S M L

जे. डेंच्या हत्येला एक वर्ष पूर्ण ; न्याय कधी ?

12 जूनमिड डे चे पत्रकार जे. डे यांच्या हत्येला आज एक वर्ष पूर्ण होतं आहे. पवईतल्या हिरानंदानी गार्डनमध्ये आजच्या दिवशी एक वर्षांपूर्वीच जे. डे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आतापर्यंत याप्रकरणी 11 जणांना अटक करून हजारो पानांची चार्जशीट दाखल करण्यात आलीय. पण पोलिसांनी अजून ठोस कारवाई केलेली नाही. याचा निषेध म्हणून जे. डे च्या कुटुंबीयांना अजूनही याप्रकरणी न्याय न मिळाल्याची भावना आहे. त्याचाच निषेध करण्यासाठी जे. डे यांचे मित्र, सहकारी, नातेवाईक कँडल मार्च काढणार आहेत. पवईत ज्या ठिकाणी जे. डे. यांची हत्या झाली त्याच ठिकाणाहून आज कँडल मार्च काढण्यात येणार आहे. मिडे डे दैनिकाचे पत्रकार जे.डे यांची हत्या गेल्या वर्षी आजच्या दिवशी दुपारच्या वेळेस झाली होती.पवई येथे जे.डे यांच्या छातीत गोळ्या मारण्यात आल्या होत्या . त्यामुळे जागीच ठार झाले होते. एका वरिष्ठ पत्रकाराच्या हत्येनं एकच खळबळ उडाली. जे.डे यांची हत्या कुणी केली याबाबत काहीच सुगावा पोलिसांना लागत नव्हता. त्यामुळे पोलीस तपासाबाबत संशय व्यक्त केला जात होता. हा तपास सीबीआय क डे द्यावा, यासाठी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली. तर राज्याभरातील पत्रकारांनी मंत्रालयावर मोर्चा काढला. अखेर महिन्याभरानंतर पोलिसांना यश आलं.जे.डे.यांच्या हत्ये मागे गँगस्टर छोटा राजन असल्याचा उलगडा झाला.मुंबई क्राईम ब्राँचच्या अधिकार्‍यांनी मोठ्या मेहनतीने या केस चा उलगडा केला आणि छोटा राजन गँगच्या चार जणांना आधी अटक झाली. छोटा राजनच्या जवळच्या साथिदारांना अटक झाल्यावर आणखी एक खळबळजनक कारवाई म्हणजे पत्रकार जिग्ना व्होरा हिची अटक.. जिग्ना व्होरा हिने छोटा राजन ला जे.डे. यांच्या गाडीचा तसंच त्यांच्या परळ येथील कार्यालयाच पत्ता दिल्याचा तिच्यावर आरोप आहे. या प्रकरणात स्वत: गँगस्टर छोटा राजन याला फरार घोषित करण्यात आलंय. या प्रकरणात पोलिसांनी डिसेंबर 2011 मध्ये आरोप पत्र दाखल केलं. त्यात 11 आरोपींना अटक दाखवण्यात आलीय, तर दोघांना फरार दाखवण्यात आलंय. पण, अजूनही आरोप निश्चित करण्यात आलेले नाहीत. जो पर्यत आरोप निश्चित होत नाहीत तो पर्यत खटला सुरु होणार नाही,या खटल्यात काही आरोपींनी वैद्यकीय कारणास्तव जामिनही मागितलेला आहे. जोपर्यत त्यांच्या अर्जावर आदेश होत नाही, तोपर्यत हा खटला चालणार नाही. म्हणजेच हा खटला सुरु व्हायला अजून वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 11, 2012 03:34 PM IST

जे. डेंच्या हत्येला एक वर्ष पूर्ण ; न्याय कधी ?

12 जून

मिड डे चे पत्रकार जे. डे यांच्या हत्येला आज एक वर्ष पूर्ण होतं आहे. पवईतल्या हिरानंदानी गार्डनमध्ये आजच्या दिवशी एक वर्षांपूर्वीच जे. डे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आतापर्यंत याप्रकरणी 11 जणांना अटक करून हजारो पानांची चार्जशीट दाखल करण्यात आलीय. पण पोलिसांनी अजून ठोस कारवाई केलेली नाही. याचा निषेध म्हणून जे. डे च्या कुटुंबीयांना अजूनही याप्रकरणी न्याय न मिळाल्याची भावना आहे. त्याचाच निषेध करण्यासाठी जे. डे यांचे मित्र, सहकारी, नातेवाईक कँडल मार्च काढणार आहेत. पवईत ज्या ठिकाणी जे. डे. यांची हत्या झाली त्याच ठिकाणाहून आज कँडल मार्च काढण्यात येणार आहे. मिडे डे दैनिकाचे पत्रकार जे.डे यांची हत्या गेल्या वर्षी आजच्या दिवशी दुपारच्या वेळेस झाली होती.पवई येथे जे.डे यांच्या छातीत गोळ्या मारण्यात आल्या होत्या . त्यामुळे जागीच ठार झाले होते. एका वरिष्ठ पत्रकाराच्या हत्येनं एकच खळबळ उडाली. जे.डे यांची हत्या कुणी केली याबाबत काहीच सुगावा पोलिसांना लागत नव्हता. त्यामुळे पोलीस तपासाबाबत संशय व्यक्त केला जात होता. हा तपास सीबीआय क डे द्यावा, यासाठी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली. तर राज्याभरातील पत्रकारांनी मंत्रालयावर मोर्चा काढला. अखेर महिन्याभरानंतर पोलिसांना यश आलं.जे.डे.यांच्या हत्ये मागे गँगस्टर छोटा राजन असल्याचा उलगडा झाला.

मुंबई क्राईम ब्राँचच्या अधिकार्‍यांनी मोठ्या मेहनतीने या केस चा उलगडा केला आणि छोटा राजन गँगच्या चार जणांना आधी अटक झाली. छोटा राजनच्या जवळच्या साथिदारांना अटक झाल्यावर आणखी एक खळबळजनक कारवाई म्हणजे पत्रकार जिग्ना व्होरा हिची अटक.. जिग्ना व्होरा हिने छोटा राजन ला जे.डे. यांच्या गाडीचा तसंच त्यांच्या परळ येथील कार्यालयाच पत्ता दिल्याचा तिच्यावर आरोप आहे.

या प्रकरणात स्वत: गँगस्टर छोटा राजन याला फरार घोषित करण्यात आलंय. या प्रकरणात पोलिसांनी डिसेंबर 2011 मध्ये आरोप पत्र दाखल केलं. त्यात 11 आरोपींना अटक दाखवण्यात आलीय, तर दोघांना फरार दाखवण्यात आलंय. पण, अजूनही आरोप निश्चित करण्यात आलेले नाहीत. जो पर्यत आरोप निश्चित होत नाहीत तो पर्यत खटला सुरु होणार नाही,या खटल्यात काही आरोपींनी वैद्यकीय कारणास्तव जामिनही मागितलेला आहे. जोपर्यत त्यांच्या अर्जावर आदेश होत नाही, तोपर्यत हा खटला चालणार नाही. म्हणजेच हा खटला सुरु व्हायला अजून वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 11, 2012 03:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close