S M L

अण्णा राष्ट्रविरोधी शक्तींच्या गराड्यात अडकले - नारायण सामी

09 जूनपंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्यावर टीम अण्णांनी केलेल्या आरोपाला पंतप्रधान कार्यालयानं आज पत्र लिहून प्रत्युत्तर दिलंय. भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या 15 मंत्र्यांची एका विशेष समितीकडून चौकशी करण्यात यावी ही टीम अण्णांची मागणी पंतप्रधाना कार्यालयानं फेटाळून लावली आहे. कोळसा खाण वाटपात कोणत्याही नियमांचं उल्लंघन झालेलं नाही. यासंदर्भात टीम अण्णांकडे कोणतेही पुरावे नाहीत असं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी अण्णांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. त्याचबरोबर अण्णा साधे आहेत पण ते राष्ट्रविरोधी शक्तींच्या गराड्यात अडकले आहेत. अशा कठोर शब्दात त्यांनी टीम अण्णांवर टीका केली. लोकपाल विधेयकासाठी सरकारने टीम अण्णांच्या सदस्यांशी चर्चा करुनच लोकपाल विधेयक तयार केले आहे. सध्याचे लोकपाल विधेयक मंजबूत आहे स्थायी समितीकडे ते पाठवण्यात आलं आहे. पण टीम अणांनी कोळसा खाण वाटपाचा मुद्दा पकडून पंतप्रधानासह 14 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले हे अत्यंत चुकीचे आणि खोटे आरोप आहे. टीम अण्णांकडे याबाबत कोणताही पुरावा नाही आपण केलेल्या चौकशीची मागणी मान्य करण्यात येऊच शकत नाही. काळा पैशांच्या मुद्यावर सरकारने वेगळा कायदा तयार केला आहे तसेच काही संस्थांना यासाठी कामाला लावले आहे. देशाची न्यायलयीन प्रक्रिया सर्वोच्च आहे त्यावर आपण विश्वास ठेवावा असा सल्लाही स्वामी यांनी टीम अण्णांना दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 9, 2012 03:47 PM IST

अण्णा राष्ट्रविरोधी शक्तींच्या गराड्यात अडकले  - नारायण सामी

09 जून

पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्यावर टीम अण्णांनी केलेल्या आरोपाला पंतप्रधान कार्यालयानं आज पत्र लिहून प्रत्युत्तर दिलंय. भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या 15 मंत्र्यांची एका विशेष समितीकडून चौकशी करण्यात यावी ही टीम अण्णांची मागणी पंतप्रधाना कार्यालयानं फेटाळून लावली आहे. कोळसा खाण वाटपात कोणत्याही नियमांचं उल्लंघन झालेलं नाही. यासंदर्भात टीम अण्णांकडे कोणतेही पुरावे नाहीत असं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी अण्णांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. त्याचबरोबर अण्णा साधे आहेत पण ते राष्ट्रविरोधी शक्तींच्या गराड्यात अडकले आहेत. अशा कठोर शब्दात त्यांनी टीम अण्णांवर टीका केली.

लोकपाल विधेयकासाठी सरकारने टीम अण्णांच्या सदस्यांशी चर्चा करुनच लोकपाल विधेयक तयार केले आहे. सध्याचे लोकपाल विधेयक मंजबूत आहे स्थायी समितीकडे ते पाठवण्यात आलं आहे. पण टीम अणांनी कोळसा खाण वाटपाचा मुद्दा पकडून पंतप्रधानासह 14 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले हे अत्यंत चुकीचे आणि खोटे आरोप आहे. टीम अण्णांकडे याबाबत कोणताही पुरावा नाही आपण केलेल्या चौकशीची मागणी मान्य करण्यात येऊच शकत नाही. काळा पैशांच्या मुद्यावर सरकारने वेगळा कायदा तयार केला आहे तसेच काही संस्थांना यासाठी कामाला लावले आहे. देशाची न्यायलयीन प्रक्रिया सर्वोच्च आहे त्यावर आपण विश्वास ठेवावा असा सल्लाही स्वामी यांनी टीम अण्णांना दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2012 03:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close