S M L

वाळूमाफियांनी कोतवालाला ट्रॅक्टरखाली चिरडले

08 जूनसातार्‍यातील माण तालुक्यात म्हसवडमध्ये आज सकाळी 9 च्या सुमारास वाळूमाफियांनी राजेंद्र सरतापे या कोतवालाला ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारण्याची खळबळजनक घटना घडली आहे. वाळूचा बेकादेशीरपणे होणारा उपसा रोखण्यासाठी कोतवाल आणि तलाठी गेले होते. यावेळी वाळूमाफियांची आणि सरतापे यांनी बाचाबाची झाली पर्यायाने संतापलेल्या मुजोर वाळूमाफियाने सरतापे यांच्यावर ट्रॅक्टर चढवला यात त्यांचा मृत्यू झाला. यावेळी ट्रॅक्टरच्या धडकेनं आणखी 2 जण जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सरतापे यांची हत्या करुन वाळूमाफिया फरार झाले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. वाळूमाफियांच्या कृत्याचा निषेध करत म्हसवड गावात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. जो पर्यंत मारेकर्‍यांवर अटक करण्यात येत नाही तोपर्यंत सरतापे यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा गावकर्‍यांनी घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 8, 2012 10:12 AM IST

वाळूमाफियांनी कोतवालाला ट्रॅक्टरखाली चिरडले

08 जून

सातार्‍यातील माण तालुक्यात म्हसवडमध्ये आज सकाळी 9 च्या सुमारास वाळूमाफियांनी राजेंद्र सरतापे या कोतवालाला ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारण्याची खळबळजनक घटना घडली आहे. वाळूचा बेकादेशीरपणे होणारा उपसा रोखण्यासाठी कोतवाल आणि तलाठी गेले होते. यावेळी वाळूमाफियांची आणि सरतापे यांनी बाचाबाची झाली पर्यायाने संतापलेल्या मुजोर वाळूमाफियाने सरतापे यांच्यावर ट्रॅक्टर चढवला यात त्यांचा मृत्यू झाला. यावेळी ट्रॅक्टरच्या धडकेनं आणखी 2 जण जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सरतापे यांची हत्या करुन वाळूमाफिया फरार झाले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. वाळूमाफियांच्या कृत्याचा निषेध करत म्हसवड गावात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. जो पर्यंत मारेकर्‍यांवर अटक करण्यात येत नाही तोपर्यंत सरतापे यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा गावकर्‍यांनी घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2012 10:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close