S M L

'ठोस निर्णय घेण्यात पंतप्रधान निष्क्रिय'

09 जूनकोळसा खाण वाटपाच्या मुद्याला आता नवं वळण मिळालं आहे. खाण वाटपाच्या मुद्यावर संपूर्णपणे पंतप्रधानांना दोष देऊन चालणार नाही. कोळसा खाण वाटपामध्ये पंतप्रधानांना योग्यरितीनं त्याचं नियोजन करायचं होतं. पण सत्ताधारी मंत्र्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळं पंतप्रधानांना त्यात ठोस निर्णय घेता आला नाही असं कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव पी सी पारेख यांनी म्हटलं आहे आयबीएन नेटवर्कला दिलेल्या एका खास मुलाखतीत त्यांनी हे मत मांडलंय.या मुलाखतीत पारेख म्हणतात, राजकीय व्यवस्था आणि कोळसा उद्योग व्यवसायातील काही लोकांनी खाण वाटप होऊ नये यासाठी प्रयत्न केले. पण फुकटात एखादी गोष्ट मिळत असेल तर त्याची किंमत का मोजायची याचमुळे खाण वाटप करण्याच्या निर्णायाच्या बाजून कोणी उभे राहिले नाही. कोळसा खाण वाटपासाठी कोणत्याही कायद्याची गरज नव्हती यासाठी फक्त सरकारचा एक आदेश पुरा होता. मी फक्त एक सचिव आहे मला सल्ला देण्याचा अधिकार आहे पण पंतप्रधानांनी पाऊलं उचलली असती तर वाटप होऊ शकले असते असंही पारख म्हणाले. तसेच पंतप्रधान स्वत: म्हणाले होते की, या प्रकरणी जास्त वाट पाहण्यापेक्षा तयार धोरणानुसार पुढे चालले पाहिजे. यावर कोळसा मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांनी सगळ्यांना आपलं मत देण्याचा अधिकार आहे. टीम अण्णांच्या सदस्यांनीही कोळसा खाण वाटप कमी भावाने केला गेला असा आरोप केलाय. पण पारख यांच्या वक्तव्यावरुन पंतप्रधान कठोर निर्णय घेण्यात कमी पडतात असंच यावरुन दिसून येतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 9, 2012 04:20 PM IST

'ठोस निर्णय घेण्यात पंतप्रधान निष्क्रिय'

09 जून

कोळसा खाण वाटपाच्या मुद्याला आता नवं वळण मिळालं आहे. खाण वाटपाच्या मुद्यावर संपूर्णपणे पंतप्रधानांना दोष देऊन चालणार नाही. कोळसा खाण वाटपामध्ये पंतप्रधानांना योग्यरितीनं त्याचं नियोजन करायचं होतं. पण सत्ताधारी मंत्र्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळं पंतप्रधानांना त्यात ठोस निर्णय घेता आला नाही असं कोळसा मंत्रालयाचे माजी सचिव पी सी पारेख यांनी म्हटलं आहे आयबीएन नेटवर्कला दिलेल्या एका खास मुलाखतीत त्यांनी हे मत मांडलंय.

या मुलाखतीत पारेख म्हणतात, राजकीय व्यवस्था आणि कोळसा उद्योग व्यवसायातील काही लोकांनी खाण वाटप होऊ नये यासाठी प्रयत्न केले. पण फुकटात एखादी गोष्ट मिळत असेल तर त्याची किंमत का मोजायची याचमुळे खाण वाटप करण्याच्या निर्णायाच्या बाजून कोणी उभे राहिले नाही. कोळसा खाण वाटपासाठी कोणत्याही कायद्याची गरज नव्हती यासाठी फक्त सरकारचा एक आदेश पुरा होता. मी फक्त एक सचिव आहे मला सल्ला देण्याचा अधिकार आहे पण पंतप्रधानांनी पाऊलं उचलली असती तर वाटप होऊ शकले असते असंही पारख म्हणाले. तसेच पंतप्रधान स्वत: म्हणाले होते की, या प्रकरणी जास्त वाट पाहण्यापेक्षा तयार धोरणानुसार पुढे चालले पाहिजे. यावर कोळसा मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांनी सगळ्यांना आपलं मत देण्याचा अधिकार आहे. टीम अण्णांच्या सदस्यांनीही कोळसा खाण वाटप कमी भावाने केला गेला असा आरोप केलाय. पण पारख यांच्या वक्तव्यावरुन पंतप्रधान कठोर निर्णय घेण्यात कमी पडतात असंच यावरुन दिसून येतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2012 04:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close