S M L

माझगाव डॉक घरकुल योजनेची चौकशी होणार

15 जूननवी मुंबईत माझगाव डॉक घरकुल योजनेत झालेल्या गैरप्रकाराची आता चौकशी होणार आहे. या योजने अंतर्गत नेव्हीची जमीन हडपण्याचा प्रयत्न होत असल्याची बातमी आयबीएन लोकमतनं दाखवली होती. त्यानंतर सिडको प्रशासन खडबडून जागं झालंय. सिडको अध्यक्ष प्रमोद इंदुराव यांनी पत्रकार परिषद घेऊन या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे या प्रकरणात ट्रायपार्टी ऍग्रीमेंट आणि भूखंडात दिलेल्या सवलतींची आता चौकशी होईल. या संदर्भात नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी माझगाव डॉकचे अधिकारी आणि सिडकोच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. या बैठकीत बेकायदेशीररीत्या तयार करण्यात आलेल्या सोसायट्यांचे चीफ प्रमोटर्सही उपस्थित होते. सिडको आपल्या अखत्यारीत आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही जमीन तुम्हालाच मिळवून देईन असं आश्वासन भास्कर जाधवांनी दिलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 15, 2012 02:15 PM IST

माझगाव डॉक घरकुल योजनेची चौकशी होणार

15 जून

नवी मुंबईत माझगाव डॉक घरकुल योजनेत झालेल्या गैरप्रकाराची आता चौकशी होणार आहे. या योजने अंतर्गत नेव्हीची जमीन हडपण्याचा प्रयत्न होत असल्याची बातमी आयबीएन लोकमतनं दाखवली होती. त्यानंतर सिडको प्रशासन खडबडून जागं झालंय. सिडको अध्यक्ष प्रमोद इंदुराव यांनी पत्रकार परिषद घेऊन या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे या प्रकरणात ट्रायपार्टी ऍग्रीमेंट आणि भूखंडात दिलेल्या सवलतींची आता चौकशी होईल. या संदर्भात नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी माझगाव डॉकचे अधिकारी आणि सिडकोच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. या बैठकीत बेकायदेशीररीत्या तयार करण्यात आलेल्या सोसायट्यांचे चीफ प्रमोटर्सही उपस्थित होते. सिडको आपल्या अखत्यारीत आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही जमीन तुम्हालाच मिळवून देईन असं आश्वासन भास्कर जाधवांनी दिलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 15, 2012 02:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close