S M L

मुलायम सिंग यादव कोणाबरोबर ?

14 जून1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकार कोसळल्यानंतर सोनियांनी बहुमत असल्याचा दावा केला. तेव्हा सोनिया गांधी यांच्या विरोधात गेलेल्या मुलायम आणि काँग्रेसमधला दुरावा वाढत गेला. पण आज स्थिती वेगळी आहे. मुलायम यांचं उत्तरप्रदेशात बहुमत आहे. त्यामुळे आता त्यांचं महत्त्व वाढलंय. ते ममतांची साथ सोडून यूपीएसोबत जाणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे. 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारचा पराभव झाला. आणि काही तासांतच सोनिया गांधींनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला. पण, त्यांच्या मार्गात अडथळा आणण्यासाठी मुलायम सिंहांनी त्यांच्या परदेशी असण्याचा मुद्दा उपस्थित केला. या एका घटनेमुळे काँग्रेस आणि समाजवादी पक्षात दुरावा निर्माण होत गेला. आता मुलायमनी ममता बॅनर्जी यांच्याशी हातमिळवणी केली. आणि राष्ट्रपतीपदासाठी तीन नावांची घोषणा केली. त्यात पंतप्रधानांचाही समावेश आहे. पण त्यांच्या पसंतीचे पहिले उमेदवार आहेत, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम..40 खासदार असतानासुद्धा समाजवादी पक्षाला यूपीए-1 सरकारच्या बाहेरच राहावं लागलं होतं. सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी मुलायम योग्य संधीचे ते वाट पाहत होते. पण यूपीए-2 मध्येही त्यांना स्थान मिळालं नाही. आणि 2009 च्या निवडणुकीत त्यांच्या सुनेला काँग्रेसच्या उमेदवाराकडूच पराभूत व्हावं लागलं. आता उत्तर प्रदेशात पूर्ण बहुमत असल्यानं मुलायम यांना काँग्रेसवर अवलंबून राहण्याची गरज संपली आहे. त्यामुळेच ममतांशी हातमिळवणी करत त्यांनी कलामांचं नाव पुन्हा एकदा पुढं केलंय. कलामांना एनडीएचा ठोस पाठिंबा मिळेल, याची मुलायम यांना पूर्ण जाणीव आहे. त्याचवेळी त्यांनी काँग्रेसशी चर्चेची दारं मात्र बंद केलेली नाहीत. मध्यावधी निवडणुकांमुळे आपला फायदा होईल असं ममतांप्रमाणंच मुलायमनाही वाटत असेल तर ते आपला उमेदवार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरवतील. पुढच्या लोकसभेत आपली संख्या वाढेल, अशी दोघांनाही आशा आहे. मुलायम काँग्रेसशी वाटाघाटी सुरूच ठेवून ऐनवेळी ममतांना धक्का देण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 14, 2012 04:50 PM IST

मुलायम सिंग यादव कोणाबरोबर ?

14 जून

1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकार कोसळल्यानंतर सोनियांनी बहुमत असल्याचा दावा केला. तेव्हा सोनिया गांधी यांच्या विरोधात गेलेल्या मुलायम आणि काँग्रेसमधला दुरावा वाढत गेला. पण आज स्थिती वेगळी आहे. मुलायम यांचं उत्तरप्रदेशात बहुमत आहे. त्यामुळे आता त्यांचं महत्त्व वाढलंय. ते ममतांची साथ सोडून यूपीएसोबत जाणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे.

1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारचा पराभव झाला. आणि काही तासांतच सोनिया गांधींनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला. पण, त्यांच्या मार्गात अडथळा आणण्यासाठी मुलायम सिंहांनी त्यांच्या परदेशी असण्याचा मुद्दा उपस्थित केला. या एका घटनेमुळे काँग्रेस आणि समाजवादी पक्षात दुरावा निर्माण होत गेला. आता मुलायमनी ममता बॅनर्जी यांच्याशी हातमिळवणी केली. आणि राष्ट्रपतीपदासाठी तीन नावांची घोषणा केली. त्यात पंतप्रधानांचाही समावेश आहे. पण त्यांच्या पसंतीचे पहिले उमेदवार आहेत, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम..

40 खासदार असतानासुद्धा समाजवादी पक्षाला यूपीए-1 सरकारच्या बाहेरच राहावं लागलं होतं. सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी मुलायम योग्य संधीचे ते वाट पाहत होते. पण यूपीए-2 मध्येही त्यांना स्थान मिळालं नाही. आणि 2009 च्या निवडणुकीत त्यांच्या सुनेला काँग्रेसच्या उमेदवाराकडूच पराभूत व्हावं लागलं. आता उत्तर प्रदेशात पूर्ण बहुमत असल्यानं मुलायम यांना काँग्रेसवर अवलंबून राहण्याची गरज संपली आहे. त्यामुळेच ममतांशी हातमिळवणी करत त्यांनी कलामांचं नाव पुन्हा एकदा पुढं केलंय. कलामांना एनडीएचा ठोस पाठिंबा मिळेल, याची मुलायम यांना पूर्ण जाणीव आहे. त्याचवेळी त्यांनी काँग्रेसशी चर्चेची दारं मात्र बंद केलेली नाहीत.

मध्यावधी निवडणुकांमुळे आपला फायदा होईल असं ममतांप्रमाणंच मुलायमनाही वाटत असेल तर ते आपला उमेदवार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरवतील. पुढच्या लोकसभेत आपली संख्या वाढेल, अशी दोघांनाही आशा आहे. मुलायम काँग्रेसशी वाटाघाटी सुरूच ठेवून ऐनवेळी ममतांना धक्का देण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 14, 2012 04:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close