S M L

आदर्श प्रकरणी फाटक, तिवारींना जामीन मंजूर

07 जूनबहुचर्चित आदर्श सोसायटी घोटाळ्या प्रकरणी जयराज फाटक आणि रामानंद तिवारींचा जामीन मंजूर झाला आहे. 5 लाखांच्या जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला. तिवारी आणि फाटक यांच्याविरोधात सीबीआयने 60 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल न केल्यामुळे त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला. या अगोदर मागिल महिन्यात 29 मे रोजी 7 आरोपींना जामीन मंजूर झाला. त्यावेळीही 60 दिवसात आरोपपत्र दाखल करण्यास सीबीआयला अपयश आल्यानं सातही आरोपींची प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीनावर सुटका झाली. या सात आरोपींमध्ये माजी जिल्हाधिकारी प्रदीप व्यास,नगरविकास खात्याचे माजी उपसचिव पी.व्ही.देशमुख.निवृत्त ब्रिगेडियर एम.एम.वांच्छू, आर.सी.ठाकूर, निवृत्त मेजर जनरल ए.आर.कुमार, निवृत्त मेजर जनरल टी.के.कौल, माजी आमदार कन्हैय्यालाल गिडवानी यांचा समावेश आहे. या सात आरोपींसह फाटक आणि तिवारी यांना जामीन मिळाल्यामुळे 9 जण आता तुरुंगाबाहेर आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 7, 2012 10:16 AM IST

आदर्श प्रकरणी फाटक, तिवारींना जामीन मंजूर

07 जून

बहुचर्चित आदर्श सोसायटी घोटाळ्या प्रकरणी जयराज फाटक आणि रामानंद तिवारींचा जामीन मंजूर झाला आहे. 5 लाखांच्या जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला. तिवारी आणि फाटक यांच्याविरोधात सीबीआयने 60 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल न केल्यामुळे त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला. या अगोदर मागिल महिन्यात 29 मे रोजी 7 आरोपींना जामीन मंजूर झाला. त्यावेळीही 60 दिवसात आरोपपत्र दाखल करण्यास सीबीआयला अपयश आल्यानं सातही आरोपींची प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीनावर सुटका झाली. या सात आरोपींमध्ये माजी जिल्हाधिकारी प्रदीप व्यास,नगरविकास खात्याचे माजी उपसचिव पी.व्ही.देशमुख.निवृत्त ब्रिगेडियर एम.एम.वांच्छू, आर.सी.ठाकूर, निवृत्त मेजर जनरल ए.आर.कुमार, निवृत्त मेजर जनरल टी.के.कौल, माजी आमदार कन्हैय्यालाल गिडवानी यांचा समावेश आहे. या सात आरोपींसह फाटक आणि तिवारी यांना जामीन मिळाल्यामुळे 9 जण आता तुरुंगाबाहेर आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 7, 2012 10:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close