S M L

शिवसेनेचा प्रणवदांना पाठिंबा

19 जूनराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेनं अखेर आपली भूमिका जाहीर करत प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला आहे. सोमवारी रात्री उशिरा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून राष्ट्रपतीपदासाठी प्रणब मुखर्जी योग्य उमेदवार असल्याचं सांगत त्यांना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. प्रणव मुखर्जी हे योग्य उमेदवार असून कोणीही मान्यात तलवार नसताना वीर असल्याचा आव आणू नये असा टोलाही शिवसेनाप्रमुखांनी भाजपला लगावला. तसंच कोणीही शिवसेनेवर फसवणुकीचा आरोपही करु नये असा अप्रत्यक्ष इशाराही शिवसेनाप्रमुखांनी दिला. काल सोमवारी प्रणव मुखर्जी यांनी बाळासाहेबांना फोन करुन पाठिंब्या देण्यासाठी विनंती केली होती. आता आज दिल्लीत एनडीएची बैठक होतेय.आता या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.बाळासाहेब ठाकरे यांचे पत्र जसेच्या तसेसध्या हिंदुस्थानात राष्ट्रपतीपदाची निवडणूक बरीच गाजत आहे. कुणाचं पितळ तर कुणाचं तांबं उघडं पडत आहे. एवढ्या अवाढव्य अशा देशाचा राष्ट्रपतीपदावरून चाललेला खेळखंडोबा शोभनीय नाही. राजकीय स्वार्थापोटी देशाची अब्रू चव्हाट्यावर मांडली जात आहे. ज्यांच्या आडात पाणी नाही तेही आपले पोहरे टाकून राष्ट्रपतीपदासाठी तिरीमिरीने उभे राहतात. बाकीच्या राजकीय पक्षांच्या अरेरावी आणि मग्रुरीबद्दल मला काही मत व्यक्त करण्याची इच्छा नाही. काही माणसं कशी मस्तीत व गुर्मीत वागत होती हेही आपण दूरदर्शनवर पाहिलेच असाल. प्रसंग येताच त्याची चिरफाड केल्याशिवाय मी राहणार नाही. आता शहाणपणाने वागणं व देशाची शान राखणं ही एकच गोष्ट देशाच्या हाती आहे. तलवार म्यानात नसताना उगाच मुठीला हात घालून शौर्यत्व व वीरत्व दाखविण्याचा फुका प्रयत्न करू नये आणि कोणीही शिवसेनेवर विश्‍वासघाताचा, पाठीत खंजीर खुपसण्याचा, फुटीरतेचा, दगाबाजीचा आरोप करण्याचे धाडस करू नये आणि हे आरोप करणार्‍यांनी हे सर्व प्रयोग पूर्वी शिवसेनेवरच केले होते म्हणून शिवसेना हा बदला घेऊ इच्छित नाही. केवळ देशहितासाठी हा विचार मांडीत आहे. चला, झाले गेले विसरून जा आणि प्रणव मुखर्जींना राष्ट्रपतीपदासाठी एकमुखाने पाठिंबा द्या आणि ‘हम सब एक है’ हे जगाला दाखवून द्या. आपला नम्र,शिवसेनाप्रमुख

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 19, 2012 09:26 AM IST

शिवसेनेचा प्रणवदांना पाठिंबा

19 जून

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेनं अखेर आपली भूमिका जाहीर करत प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला आहे. सोमवारी रात्री उशिरा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून राष्ट्रपतीपदासाठी प्रणब मुखर्जी योग्य उमेदवार असल्याचं सांगत त्यांना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. प्रणव मुखर्जी हे योग्य उमेदवार असून कोणीही मान्यात तलवार नसताना वीर असल्याचा आव आणू नये असा टोलाही शिवसेनाप्रमुखांनी भाजपला लगावला. तसंच कोणीही शिवसेनेवर फसवणुकीचा आरोपही करु नये असा अप्रत्यक्ष इशाराही शिवसेनाप्रमुखांनी दिला. काल सोमवारी प्रणव मुखर्जी यांनी बाळासाहेबांना फोन करुन पाठिंब्या देण्यासाठी विनंती केली होती. आता आज दिल्लीत एनडीएची बैठक होतेय.आता या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचे पत्र जसेच्या तसे

सध्या हिंदुस्थानात राष्ट्रपतीपदाची निवडणूक बरीच गाजत आहे. कुणाचं पितळ तर कुणाचं तांबं उघडं पडत आहे. एवढ्या अवाढव्य अशा देशाचा राष्ट्रपतीपदावरून चाललेला खेळखंडोबा शोभनीय नाही. राजकीय स्वार्थापोटी देशाची अब्रू चव्हाट्यावर मांडली जात आहे. ज्यांच्या आडात पाणी नाही तेही आपले पोहरे टाकून राष्ट्रपतीपदासाठी तिरीमिरीने उभे राहतात. बाकीच्या राजकीय पक्षांच्या अरेरावी आणि मग्रुरीबद्दल मला काही मत व्यक्त करण्याची इच्छा नाही. काही माणसं कशी मस्तीत व गुर्मीत वागत होती हेही आपण दूरदर्शनवर पाहिलेच असाल. प्रसंग येताच त्याची चिरफाड केल्याशिवाय मी राहणार नाही. आता शहाणपणाने वागणं व देशाची शान राखणं ही एकच गोष्ट देशाच्या हाती आहे. तलवार म्यानात नसताना उगाच मुठीला हात घालून शौर्यत्व व वीरत्व दाखविण्याचा फुका प्रयत्न करू नये आणि कोणीही शिवसेनेवर विश्‍वासघाताचा, पाठीत खंजीर खुपसण्याचा, फुटीरतेचा, दगाबाजीचा आरोप करण्याचे धाडस करू नये आणि हे आरोप करणार्‍यांनी हे सर्व प्रयोग पूर्वी शिवसेनेवरच केले होते म्हणून शिवसेना हा बदला घेऊ इच्छित नाही. केवळ देशहितासाठी हा विचार मांडीत आहे. चला, झाले गेले विसरून जा आणि प्रणव मुखर्जींना राष्ट्रपतीपदासाठी एकमुखाने पाठिंबा द्या आणि ‘हम सब एक है’ हे जगाला दाखवून द्या.

आपला नम्र,शिवसेनाप्रमुख

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2012 09:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close