावरुन काही सामाजिक कार्यकर्ते जनहित याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 6, 2012 04:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close