S M L

पिंपरी चिंचवड पालिकेला नालेसफाईला मुहूर्त मिळेना

09 जूनजूनचा पहिला आठवडा संपत आला पण पिंपरी चिंचवडमध्ये नाल्यांची साफसफाई मोहीम अजून हाती घेण्यात आलेली नाही. या उलट शहरातल्या अनेक नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय. पिंपरी शहरातून वाहणारा मुख्य नाला साफ करण्यात आलेला नाही. मुळा, पवना आणि इंद्रायणी या तीन नद्या या क्षेत्रातून वाहतात. त्यासुध्दा पूर्णपणे प्रदूषित झाल्या आहेत. नाल्यावरच्या अतिक्रमणावर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघेही तोंड उघडायला तयार नाहीत. कठोर आणि कर्तव्यदक्ष म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रीकर परदेशी यांनी नुकतीच पालिका आयुक्त म्हणून सूत्रं हाती घेतली आहेत. त्यांच्याकडून नागरिक आणि पर्यावरण तज्ज्ञांना खूप अपेक्षा आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 9, 2012 12:00 PM IST

पिंपरी चिंचवड पालिकेला नालेसफाईला मुहूर्त मिळेना

09 जून

जूनचा पहिला आठवडा संपत आला पण पिंपरी चिंचवडमध्ये नाल्यांची साफसफाई मोहीम अजून हाती घेण्यात आलेली नाही. या उलट शहरातल्या अनेक नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय. पिंपरी शहरातून वाहणारा मुख्य नाला साफ करण्यात आलेला नाही. मुळा, पवना आणि इंद्रायणी या तीन नद्या या क्षेत्रातून वाहतात. त्यासुध्दा पूर्णपणे प्रदूषित झाल्या आहेत. नाल्यावरच्या अतिक्रमणावर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघेही तोंड उघडायला तयार नाहीत. कठोर आणि कर्तव्यदक्ष म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रीकर परदेशी यांनी नुकतीच पालिका आयुक्त म्हणून सूत्रं हाती घेतली आहेत. त्यांच्याकडून नागरिक आणि पर्यावरण तज्ज्ञांना खूप अपेक्षा आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2012 12:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close